आकार

Submitted by अज्ञात on 18 August, 2010 - 00:28

किलबिलणारी पहाट
अंबर; थवे माळल्या बगळ्यांचे
निळ्या अंतराळात खोल
तरळती विरळ घन मेघांचे

कण बाष्प तयातिल सुकलेले
विरहातिल सल पण थिजलेले
आकार म्हणुन छाया मिरवे
पडघम ओठांतिल विझलेले

सरले गत मळभ गढूळ चिखल
झुळुकेत सुगंध मिसळलेले
गोमयात घर सारवलेले
सारेच नितळ; मन भरलेले

........................अज्ञात

गुलमोहर: 

क्या बात है...क्या समा बांधा है भाई...जियो !!!
सारेच नितळ; मन भरलेले-------------------- लई आवडलं राव !!!!

मी पण तेच म्हणतोय.

व्वा, प्रसन्न पहाटेचे शब्द्चित्र डोळ्यासमोर उभे रहिले,प्रसन्न पहाट आणि प्रसन्न मन, एकदाची झुळुक आली
म्हणायची.