क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार, आपल्याकडे गेल्या दोन वर्षात तब्बल १६ वेगवान गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळे संधी मिळत नाही अस म्हणण बरोबर नाही. उलट अपरिपक्व असताना दिलेली संधी मारक ठरते आहे. शिवाय आपल्या सगळ्या पाटा विकेटस. त्यामुळे विकेटस घ्यायच्या सवयी पेक्षा मार खायचीच जास्ती सवय लागते. त्यामुळे चांगली सीम होणारी विकेट मिळाली तरी सगळे सैरा वैरा सुटतात, तिथेही बोंब.

मला अजून दुसर एक गौडबंगाल कळलेल नाही. जेंव्हा नविन गोलंदाज येतात तेंव्हा त्यांचा वेग १४० च्या पुढे. एकदा टीम मधे सेटल झाले की १२५-१३०. इशांत, मुनाफ. आर.पी, श्रीशांत ही काही उदाहरणे. बर फिटनेस रहावा म्हणोन वेग कमी करतात तर तसेही नाही. सगळे आपले नेहमी इन्जुअर्ड. ही असली आजारी फौज घेउन काय वर्ल्ड कप जिंकणार. मला तर काही खर वाटत नाही.

बाय द वे. काल मुरलीची कारकीर्द आठवत असताना, त्याने तेंडल्याची भारतात वर्ल्ड कप मधे विकेट घेतलेली आठवली. (ज्या मॅच मधे कांबळी रडला होता.) क्लासिक ऑफ स्पिनर्स विकेट. चक्क मामा. तेंडल्याचा फॉरवर्ड डिफेन्स करताना तोल गेला, आणि झटक्यात स्टंप्ड. मॅच तिथेच फिरली आणि भारत बाहेर.

<<मला अजून दुसर एक गौडबंगाल कळलेल नाही. जेंव्हा नविन गोलंदाज येतात तेंव्हा त्यांचा वेग १४० च्या पुढे. एकदा टीम मधे सेटल झाले की १२५-१३०>> विक्रमजी, शक्यता अशीही आहे कीं मर्यादित षटकांच्या सामन्यात वेगापेक्षां बचावात्मक गोलंदाजीला प्राधान्य दिलं जातं व असेच सामने जास्त खेळले जातात; मग वेगाचा बळी जाणं स्वाभाविकच आहे.
मुरलीने "चक्क मामा" केलेल्या फलंदाजांच्या नावाने एकेक दगड रामेश्वरच्या दक्षिणेला टाकत गेलं तर श्रीलंकेपर्यंतचा सेतूही तयार होईल !:हहगलो:

मुरलीच्या ८०० पैकी जवळजवळ निम्म्या विकेट्स श्रीलंकेत घेतलेल्या आहेत, अर्थात त्याने त्याचा मोठेपणा कमी होत नाही; मुद्दा हा आहे की आपल्या की प्लेअरच्या ताकदीला साथ देईल अशा विकेट्स सगळेच बनवतात. आपलं मात्र सगळचं घोळात, ना स्पिनर्ससाठी ना फास्ट बोलर्ससाठी; सगळा जोर बॅटींगच्या जीवावर, कुठलीही टेस्ट जिंकायला २० विकेट्स घ्यायची क्षमता असलेला अ‍ॅटॅक आपल्याकडे नाही.

>मुरलीने "चक्क मामा" केलेल्या फलंदाजांच्या नावाने एकेक दगड रामेश्वरच्या दक्षिणेला टाकत गेलं तर श्रीलंकेपर्यंतचा सेतूही तयार होईल !
well said..

from cricinfo:
Comparing Murali and Warne:
http://www.cricinfo.com/magazine/content/story/466589.html

<<कुठलीही टेस्ट जिंकायला २० विकेट्स घ्यायची क्षमता असलेला अ‍ॅटॅक आपल्याकडे नाही.>>आगाऊजी, आपण कसोटी सामन्यातल्या आपल्या कामगिरीच्या मर्मावरच बोट ठेवलंय ! मर्यादित षटकांच्या सामन्यात बॅटींगच्या जोरावर ही कमतरता कांही प्रमाणात झाकता येते पण तेच आपलं बलस्थान मानतोय आपण !!
योगजी, मुरली व वॉर्नची मुख्यतः आंकडेवारीवर आधारीत तुलना वाचली. अ‍ॅक्शनचं निमित्त करून त्याचं खच्चीकरण करण्याचं शुक्लकाष्ठ मुरलीच्या पाठी लागलं तसं ते वॉर्नच्या बाबतीत नव्हतं, हा महत्वाचा मुद्दा आकडेवारीत प्रतिबिंबीत होत नाही, हे लक्षात घ्यायला हवं. पण हे दोघेही तुलनेपलिकडचे "लीजंड"च आहेत, हा निष्कर्ष एकदम मान्य. [ व्यक्तिशः मात्र मी वॉर्नला अधिक मानतो कारण लोप पावत चाललेली लेगस्पीनची आगळी जादू व नजाकत त्याने पुन्हा अत्युत्तमपणे जगापुढे पेश केली. पण हे झालं माझं व्यक्तिगत आवडीवर आधारीत मत.]

बाय द वे. काल मुरलीची कारकीर्द आठवत असताना, त्याने तेंडल्याची भारतात वर्ल्ड कप मधे विकेट घेतलेली आठवली. (ज्या मॅच मधे कांबळी रडला होता.) क्लासिक ऑफ स्पिनर्स विकेट. चक्क मामा. तेंडल्याचा फॉरवर्ड डिफेन्स करताना तोल गेला, आणि झटक्यात स्टंप्ड. मॅच तिथेच फिरली आणि भारत बाहेर.
>> ती विकेट जयसुर्याने घेतली होती, मुरलीने नाही. आणि त्यात तोल वगैरे गेलेला नसून, सचिन थोडा ऑफच्या बाहेरच बॉल drive करायला crease बाहेर आला होता जो मिस झाला नि कालूने stump केले होते.

परत चेक केले Happy
http://www.cricinfo.com/ci/engine/match/65190.html

पण कांबळी का रडला होता? त्या परिस्थीतीतून सामना जिंकून वगैरे द्यायचे स्वप्न पाहिले होते की काय? त्याला कुठलीही बाटली वगैरे लागलेली असायची शक्यता नाही. Happy
कुणाला आठवतय का?
तो स्कोरबोर्ड बघितल्यावर एक विचार मनात आला. सचिन नविन होता तेव्हा बरेच वेळा ५०-६० ठोकून आऊट व्हायचा तरिही भारत बरेचसे सामने हारायचा याला कारण संघातील ईतर महान नग खेळाडू होते. एकदीवसीय मध्ये ते मा़जरेकर, जडेजा, सिधू, कानिटकर, कांबळी, चोप्रा, मोंगिया असल्या लोकांकडून कायम मोक्याच्या वेळी घाण व्हायची. परिणामी जिंकायची आवश्यकता आहे तेव्हा सचिन नाही खेळत असला काहीतरी दुष्ट तर्कवाद बळावला. सौरभ, द्रविड, लक्षमण ही कंपनी आल्यावर मला वाटतं सचिन च्या अशा बर्‍याच छोट्या मोठ्या खेळींचं चीज झालं.
पण आज २० वर्शांनंतरही कसोटी/एकदिवसीय मध्ये सचिन खेळला नाही तर आपण झोपतो हा न्याय अजूनही लागू होतोय. सगळे रेकॉर्ड्स बाजूला ठेवता या निव्वळ एका गोष्टीने साहेबांचं अलौकीकत्व मान्य करावं लागतं.
आताशा सेहवाग ला बरेच जण कसोटीमधिल ग्रेटेस्ट वगैरे म्हणतात पण मोतीबींदू झाला तरी सचिन ५० करेल, सेहवाग चं माहित नाही. Happy (form is temp. class is permanent).

भाऊ,
मलाही वॉर्न वैयक्तीक अधिक आवडतो कारण त्याच्या गोलंदाजी मध्ये एक खास ऑसी flamboyance (मराठी शब्द ? ) होता. एखादा प्रेमात ठार वेडा झालेला प्रियकर प्रेयसी ला आपलीशी करायला जे जे काही करेल तसेच विकेट घ्यायला हा माणूस भन्नाट क्लुत्प्या, प्रयोग अन चेंडूफेक करत असे. त्यात एक बेफिकीरी, ऊध्धटपणा होता. तू काहीही कर कसाही खेळ मी विकेट घेणार जणू असा आविर्भाव त्याच्या गोलंदाजीत असे.

मुरली मात्र मोजून मापून (अगदी मैलभर चेंडू वळवला तरी) चेंडू त्याला हवा तसा हवा तिथे टाकत असे. थोडक्यात मोजून मापून विकेट घेणे. अर्थात आता मुरली गेल्यावर भविष्यात एखाद्या गोलंदाजाचे अपिल करतानाचे ते कलिंगडाएव्हडे डोळे वटारणे, काळ्या फळ्यावर पांढर्‍या खडूने बत्तीस चौकोन काढल्यागत ते आ वासणे, अन अपिल मान्य नाही झालं तर १००० वोल्ट चा झटका बसल्यागत मुद्रा करणे, अन अपिल मान्य झालं तर अगदी एखाद्या लहान मुलागत निरागसपणे हसणे- हे सर्व आता दिसणार नाही.

कुंबळे ऑसी मध्ये जन्माला आला असता तर बहुदा ७०० पर्यंत नक्की गेला असता.

या तीघांमध्ये तुलना करता येणार नाही पण तरिही प्रामुख्याने मला ही वैशीष्ट्ये दिसतातः
वॉर्नः बेफीकीरी, ऑसी अ‍ॅरोगंस, २००% आत्मविश्वास
मुरली: बोटांची जादू, अनाकलनीय डावपेच (तो पुढचा चेंडू कसा टाकेल हे सांगता न येणे), फलंदाजाचा नेमका कमकुवतपणा ओळखणे, अन २००% अचूकता
कुंबळे: जिद्द, चिकाटी, २४ तास रतीब घालायची तयारी, आणि हो चेंडूचा वेग (कुंबळेच्या फिकरीचा वेग एके काळी व्य. प्रसाद च्या चेंडूपेक्षा अधिक होता) Happy

ऊद्या पाक जिंकेल. लय भारी झाला सामना.. तीन दिवसात निक्काल? (अमेरीकेच्या aid मधले ५०% पैसे पाक सरकार तेज गोलंदाज बनवायला वापरते काय अशी मला प्रामाणिक शंका आहे! कारण काश्मिर अन क्रिकेट सोडल्यास ईतर कुठे गुंतवणूक करायला त्यांन्ना वाव आहे असे दिसत नाही) Happy

पण कांबळी का रडला होता? त्या परिस्थीतीतून सामना जिंकून वगैरे द्यायचे स्वप्न पाहिले होते की काय? >> अडिचशे केले होते लंकेने. तेंडळ्या out झाला तेंव्हा ९८ का कहितरी होता स्कोर नि दोन बाद झालेले. २५ ओव्हरस. थोडे डोके ताळ्यावर ठेवून खेळते तर अशक्य नव्हते जिंकणे. Eden ला रात्री होती त्यामुळे बॉलींग कठीण होत होती ग्रिप मिळत नसल्यामूळे. दोन matches पूर्वी कांबळीने ambrose ला दोन फोर नि १ सिक्स मारून मॅच काढऊन दिली होती त्यामूळे अगदीच अशक्य होते असे नाही. कांबळी कशाला शेवटी तेंडल्या नि मांजरेकरचे डोळे पण पाणावलेले वाटत होते. तो त्या तिघांचा क्लासिक फोटो आहे ना.

"पण अतिक्रिकेट, खेळावरील निष्ठा व एकाग्रता यात क्रिकेटेतर आकर्षणांमुळे पडणारा सततचा खंड इ. कारणांमुळे ........पण माध्यमांचा प्रचंड पगडा असलेल्या या युगात ही तपःश्चर्या दीर्घकालीन भरीव कामगिरीसाठी अखंड चालू ठेवणं दुर्मिळच होणार आहे, ...."

या सर्व गोष्टींना सचिन, द्रविड इ. नी हि अनुभवले आहे, पण ते कित्येक वर्षे उत्तम खेळत आहेत.

तसेच इथल्या फुटबॉल, नि बेसबॉल खेळाडूंनाहि हे लागू पडते, पण बेसबॉल खेळाडू १५ - १६ वर्षे सहज उत्तम कामगिरी करत खेळत असतात. हे शेवटी वैयक्तिक स्वभावावर अवलंबून आहे.

<<या सर्व गोष्टींना सचिन, द्रविड इ. नी हि अनुभवले आहे, पण ते कित्येक वर्षे उत्तम खेळत आहेत.>>झक्कीजी, हल्लीच्या वेगवान गोलंदाजांच्या संदर्भातच माझा अंदाज मी मांडला होता; फलंदाजीचा व वेगवान गोलंदाजीचा सराव या दोनात शारिरीक श्रमाच्या बाबतीत खूप फरक पडतो असं नाही वाटत तुम्हाला ?
<<या तिघांमध्ये तुलना करता येणार नाही पण तरिही प्रामुख्याने मला ही वैशीष्ट्ये दिसतातः>> योगजी, मी तर या तीन वैशिष्ठ्यांची भर घालीन - वॉर्न- जातीवंत कलाकार, मुरली- अप्रतिम कारीगर व कुंबळे- झुंजार लढवय्या !

धन्यवाद असामी. पण तेंड्याची विकेट आठवतेय. माझी मॅच चुकलेली दिसते. आठवतो.
कुंबळे, वॉर्न, मुरली - सगळेच ग्रेट.

कुंबळे खरोखरच लढवय्या खरा. बँडेज बांधून बॅटिंगला उतरणारा. पण चांगल्या बॅटिंग विकेटवर क्वचितच धुडगुस घालायचा. त्याच्या साठी खास अंडर प्रिपेयर्ड विकेटस " प्रिपेयर" केल्या जायच्या. मग त्या विकेटवर प्रतिपक्षाचे वेगवान गोलंदाज पण विकेटस घ्यायचे.

मला वॉर्न आणि मुरली ने टेस्ट मॅच मधे घेतलेल्या विकेटस बघायला मजा यायची. बकरा अगदी गोंजारत गोंजारत कापायला नेत आहे असे वाटायचे.

कुंबळेच्या फ्लिपर वर आउट झालेल्या बॅटसमन चा , विशेषतः टेल एंडर चा, चेहरा पहायला लै मजा यायची.

पाकडे जिंकले, याआधी पाकड्यांनी ऑसीस्ला टेसटेमध्ये कधी हरवलेले?? आठवतय का?

श्रीलंकेविरुध्ध दुसरी कसोटी:
पहिल्याच कसोटीचं पुनःप्रक्षेपण चालू आहे काय असं वाटतय.
या भारतीय गोलंदाजी विरुध्ध खेळायला माझे पण हात शिवशिवतायत.. Happy
प्रग्यान ओझा संघात का आहे?
माझं भाकीतः
लंका पहिला डावः ५००+
भारत पहिला डावः ३५० (विजय, तेंडू, शतके ): याच पाट्या खेळपट्टीवर तो सूरज रणदीव कसा थैमान घालेल बघा..

इडनवर हारलेल्या त्या उपांत्य सामन्यात अझरबुवांचा पहिली बॉलिंग घेण्याचा निर्णय पण अचाट आणि अतर्क्य ठरला.. धावपट्टी दुसर्‍या डावात (म्हणजे आपल्या) इतकी वाईट झाली होती.. सर्वात वाइट विकेट अझरचीच होती.. कुमार धर्मसेनाला कॉट अँड बोल्ड.. प्रचंड आळशी शॉट मारुन..

ही पण मॅच पहिल्याच मॅचच्या वळणावर अजून पर्यंत तरी... पहिल्याच दिवसात ४०० वगैरे धावा होतील लंकेच्या असच दिसतय.... तरी ह्या मॅच मध्ये त्यांच्याकडे मलिंगा आणि मुरली दोघेही नाहीयेत त्यामुळे थोडासा दिलासा आहे.. पण बाकीचेही त्रास देतीलच आपल्या फलंदाजांना....

तो ऑसीचा कोणीतरी आय.सी.सी.च्या चेअरमनच्या लायनीत होता त्याच्या बरोबर सेटींग तर नाही ना केलेले आपल्या लोकांनी... म्हणजे आम्ही सिरिज हारतो पण तू काही इकडे येऊ नकोस त्यापेक्षा तुम्ही परत नंबर एक व्हा... Happy

>>> इडनवर हारलेल्या त्या उपांत्य सामन्यात अझरबुवांचा पहिली बॉलिंग घेण्याचा निर्णय पण अचाट आणि अतर्क्य ठरला..

श्रीलंकेविरूद्ध खेळताना भारताला नाणेफेक जिंकूनसुद्धा पहिली गोलंदाजी घेण्याची वाईट सवय आहे. २००७ च्या विश्वचषकाच्या सामन्यात द्रविडनेसुद्धा तेच केले. श्रीलंका आपले बहुसंख्य सामने प्रथम फलंदाजी करूनच जिंकले आहेत. धावांचा पाठलाग त्यांना फारसा जमत नाही. विश्वचषकात भारत-श्रीलंका ६-७ वेळा एकमेकांशी लढले आहेत. एक अपवाद वगळता प्रथम फलंदाजी करणाराच संघ जिंकलेला आहे.

एक अपवाद वगळता प्रथम फलंदाजी करणाराच संघ जिंकलेला आहे.
>>
दिल्लीची फिरोजशाह कोटलावरची ९६ वर्ल्डकप मॅच...
भारत २७१ (सचिन १३७, अजहर ५०+...) {त्याकाळी ही टोटल जबरदस्त विनिंग स्कोअर होती}

मनोज प्रभाकर च्या करिअर चा जयसूर्या आणि कालुविथरणा कडून पाशवी खून...
होमग्राऊंडवर २ ओव्हर्स मधे ३३ रन्स दिल्यावर दुसर्‍या हप्त्यात ऑफस्पिन टाकायची वेळ त्याच्यावर आणली होती...
केवळ सलील अंकोला जरा बर्‍या फिगर्स असलेला फास्ट बॉलर होता... बाकी सगळ्यांची धोबीघाटावर धुलाई झाली होती...

या अनुभवामुळेच अजहरनी क्यूरेटरचा सल्ला धुडकावला आणि पहिली बोलिंग घेतली...
पहिल्या ओव्हरला जयसूर्या आणि थोड्याच वेळात कालू / महानामा ची विकेट पडल्यानी तो बरोबर आहे असंही वाटायला लागलं होतं... पण डिसिल्वा चिकटला... १०० केले...
स्कोअर २५१..
मॅनेजेबल...
सचिन आणि मांजरेकर पिच वर होते तो पर्यंत सहज जिंकू असं वाटत होतं...

पण अचानक गळाती लागली...
स्पिनिंग ट्रॅक वर भारताचे बॅट्समन एरवी दादा असतात... पण या वेळी ते पुरते भंजाळाले होते...
मॅच पूर्ण झाली असती तर कांबळी कदाचित जादू करू शकला असता...
४ सामन्यांपूर्वी त्यानी अँब्रोस ला फोडला होता..
२ सामन्यांपूर्वी अशीच गळती लागल्यावर झिंबाब्वे विरुद्ध शतक फटकावलं होतं..

