सुर्वे मास्तर

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

सुर्वे मास्तर गेले. काय वाटलं ते सांगणं अवघड आहे. मी त्यांच्या एकूणएक कविता, लेखन वाचलं आहे वगैरे आव मी आणणार नाही. फारच कमी वाचलं आहे त्यांना मी. पण तरीही आत काहीतरी झालं. असो.

ते गेल्याचं समजलं आणि एक जुनी कविता आठवली. त्यांच्याच एका अस्सल कवितेनी जन्माला घातली ही कविता, त्यांनाच अर्पण.

जागर

प्रत्येकात कुठेतरी एक आत्मा असतो
असं नेहमीच ऐकलं आहे,
आजवर फारशी गरज भासली नाही
पण एकदा त्याच्याशी आमने सामने व्हायचं आहे

त्याला विचारण्यासारखं तसं खूप आहे
पण अजून त्याचे प्रश्न बनले नाहीत.
अनेकांचं म्हणणं आहे की
प्रश्न आणि उत्तरे दोन्ही त्याच्याजवळ आहेत,
डबक्यातही पुरुषभर उंच-खोल लाटा उठवतील
अशा काही शक्ती त्याच्याजवळ आहेत.

कधीतरी या आत्म्याला भिडण्याचं धैर्य गोळा करावं लागेल
त्यासाठी सुर्वे मास्तरांकडे रोज रात्री जागराला जावं लागेल.

विषय: 
प्रकार: