क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>><<(योग, आजचा रिपोर्ट कोठेय?)>> असल्या कसोटीवर रिपोर्ट लिहायला घ्यायचं धार्ष्ट्य दाखवलं, याचंच खर तर योगजींचं कौतुक करायला हवं
धन्यवाद! अहो पण तसं काही नाही.. निव्वळ खेळाच्या प्रेमापायी अन ईथे भावना व्यक्त करायला मोफत जागा आहे शिवाय क्रिडाप्रेमी आहेत म्हणून. मान्य, या कसोटीबद्दल वा कालच्या खेळाबद्दल विशेष लिहीण्यासारखं काही नाही तरीही फारेंड ने अचूक लिहीलय.
>>नाही जमले असते तरी त्या सिच्युएशन पासून आपण हरत तर नव्हतो, मग प्रयत्न करायला काय हरकत होती असे मला काल दुपारी वाटत होते.

खरं तर साहेब अन धोणी दोघांची ऊपाहारानंतरची खेळी अन डावपेच अनाकलनीय होते. सचिन अतीशय थकल्याने बाद झाला हे स्पष्ट होते पण दोघांनी किमान सकारात्मक खेळायला हवे होते. कुठल्याही परिस्थीतीत भारत सामना हरणार नव्हता हे ऊघड आहे. निदान लंकेच्या धावांची बरोबरी करून मग प्रतीहल्ला चढवायला काहीच हरकत नव्हती. पण या दोघांचा अ‍ॅटीट्यूड तसा दिसला नाही. ईतकेच काय पण धोणी ने मिथून व्यवस्थित खेळत असताना देखिल चेंडू लांब गेला तरी एक एक धावा काढणे टाळले. ते खरच अनाकलनीय होते. कारण त्यामूळे धोणी स्वतः मारू की नको अशा विचित्र मनस्थितीत स्वताची विकेट फालतू गमावून बसला. ज्या ५-६ एकेरी धावा सोडल्या त्यात त्याची वैयक्तीक धावसंख्या ९०+ अन पर्यायाने शतक झाले असते. सघाची आघाडीही वाढली असती. धोणीचे डावपेच अगदीच अनाकलनीय होते.
त्याहीपेक्षा अनाकलनीय संगा चे डावपेच होते. धोणी गेल्यावरही फलंदा़जांच्या भोवती क्षेत्ररक्षकांचे जाळे दिसत नव्हते. लंकेला भारताचे शेपूट गुंडाळण्यात स्वारस्य नव्हते की काय ईतपत सर्व रटाळ चालले होते.
धोणी गेल्यावरही ईशान अन मिथून ने चक्क ३५ धावांची भर घातली.
मला तर प्रामाणिकपणे वाटतं की काल १००+ ची आघाडी घेवून आज सकाळी ती २०० पर्यंत वाढवण्याची निश्चीत संधी होती. अन कदाचित आज खेळपट्टी थोडातरी चमत्कार दाखवेल असे वाटत होते. पण चुकीचे डावपेच आणि नकारात्मक फलंदाजी याने ती संधी वाया गेली. मला खात्री आहे, आपल्या जागी ऑसी असते तर कदाचित वेगळे चित्र पहायला मिळाले असते.

एकंदरीत कालच्या खेळाचे वा एकूण कसोटीचे वर्णन- "चामडी लोळवणे" असे करता येईल.