त्यामुळे कदाचित त्यानी ते केलंही असतं...

पण.. पण.. पण...

<<पण.. पण.. पण...>> आजही पुन्हा पण... पण.. पण चालूच ! गोलंदाजीची लंगडी बाजू घेऊन किती वर्षं, किती शर्यती धावणार आपण ! वेगवान गोलंदाज आळीपाळीने जायबंदी व फिरकीमधल्या हुकमी एक्क्याच्या गोलंदाजीला भेदक ऐवजी भेकड म्हणायचीच आता पाळी आली आहे; आणि हो, टार्झन सिंहाला मारल्यावर आकाशाकडे बघून आरोळी ठोकतो तसं तो भज्जी अख्या दिवसात एखादी विकेट चुकून पडलीच तर तसा आव कां आणतो ! नाही, आपल्या गोलंदाजीला धार काढल्याशिवाय कसोटीच्या चकमकीत आपलं कांही खरं नाही.

>>कुंबळेच्या फिकरीचा वेग एके काळी व्य. प्रसाद च्या चेंडूपेक्षा अधिक होता)

प्रसाद तसाच धावत पुढे गेला असता तर बॉलच्याही आधी फलंदाजापर्यंत पोहोचला असता असा एक विनोद त्या काळी ऐकला होता Proud

आणि अझरुद्दीन ने हे असे अचाट आणि अतर्क्य निर्णय का घेतले आणि तसे 'आळशी' शॉट मारून बाद का झाला याचे कारण आणखी काही काळाने तो मॅच फिक्सिंग मध्ये दोषी आढळल्यावर समजलेच की सगळ्यांना.

शेवटचे भाकीतः
लंका: ७००+
भारतः डावाने हार

ओझा चे ओझे महाग पडणार. कसोटी मध्ये २ फालतू (ईशान, अभिमन्यू) आणि २ कामचलाऊ (भज्जी, ओझा) गोलंदाज घेवून धोणी ला काय सिध्ध करायचे होते? पेक्षा नविन गरम रक्ताच्या गोलंदाजांन्ना घ्यायचे.. निदान विकेट घ्यायला हपापलेले असतात आणि चेंडूचा वेगही बरा असतो.
आता भारताच्या डावात तेच कविलवाणे दृष्य दिसेल. द्रविड खोदतोय अन बाकी सर्व खड्ड्यात पडतायत. Happy

ही खेळपट्टी नेमकी ऊद्यापासून "फिरणार".. म्हणजे भारतीय फिरकी सोडून ईतर कुणीही त्यावर चेंडू वळवणार.

चला आता संगा ३०० करतोय का यावर बेट लावा. माहेला चे १०० आहेतच.

नविन गरम रक्ताच्या गोलंदाजांन्ना घ्यायचे..
>>
उपयोग नाही...
ते टेंपररी टॅलेंट आहे...
आयपीएल पुरतं...

रणाजी मधे अख्खा सीझन चांगली बोलिंग करणार्‍यालाच चान्स द्या...
आयपीएल फॉर्म पाहून आज्जीबात नको...

>>रणाजी मधे अख्खा सीझन चांगली बोलिंग करणार्‍यालाच चान्स द्या...
आयपीएल फॉर्म पाहून आज्जीबात नको...

अगदी. हेच म्हणाय्चे आहे.. आयपील म्हणजे सगळा शोबिझ आहे-क्रिकेट नाही.

एका डावातल्या सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम श्रीलंका वि भारत : ९५२/६ १९९७...
मोडला तर जाणार नाही?

भाउ बॅटींग असली तरी काही फायदा नाही आजकाल. पेक्षा "तुला किती वेळा सांगितलंय आपण जिंकू तेव्हाच ऑफिसमध्ये फोन करून मला सांगत जा" असे लिहा.

Pages