क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यातले खेळताना (टीव्हीवर) शेवटचे दोघेच पाहिलेत. तरी पण विव्ह रिचर्ड्स डोळे झाकून्.(तो पण डोळे झाकून खेळला तरी चालेल). स नरी काँट्रॅक्टर ग्रिफिथच्या चेंडूवर घायाळ झाल्यावर त्यांच्यासाठी सर्वप्रथम रक्तदान सर फ्रँक वॉरेलनी केले होते.

डोळे झाकून वरून एक किस्सा आठवला.

ब्रॅडमन यांना त्यांच्या ८० व्या वाढदिवसाला एका पत्रकाराने प्रश्न विचारला, "आत्ताच्या इंग्लंडच्या गोलंदाजी विरुद्ध तुमची सरासरी काय असेल".

"चाळीस तरी नक्की" ब्रॅडमन उत्तरले.

"काय? फक्त चाळीस?" पत्रकाराला त्याच्या करिअर अ‍ॅव्हरेजची (९९.९९) आठवण झाली .

"हो, ८०व्या वर्षी ४० म्हणजे पुष्कळ झालं नै?" ब्रॅडमन उत्तरले Proud

खेळ झाला नाही पावसामुळे तरी खेळाडूंना पैसे मिळतातच. त्यातून जर थोडा खेळ, मधे पाऊस, पुनः खेळ असे झाले तर जाहीरातींचे सुद्धा खूप पैसे मिळतात. पैसे आहेत म्हणून हा सगळा प्रपंच!

आता तुम्ही म्हणाल खेळाडूंना नको का विश्रांति? पण कुणि सांगितले होते खेळाडू व्हा म्हणून? पैसे मिळतात तर तशी नोकरी पण करायला नको का? तुम्हाला मिळतात का महिन्या महिन्याच्या सुट्ट्या?

<<जॉर्ज हॅडली, विव्ह रिचर्ड्स व ब्रायन लारा>> मास्तुरेजी, विव्ह रिचर्डस व ब्रायन लाराबद्दल वादच
नसावा. हॅडलीना जरी प्रति-ब्रॅडमन म्हटलं जात होतं असलं, तरी मला वाटतं तिसर्‍या जागेवर एव्हर्टन विक्सचा अधिकार दीर्घ काळच्या भक्कम व भरवशाच्या कामगिरीमुळे अधिक असावा. वॉरेलनी वेस्ट इंडीजला एक उच्च प्रतिमा मिळवून दिली, वॉलकॉट हा ग्रेट विकेटकीपर- बॅटसमन होता व लॉईडने एक आदर्शवत संघ उभा केला हे निर्विवाद. पण मधल्या फळीतील फलंदाज म्हणूनच विचार केला, तर मला वाटतं विक्सला तिसरं स्थान मिळणं अपरिहार्य आहे.

यादीतले सर्व जण महान आहेतच (चंद्रपालचा अपवाद वगळता. चंद्रपालसुद्धा चांगला फलंदाज आहे पण इतरांच्या तुलनेत तो काहीच नाही.). जॉर्ज हेडलीला काळा ब्रॅडमन असे म्हणत असत. २२ कसोटीत २१९० धावा (त्यात १० शतके) अशी त्याची कामगिरी होती. म्हणून तो मला योग्य वाटतो.

चंदरपॉलचं नाव वाचून एक आठवलं...

याला याच्या मापाचं हेल्मेट मिळत नाही का???
दर वेळेस दोन साईझ मोठं हेल्मेट घालतो आणि प्रत्येक बॉल फेस करायच्या आधी गदागदा हलवून सेट करतो...