या कसोटीच्या अनुशंगाने पुन्हा खेळपट्टी ला अनुसरून वाद विवाद होतीलच. यजमान संघाला कशीही खेळपट्टी बनवायचा अधिकार असला तरिही किमान सामना चुरशीचा होईल ईतपत खेळपट्टी बनवायला काय हरकत आहे? याला भारतही अपवाद नाही. आयसीसी ने खेळपट्ट्टी निव्वळ खेळण्यालायक (धोकादायक नाही ना) ऊपयुक्त आहे ना यापलिकडे जावून खेळपट्टी मेलेली तर नाहीये ना हेही तपासायला हवे. मला तर वाटते चक्क नियमावली घालून द्यावी:
१. यजमान संघाने हवी तशी खेळपट्टी बनवावी जरूर पण ती एक तर फिरकी अथवा वेगवान गोलंदाजांन्ना सहाय्य करणारी असावी असा चक्क नियम घाऊन द्यावा. मग होवून जावू दे ना फेयर गेम. की खेळपट्टी तीसर्‍या दिवसापासून फिरकी ला निश्चीत साथ देईल, तर संघ पण तसेच निवडले जातील.
२. जर तीन दिवसांनंतरही खेळपट्टी निर्जीव आहे असे दिसले तर सामना तिथेच अनिर्णीत म्हणून घोषित करावा.
३. अशी निर्जीव खेळपट्टी बनवलेल्या वेन्यू ला पुढील पाच सामने बाद ठरवावे आणि यजमान देशाला दंड ठोठावला जावा कींव्वा प्रेक्षकांचे तिकीटाचे पैसे परत केले जावेत (जे करणे जास्त अवघड आहे). फिरोजशाह कोटला (दिल्ली) ला जसा अंडर्प्रीपेयर्ड खेळपट्टी बनवली म्हणून दंड ठोठावला तसेच काहीसे.
४. साकारात्मक बदल असेही करता येतील जो कदाचित एक कसोटीचा नवा फॉर्मॅट होवू शकेल. ५००+ धावा झाल्यावर सक्तीने डाव घोषित केला जावा. साधारणपणे चांगल्या खेळपट्टीवर दिड दिवसात या धावा आजकाल केल्या जातात. पुन्हा दुसर्‍या संघाने ५००+ केल्या तर त्यांचाही डाव घोषीत. ऊरलेल्या दोन दिवसात जे काही व्हायचे ते होवून जावू देत. (दोन दिवसात वीस गडी बाद होण्याची शक्यता अधिक आहे).
५. icc ranking मध्ये सतत जिवंत अन चुरशीच्या खेळपट्ट्या बनवणार्‍या यजमान संघाना/देशांन्ना रँकींग सीस्टीम मध्ये विशेष गुण देता येईल.
६. खेळपट्टी अगदीच निर्जीव असेल अन काही कारणास्तव वरील कठोर नियम लागू करता येत नसतील तर प्रत्त्येक संघाला जास्ती जास्त १८० षटकेच खेळू द्यावी (एक दिवस ९० षटके) जेणेकरून या मेलेल्या कसोटीचे दोन डावांचा पाच दिवसीय सामना मध्ये (वन डे सामना) रूपांतर होवून निर्णयाला वाव राहील.
७. प्रत्त्येक कसोटीचा निकाल लागायला हवाच असे नाही पण अनिर्णीत लढती देखिल अत्यंत चुरशीच्या झालेल्या आहेत्/होतील जर खेळपट्टी थोडीफार तरी जिवंत असेल तर, हा मूळ मुद्दा ध्यानात ठेवला जावा.
८. कसोटी सामन्यात खर्‍या अर्थाने फलंदाज, गोलंदाज आणि एकूणात सर्व खेळ (क्षेत्ररक्षण, पंच), यांची कसोटी लागणे अपेक्षित असेल तर त्यादृष्टीकोनातून नियमावली पुन्हा एकदा तपासून सुधार करायला काय हरकत आहे?

असो. बाकी ईतर सुचले तर रात्री लिहीन तूर्तास देशाच्या विमानाचा बॉर्डीग कॉल... Happy
****************************************************
ps: सामने, बक्षिसे, खेळाडू, प्रायोजक, प्रक्षेपण, ई. वर अब्जावधी ऊधळताना, खेळपट्टीवर किमान लाख ऊधळण्याचे धाडस नवे अध्यक्ष पवार साहेब दाखवतील काय? Is the "Ground Reality" different than we all imagine? Happy

संगा मॅच जिंकण्यासाठी कसलिही रिस्क घेणार नाही (आहे तो लीड घालवायची गरज काय ?) हे उघड असल्यामूळे धोनीनेही प्रय्त्न केले नसावे. नुसत्या एका टिमच्या प्रयत्नांनी जिंकता येणासारखी हि मॅच राहिली नव्हती हे चौथ्या दिवशी उघड झाले होते.

योगजी, एकंदरीतच कसोटी सामन्यांच्या नियमांबाबत बदल करण्याची गरज "ओव्हरड्यू" झाली आहे व मर्यादित षटकांच्या स्पर्धांमुळे तर ते आता अपरिहार्य झाले आहे, असं मलाही तीव्रतेनं वाटतं.
<<६. खेळपट्टी अगदीच निर्जीव असेल अन काही कारणास्तव वरील कठोर नियम लागू करता येत नसतील तर प्रत्त्येक संघाला जास्ती जास्त १८० षटकेच खेळू द्यावी (एक दिवस ९० षटके) जेणेकरून या मेलेल्या कसोटीचे दोन डावांचा पाच दिवसीय सामना मध्ये (वन डे सामना) रूपांतर होवून निर्णयाला वाव राहील.>> मला वाटतं कसोटी क्रिकेट जिवंत ठेवायचं असेल तर असं करणं तर्कशुद्ध व आता अपरिहार्य आहे.
<<७. प्रत्त्येक कसोटीचा निकाल लागायला हवाच असे नाही पण अनिर्णीत लढती देखिल अत्यंत चुरशीच्या झालेल्या आहेत्/होतील जर खेळपट्टी थोडीफार तरी जिवंत असेल तर, हा मूळ मुद्दा ध्यानात ठेवला जावा.>>मालिकेचा अंतिम निर्णय कुणी किती सामने जिंकले यावर न ठरवता कसोटी मालिकेतील प्रत्येक सामन्याला "प्लस"व "मायनस" गुण ठेवावे व या गुणांच्या आधारेच ठरवावा. त्यामुळे शेवटच्या सामन्यापर्यंत चुरस रहाण्याची शक्यता खूपच वाढेल.[ एका सामन्याच्या विजयाचा "लीड" मिळाला कीं नंतर विजय मिळवायची जबाबदारी फक्त विरुद्ध संघाचीच अशी भूमिका घेवून खेळण्याची रुळलेली पद्धत मोडून काढली पाहिजे].
गंभीरपणे हा मुद्दा मांडल्याबद्दल योगजींचे आभार.

योग वरच्या मुद्द्यांमधे live pitch ह्यापलीकडे बाकी काही करायची गरज आहे असे मला वाटत नाही. बाकी सगळ्या मलमपट्ट्या आहेत.

अरे जर बाकी सगळ्या मलमपट्ट्या असतील तर नियमावली देखिल नको. खेळपटी जिवंत "नसली तर" य अनुशंगाने ती अक्खी पोस्ट लिहीली होती ना Happy

<<योग वरच्या मुद्द्यांमधे live pitch ह्यापलीकडे बाकी काही करायची गरज आहे असे मला वाटत नाही. बाकी सगळ्या मलमपट्ट्या आहेत.>> एकदम मान्य. पण तसं कित्येक तपं सर्वच ओरडत असूनही होत नाही, त्याचं काय? म्हणूनच, कसोटीसाठी यजमान संघाला हवं तसं एकतर्फी " pitch " बनवल्याबद्दल जर त्या संघाला सामन्यासाठी " minus" गुण मिळणार असतील, तर हवा तो परिणाम साध्य होण्याची शक्यता आहे, याचसाठी असे नवीन नियम सुचवायचे एव्हढंच.

दिलशान आणि संगकाराला पहिल्या डावात शतक काढू न दिल्यामुळे तिसर्‍या कसोटीत भारताला विजयी घोषीत करण्याचा निर्णय आय.सी.सी.च्या विचाराधीन आहे असे खात्री लायक रित्या कळते.:)

शक्य आहे!
रैना ला स्लीप पोसिशन मध्ये ठेवण्याची चूक नडली नाहीतर संगा कवाच तंबूत परतला असता. असो.
दिवसाखेर ५ बाद करतात का ते पाहुया.

योग पाचच काय.. सात तरी बाद व्हायला पाहिजेत किमान... पण आपले महान बॉलर बघता चार तरी बाद होतील की नाही अशी शंका आहे..

हम्म्म्म्म... खेळपट्टी "जिवंत" आहे. पण आपल्या गोलंदाजीची धार कमी पडतीये. ओझा वळवतोय पण दुसरीकडून मिश्रा अजूनही साधारण गोलंदाजी करतोय. पहिल्या डावात लंकेने ४०० केले तर भारताला महाग पडायची शक्यता आहे. सतत दबाव, आक्रमक डावपेच, अन क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी केली तर अजूनही संधी आहे लंकेला ३००+ मध्ये गुंडाळायची.
बघुया...

पहिल्या दिवशी ४ बळी!!! आधीच्या २ कसोटीच्या मानाने गोलंदाजी सुधारलीय. एक धावचीत म्हणजे क्षेत्ररक्षण पण.
दुसरी कसोटी वाचल्याने कसोटी मधले टॉप रँकिंग काही जास्त दिवस भोगता येईल याचाच आनंद मानायला हवा.

टॉप रँकिंग दुसरी कसोटी वाचवल्यामुळे नाही तर नविन वर्ष सुरु झाल्यामुळे जास्त दिवस भोगता येणार. आहे... अन्यथा गेलेच असते....

योग.. आता बेट लावायची का? ही टेस्ट जिंकणार की हारणार म्हणून... लंकेचे आज ४च गडी बाद झालेत आणि जवळ पास ३०० धावा पण झाल्यात.. उद्या लंकेचा पूर्ण संघ बाद होणार आणि आपले पहिले दोन किंवा तीन गडी बाद होऊन साधारण १२५ च्या आसपास धावा होणार.

मला वाटतं ऊद्या ऊपहारापर्यंत त्यांचा डाव ४०० च्या आत आटोपेल. सकाळी चेंडू चांगला स्विंग होतोय अन इशांत भेदक वाटतोय. पण मिथून फारच सामान्य पडतोय त्यामूळे दोन्हिकडून प्रेशर येत नाहीये. ओझा ला देखिल मिश्रा ची पुरक साथ मिळत नाहीये.
दिवसाखेर आपले १५० आणि ३ बाद. Happy
या खेळपट्टीवर द्रविड अन विजय चं शतक व्हायची शक्यता अधिक वाटते. कारण ते जपून खेळतात, धोका न पत्करता.
विरू खेळला तर मात्र सर्वच चित्रं पालटेल- आपले २५०+ होवू शकतात.
साहेबांन्नी मनात आणले तर अजून एक शतक आरामात करू शकतील.
ऊद्या सकाळचे पहिले सत्र अन आपल्या डावाचे पहिले सत्र यावर सामन्याचे बरेचसे भवितव्य अवलंबून असेल असे वाटते.

अखेर श्रीलंकेचा ऑल डाऊन झाला.. ४२५ धावांवर..

आता बघूया आपले सेहवाग साहेब काय करतात ते!!!!

४२५. या धावसंख्येवरून लंका हरणे कठीण आहे. भारतासाठी विजय मिळवण्याचा प्रयत्न करणे अन त्या दृष्टीने खेळणे हितकारक ठरेल अन्यथा सामना वाचवायचा या दृष्टीकोनातून खेळले तरी दबावाखाली विकेट अन मालिका गमावून बसणारच आहेत.
सेहवाग कसा खेळतो यावर भारताचे भवितव्य अवलंबून असेल. कारण सेहवाग आज अन ऊद्या खेळला तर ऊद्यापर्यंत आपले ४५०+ होवू शकतात (आज १००, ऊद्या ३५०+). मग चौथ्या दिवशी चहापानपर्यंत २५०+ ची आघाडी घेवून लंकेला फलंदाजी देता येईल. द्रविड, लक्षमण, सचिन हे फारतर हा सामना वाचवू शकतील, जिंकू देवू शकत नाहीत हे दुर्दैव आहे. कारण गरज आहे वेगात धावा करण्याची अन पुन्हा उत्कृष्ट गोलंदाजी/क्षेत्ररक्षण करण्याची.
अर्थात, काहीही केले तरी (म्हणजे आधी उत्कृष्ट फलंदाजी करायची अन मग गोलंदाजी) आपले गोलंदाज दुसर्‍या डावात कशी कामगिरी करतात यावर पुन्हा एकदा सर्व अवलंबून असेल.
थोडक्यात २ दिवस अतीशय सकारात्मक, प्रसंगी आक्रमक फलंदाजी करणे अन मग पुढील डावात भेदक गोलंदाजी, उत्कृष्ट फिरकी गोलंदाजी करणे एव्हडे सर्व केले तरच आपल्याला जिंकण्याच्या आशा आहेत.
सध्ध्या लंकेचे पारडे सर्व बाजूने जड आहे. कारण त्यांन्ना फक्त विकेट्स घ्यायच्या आहेत!
**************************************************
लंकेचे शेपूट पुन्हा एकदा वळवळले. थोडक्यात आपल्या गोलंदाजांन्ना त्यांन्ना बाद करायला ऊशीर तर झालाच पण जवळ जवळ ७५+ धावा अधिक गेल्या. सामन्याच्या निकालात या गोष्टीमूळे खूप फरक पडेल असे वाटते. किमान शेपूट गुंडाळता येणारे गोलंदाज असते तरी पहिल्या व या सामन्यात वेगळे चित्र पहायला मिळाले असते. आजच सेहवाग बाद झाला तर खोदकाम सुरू होईल अन मग आहेच पुन्हा repeat telecast of previous games...

पुन्हा एकदा मला वाटतं आपण संधी वाया घालवतोय.
५०/१ बाद, २५ षटके शिल्लक अन साथीला सेहवाग असताना सचिन ला ३ क्र. वर पाठवायचे होते. कारण सचिन द्रविड पेक्षा नक्कीच जास्त सकारात्मक, वेगात खेळतो. परिणामी सेहवाग देखिल फ्री खेळू शकतो. द्रविड ला सेट व्हायला वेळ लागतो, धावफलक हलता ठेवणे त्याला जमत नाही, शिवाय द्रविड चं रनिंग बिटविन द विकेट खूप वाईट आहे, सचिन शी तुलना करता.
सचिन च्या विकेट चा धोका पत्करला तरी त्याचे फायदे प्रचंड आहेत. दिवसाखेर सेहवाग बरोबर १५०+ धावा होवू शकतात, शिवाय सेट झालेले सचिन सेहवाग पुन्हा दुसर्‍या दिवशी खेळणार यात एक प्रचंड मानसिक दडपण गोलंदाजांवर असते.
द्रविड, सेहवाग पैकी कुणीही बाद झाले तरी सचिन येणारच आहे... मग आधीच का नाही, शिवाय द्रविड आधीचे सामने आऊट ऑफ फॉर्म असल्याने जास्त दडपणाखालीच खेळणार आहे.
असो. आता द्रविड कसा खेळतो यावर आजचा ऊर्वरीत डाव अवलबून असेल..
************************************************
may be my thinking is bit prematured and Dravid will prove me wrong. I will be happy then Happy

आणि द्रविड गेला(च)............... there was nothing in the ball, just that he could not read it.. poor form!!!!!

आता साहेब देखिल बचावात्मक खेळतील. back to sq 1. Sad
*******************************************
खेळपट्टी थोडी मंदावली आहे... अपेक्षेपेक्षा चेंडू थोडासा हळू येतोय.. हे धोकादायक ठरू शकते.

सचिन द्रविड पेक्षा नक्कीच जास्त सकारात्मक, वेगात खेळतो. परिणामी सेहवाग देखिल फ्री खेळू शकतो. द्रविड ला सेट व्हायला वेळ लागतो, धावफलक हलता ठेवणे त्याला जमत नाही, शिवाय द्रविड चं रनिंग बिटविन द विकेट खूप वाईट आहे, सचिन शी तुलना करता.

आता द्रविड कसा खेळतो यावर आजचा ऊर्वरीत डाव अवलबून असेल..

>>

आज काय पिऊन आला होता कोण जाणे...
२६ चेंडू मधे २३... ५ चौकार...

"""५०/१ बाद, २५ षटके शिल्लक अन साथीला सेहवाग असताना सचिन ला ३ क्र. वर पाठवायचे होते"""" हा २०-२० सामना आहे का? ५ दिवसांची कसोटी आहे आणि आज फक्त दुसरा दिवस आहे. आत्ता आजची अजून १२ षटके शिल्लक आहेत आणि २५ षटकात १२२ धावा(धावगती : ४.८८) केल्यात्...अर्थात हे सेहवाग असल्याने

सेहवागने कसोटीत ७००० धावा पूर्ण केल्या. दुसर्‍या जलद ७००० धावा. १३४ डाव घेतले तर सचिनने १३६ डाव घेतले होते. वॉली हॅमंड १३१ डाव प्रथम.

<<<<आज काय पिऊन आला होता कोण जाणे>>>>
कसे वाचायचे?
आज काय, पिऊन आला होता ;कोण जाणे ?
आज 'काय' पिऊन आला होता कोण जाणे?

कसेही वाचले तरी भावना त्याच आहेत.. Happy
द्रविड नक्कीच नेहेमीपेक्षा जास्त सकारात्मक खेळत होता, पण poor form caught up with him!

मयेकर,
ते विधान मी कुठल्या संदर्भात लिहीले ते जरा वाचा की. "भारताला जिंकायचे असेल तर...."
अन्यथा बाजू लावून धरायची एव्हडाच ऊद्देश असेल तर लक्षमणही आहेच की.
असो.
सेहवाग आहे तोवर चुरस कायम आहे.

जोपर्यंत सेहवाग आहे तोवर दुसर्‍या बाजूला कोणीही आला तरी बाजू लावूनच धरणार. सगळे हाणामारी करायला गेले आणि त्यात सामना हरले तर ते पचवून घ्यायची तयारी अजून तरी भारतात कोणाची नाही. धोनीची नववधूपण त्याला घरात घ्यायची नाही.
उलट ४थ्या दिवसाच्या उपाहारापर्यंत नीट (म्हणजे ३.५-३.७५)च्या धावगतीने खेळले तरी जिंकण्याची संधी वाढेल. फक्त द्रविड जे प्याला ते मिश्राला पाजावे लागेल.

भारत पहिला डाव ५५० (वीरू + साहेब =३००+)
श्री लंका दुसरा डाव ३५० (विकेटस देव घेणार)
भारत दुसरा डाव ७ बाद २२६ (लक्ष्मण नाबाद ५०+)

येवढ्या एकाच मेथड ने आपण जिंकू शकतो. Happy

>>जोपर्यंत सेहवाग आहे तोवर दुसर्‍या बाजूला कोणीही आला तरी बाजू लावूनच धरणार. सगळे हाणामारी करायला गेले
सेहवाग आहे तोवर हाणामारीची गरज नसते, नुसते धावफलक हलवला तरी चालते. आज चुकून द्रविड ने धावफलक नुसता हलता नाही तर झुलता ठेवला. बाकी सेहवाग चा नैसर्गिक कसाईखाना चालू असतो तेव्हा ईतरांची "मारामारी " हीच हाणामारी ठरते. कारण सेहवाग थंडपणे कापत असतो कुठल्याही मारामारीचा आवेश न आणता.
मी अजूनही हेच म्हणेन की हा सामना सद्य्द्य स्थितीतही जिंकणे वा वाचवणे यात फरक सेहवागमूळे पडतो.
>>फक्त द्रविड जे प्याला ते मिश्राला पाजावे लागेल
आवडलं Happy
त्यापेक्षा द्रविडनेच गोलंदाजी करावी.
मिश्रा ची अवस्था एक चण्याची पुडी विकण्यासाठी दुपारच्या रणरणत्या ऊन्हात घाम गाळणार्‍या भैयासारखी झालेली आहे. अलिकडे तो दिसतो ही तसाच!