<<दर वेळेस दोन साईझ मोठं हेल्मेट घालतो आणि प्रत्येक बॉल फेस करायच्या आधी गदागदा हलवून सेट करतो...>> इतकीं वर्षं वेस्ट इंडीजसाठी जबाबदारीने खेळतोय; डोकं जाग्यावर ठेवून व ते तसं आहे याची वेळोवेळी खात्री करून घेतो, म्हणूनच ना !:हहगलो:

वेस्ट इन्डिज ऑल टाइम ११ >> वेड्यासारखी टीम असणार आहे ही. फक्त ११ ballers घेतले तरी बस्स झाले असे वाटते Happy

"याला याच्या मापाचं हेल्मेट मिळत नाही का???
दर वेळेस दोन साईझ मोठं हेल्मेट घालतो आणि प्रत्येक बॉल फेस करायच्या आधी गदागदा हलवून सेट करतो..."

याला idiosyncrasy म्हणतात्...राफा, शारापोव्हा, सचिन, सौरभ यांच्या पण आहेत.

भारत कसोटी मानांकनाच्या शिखरावरून उतरणार की काय? हरभजन फणफणलाय, बहुधा डेंग्यु, झहीर खांद्यासाठी द. आफ्रिकेत, श्रीसंत परत. आता फलंदाजांनी समने अनिर्णित राखण्यासाठी तंबू ताकावेत. राहुल काही महिन्यांनंतर मैदानात.

<<जॉर्ज हेडलीला काळा ब्रॅडमन असे म्हणत असत. २२ कसोटीत २१९० धावा (त्यात १० शतके) अशी त्याची कामगिरी होती. म्हणून तो मला योग्य वाटतो.>> मास्तुरेजी , विक्सचं नांव नम्रपणे व मनापासून मागे घेतो. तुम्हीच असं म्हणताय त्याअर्थी माझी काही तरी चूक होत असावी असं वाटलं व म्हणून जरा खोलात शिरलो. २२कसोटीत हेडलीची सरासरी होती ६०.८३ व ४८ कसोटीत विक्सची सरासरी होती ५८.६१. पण प्रश्न २% फरकाचा अजिबात नाही. हेडली भारतात फक्त एक कसोटी खेळला व केवळ दोन धावा काढल्या, तर विक्सने भारताचे तीन सम्पूर्ण दौरे केले व इथं दोनदा त्याची सरासरी होती १००च्यावर व एकदा ८०च्यावर. [त्या इंप्रेशनमुळेच त्याचं नांव हेडलीऐवजी मी सुचवलं होतं ]. त्या उलट, जॉर्ज हेडलीची सरासरी आहे ती त्यावेळच्या जबरदस्त इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या विरूद्ध [जिथं अर्थातच विक्सच्या सरासरीनं भरपूरच मार खाल्ला असणार] ! शिवाय, दुसर्‍या महायुद्धामुळे हेडलीला ऐन बहरात असताना खूपच मर्यादित वाव मिळाला; नाही तर डॉन ब्रॅडमनला "गोरा हेडली" म्हणायची पाळी आली असती, असंही म्हणे म्हटलं जायचं !
तुमच्यामुळे डोक्यातलं एक जळमट दूर झालं. धन्यवाद.

पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच लॉर्ड्सवर कसं काय खेळतायत? का पाकिस्तान संघाला ऑस्ट्रेलियात येण्यास बंदी आहे?

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6164825.cms

तिकडे भारतीय गोलंदाजीची श्रीलंकेने सराव सामन्यात पिसे काढली. यजमानांनी सराव सामन्यात एकाच दिवसात ४३२ धावा कुटताना तब्बल तीन शतके झळकावत धोनीच्या टीमच्या मर्यादा स्पष्ट केल्या.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6164817.cms

मॅच जाईल का? ड्रा तरी करावी.
तो मलिंगाही आपल्या गोलंदाजी ६४ रन काढून पिसं काढतो. सेहवाग टिकला तर परत २०० होऊ शकतात ही वेडी आशा. Happy
लक्ष्मणला परत एकदा नांगर टाकावा लागणार, तो हे नेहमी करतो त्यामुळे त्याची काळजी नाही, पण दुसरे टोक किती लढत देईल ते सांगता येत नाही.

>लक्ष्मणला परत एकदा नांगर टाकावा लागणार, तो हे नेहमी करतो त्यामुळे त्याची काळजी नाही, पण दुसरे टोक किती लढत देईल ते सांगता येत नाही.
२००३ पासून हे एक वाक्य किती वेळा आपण वापरलं असेल नाही? भविष्यकाल ऊज्वल आहे Happy
२०११ world cup नंतर निवृत्तीवीरांची रांग लागेल तोपर्यंत तरी काही पावले ऊचलतात का ते पहायचे.

फार गरम असते हो तिथे. खेळणे कठीण. म्हणूनच सचिन, द्रवीड असे ज्येष्ठ खेळाडू लवकर परततात नि नव्या खेळाडूंना संधि देतात. तेव्हढाच आराम त्यांना.

२०११ world cup नंतर निवृत्तीवीरांची रांग लागेल तोपर्यंत तरी काही पावले ऊचलतात का ते पहायचे.>>लक्ष्मण द्रविड world cup खेळणार आहेत का ? Lol

मार खाण्याची दाट शक्यता. अजून पाच सेशन काढायचे आहेत.
सगळीकडेच पावसाची नितांत आवश्यकता.

मुरलीच्या ८०० विकेटस करण्याच कंत्राट आपल्या टीम ने घेतलेले दिसतेय. तामिळ्नाडूचा जावई आहे ना तो.

SL Deserves to win this Test and Murali deserves 10 wickets!!

असाम्या,
आपल्या संघाची अवस्था बघता, द्रविड, लक्षमण ला नांगर टाकायला घ्यावे लागेल अगदी wc-2011 मध्ये देखिल Happy

गेला वीरू- परत तसाच पहिल्या डावात गेला तसाच.

एकवेळ ह. ह. चं मायबोली चं व्यसन सुटेल पण ऊजव्या यष्टीच्या १० फूट बाहेर असलेल्या चेंडूला बॅट लावायचं वीरू चं व्यसन सुटणार नाही. (त्यासाठी खास फिल्डर ऊभा असला तरी. याला म्हणतात- अनुल्लेख!) Happy

चला बेटींग करा आता..

योग Lol

योग अरे इतक्यातच दोन विकेट्स पडल्या पडल्याच बाराच्या भावत काढलंस टीमला.. नको रे.. जरा अजून वाट पाहू या बेट लावायला..

अजून पण वाट बघायला लागणार बेट लावण्यासाठी.... द वॉल आणि साहेब चिकटलेत आत्ता पर्यंत तरी.. आणि तिकडे ऑसीजची वाट लागलीये... ६२ वर ६ बाद..

गेले बिचारे दोघेहि, नि पहिल्या डावात चांगले खेळलेला युवराजहि गेला! सचिनने भरपूर धावा काढल्या. द्रवीडहि बरा खेळला! आता लक्ष्मण नि धोनी किती वेळ काढतात नि सामना अनिर्णित ठेवतात का हे बघायचे!

ऑस्ट्रेलिया पाकिस्तानविरूद्ध सर्वबाद ८८. कित्येक वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा डाव १०० च्या आत संपला. पाकिस्तान नाबाद ६४. मजा येणार हा सामना बघायला.

आख्खा एक दिवस उरलेल्या ६ जनांना काढायचा. शक्य आहे का ते? नाही. मॅच गेली. अरे त्या पावसाला बोलवा रे लवकर.

लै वाईट दिवस आलेत

>>> आख्खा एक दिवस उरलेल्या ६ जनांना काढायचा. शक्य आहे का ते?

सामना हरल्यातच जमा आहे. मुरली उद्या धमाल करणार. ८०० च्या पुढे जाईल. फक्त पाऊसच वाचवू शकतो किंवा लक्ष्मणला २८१ सारखे पुन्हा एकदा खेळावे लागेल.

Pages