१८०/२ दिवसाखेर. मजा आ गया! सेहवाग ज्या सहजतेने खेळतो ते पाहून त्याचा हेवा वाटतो. सेहवाग च्या कसोटीमधिल धावांची गती द्रविड, लक्षमण, अन कं च्या एकदिवसीय सामन्यातील धावांच्या गतीपेक्षा जास्त असते. निव्वळ या एका गोष्टीमूळे भारताला ऊद्या पुन्हा सेहवाग खेळला तर जिंकायला वाव आहे.

ऊद्या ऊपाहारापर्यंत विरू अन साहेब खेळले तर ३० षटकात अजून १५०+ धावा, एकूण ३३०
चहापानापर्यंत मग आपली धावसंख्या ४५०+ होवू शकते.
धोनी अन रैना तोपर्यंत शिल्लक असले तर ऊद्या दिवसाखेर १५०+ ची आघाडी घेता येईल.
चौथ्या दिवशी सकाळी ऊपाहारापर्यंत पुन्हा ३५०+ पर्यंत आघाडी वाढवून (अर्थातच आक्रमक खेळ करून)
लंकेला खेळायला दिले तर भारताच्या जिंकण्याची शक्यता अधिक आहे. पुढील दोन दिवसात खेळपट्टी चांगलीच वळेल, करामत दाखवेल यात शंका नाही. अगदी २००+ ची आघाडी मिळाली तरी हा सामना आपण जिंकू शकतो.

ऊद्या सेहवाग २००, साहेब १००+, लय मजा येईल.
*****************************************************
सूराज रणदीव सर्वात जास्त भेदक वाटतोय. खेळपट्टीने साथ दिली तर ऊद्या लंकेच्या बाजूने सामना फिरवायची त्याच्यात क्षमता आहे. साहेब वि. रणदीव अन सेहवाग वि. लंका संघर्ष बघायला मजा येईल.
ऊद्या लक्षमण कसा खेळतो याकडेही बर्‍याच जणांचे लक्ष असेल.

मर्यादित षटकांच्या अगणित सामन्यांतील आक्रमक फलंदाजीचा भारताचा अनुभव हा सामना जिंकताना कसास लागणार आहे, तर तसाच गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाचा अनुभव श्रीलंकेला भारताला रोखण्यासाठी
[ अन हरवण्यासाठीही ] उपयुक्त ठरणार आहे. बघूं सेहवाग, साहेब, धोनी काय करामत करतात ते. पण काय करायचं ते पहिल्या डावातच साधायला हवं; चौथ्या, पांचव्या दिवशीं दोन्ही संघाना मोठी धावसंख्या उभी करणं या विकेटवर कठीणच दिसतंय. शिवाय, एक डोळा तर हवामानावर ठेवावा लागणारच आहे !

योगला अनूमोदन. संथ खेळलो तर ड्रॉ किंवा हार हाच रिझल्ट होईल. आता आणखी ४००+ रन्स हवे आहेत, ते पण उद्या. आजकाल ३७५ रन्स एका दिवसात म्हणजे फार काही ग्रेट गोष्ट राहिली नाही, सगळेच जण करतात, उद्या पूर्ण दिवसात किमान ४०० झालेच पाहिजेत. मग निकाल लागू शकतो, नाहीतर ड्रॉ. आपल्याला इज्जत वाचवायची असेल तर जिंकायला हवे.

सेहवाग ने ह्यावेळी शतक करावेच असे वाटते. सकाळचे पहिले सत्र त्यालाच धोकादायक आहे, सचिन खेळून काढेल ते. मुख्य म्हणजे नंतर येणार्‍या लक्ष्मण, रैना, धोणी पैकी लक्ष्मणने विकेट टिकवून धरावी अन बाकीच्यांनी आक्रमक खेळावे. ४.५ रनरेट ठेवायलाच हवा. Happy बेस्ट केस सिनारियो मध्ये भारत ५५० - ४ असे राहिले तर परवा लंच पर्यत १५० काढावेत अन डिक्लेअर करावा. (मी फारच आशावादी झालो असे दिसते.)

Pages