झुंज भाग-२

Submitted by आशिष पवार on 10 August, 2010 - 07:39

राजुचे वडील हकिकत सांगत असतांना त्यांचा मित्र जागीच थबकला,त्याची वाचा अचानक बंद झाली,चेहरा घामाघुम झाला त्याच्या नजरेचा कटाक्ष जागीच रोखल्या गेला.त्याची हि अवस्थ्या पाहुन राजुचे वडील हळुच बोलले
काय झाल तुला?
तुला अस काय होतय?
त्यांचा मित्र दबक्या स्वरातच म्हणाला.............माझा विश्वासच बसत नाहीय?
राजुचे वडील- अरे! हिच अवस्था आमची दोघांची हि झालीय.
राजुच्या वडीलांचा मित्र- मी राजुला पाहिल्यावर मला त्यात तस काही जाणवल नाही.
राजुचे वडील- आमच पण हेच म्हणण आहे.
राजुच्या वडीलांचा मित्र- मग काय झाल?
राजुचे वडील- अरे! त्याच्या ह्या परिस्थिती बद्दल तज्ञ माणसाला विचारले असता,त्याने ठामपणे सांगितल कि,
राजुत एक मानसिक विक्रुत्ती आहे.
राजुच्या वडीलांचा मित्र- आणि ते तुला खरं वाटल.
राजुचे वडील-नाही रे!पण कस आहे, ज्यांनी राजुत मानसिक विक्रुत्ती आहे अस सांगितलय ती त्या क्षेत्रातील एक विदवान व्यक्ती आहे.
राजुच्या वडीलांचा मित्र- ती विदवान व्यक्ती आहे म्हणुन ती खरं बोलते अस तुला वाटतय?
राजुचे वडील-तस नाहीय
राजुच्या वडीलांचा मित्र- मग कस आहे, तुच सांग आता............
राजुचे वडील-रडता-रडता म्हणाले खरच हे काय चाललय, मलाच काहीच कळत नाहीय.मी अक्षरशः वैतागलो तिच -तिच गोष्ट ऐकुन कि राजुत एक मानसिक विक्रुत्ती आहे.
राजुच्या वडीलांचा मित्र- तुला विश्वास आहे ना, कि तुझा मुलगा राजु आपल्या सारखाच साधारण आहे.तर मग हिंम्मत हारु नकोस.परिस्थितीशी लढ तिचा सामना कर आणि बघ सार काही ठिक होउन जाईल.
राजुचे वडील- तुझ्या बोलण्या सारखच व्हाव, हिच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.
राजुच्या वडीलांचा मित्र- तर समज पुर्ण झाली तुझी प्रार्थना.
राजुचे वडील-खुप दिवसानंतर आज खर्‍या अर्थाने बरं वाटलय या जीवाला.आज मला समजलय कि,मित्र सुर्या सारखा तेजस्वी का असावा आणि आपले चुकते पाउल वळनावर फिरवणारा का असावा?
राजुच्या वडीलांचा मित्र-अरे! असु दे एवढया उपमा देउ नकोस,नाही तर मी हवेत जाईन.
राजुचे वडील-तु हवेत जा,अगर जमीनीवर रहा. मला तर अस वाटतय कि, तुला परमेश्वरानेच माझ्या मदतीसाठी पाठवल असाव.
राजुच्या वडीलांचा मित्र-मग असच काही समज.
राजुचे वडील-आता तुच सांग पुढे मी काय करु?
राजुच्या वडीलांचा मित्र- प्रथम हि गोष्ट घरातच राहु दे आणि याबद्दल बाहेर कुणाला, चुकुनही सांगु नको.
त्याला जेवढा वेळ घराबाहेर, मित्र मंडळी, नातेवाईक,प्रवासात अथवा लोकांच्या वर्दळीच्या ठिकाणी नेता येणे शक्य असेल त्या ठिकाणी आवर्जुन नेत जा.मग बघतो,कोण तुझ्या राजुला मानसिक विक्रुत बोलत.
राजुचे वडील-माझ्या मनातल बोललास.........
राजुच्या वडीलांचा मित्र- अरे! हेच तर काम आहे माझ.
राजुचे वडील- म्हणजे काय, मी समजलो नाही.
राजुच्या वडीलांचा मित्र-अरे! वेडया मी एका सरकारी इस्पितळात समुपदेशक म्हणुन काम बघतो.
राजुचे वडील- समुपदेशक म्हणजे तेच ना, जे विविध विषयांवर/आजारांवर लोकांना इस्पितळात मार्गदर्शन करतात.नेहमीच चित्रपटात पाहतो ना म्हणुन माहितीय.
राजुच्या वडीलांचा मित्र- हो तेच.
राजुचे वडील-आता सगळ तु सांगितल्या प्रमाणेच होईल.
राजुच्या वडीलांचा मित्र- मी सांगितल अस म्हणण्यापेक्षा, त्या परमेश्वराला जे मंजुर आहे तेच होईल.
राजुचे वडील- सगळ काही आपण करणार मग परमेश्वराला जे मंजुर आहे ते कस होईल? मला काही समजल नाही.
राजुच्या वडीलांचा मित्र- हेच तर खुप मोठे रहस्य आहे कि, ज्याचे कोडे आजपर्यंत विज्ञान सुद्धा उलगडु शकले नाही.
राजुचे वडील- म्हणजे तु काय बोलतोय माझ्या सारं डोक्याहुन जातय.मला निट सांग.....
राजुच्या वडीलांचा मित्र- अरे! वेडया सोपं आहे "प्रयत्न करन हे आपल्या हातात आहे; यश देण किंवा नाही देण हे सारं त्या परमेश्वराच्या हातात आहे."
राजुचे वडील- तुला काय म्हणावे
शब्द नाहीय, माझ्या जवळ
राजुच्या वडीलांचा मित्र- काही म्हणु नको! मी जेवढ सांगितल ना तेवढ कर.
चल आता निघतो मी,पुन्हा भेटु.
राजुचे वडील- पुन्हा कधी येशील?
राजुच्या वडीलांचा मित्र- राजु एक मोठा माणुस झाल्यावर............
राजुचे वडील- मित्राला निरोप देतांना म्हणाले........माझे आयुष्य तुझ लाभो! आणि बघता -बघता राजुच्या विचारात पुन्हा रुळले..........
क्रमशः

गुलमोहर: 

काहिच समजले नाही.
ही कथा वाचायला फार अवघड जातेय.
प्लीझ जरा सुट सुटीत आणि वाक्यात पन्च पण नाहीत.
साधी कथा ही भाषा शैलीनी अप्रतिम बनवता येते आणि सुन्दर कथा अपुर्‍या लिखाणा मुळे बिघडते.
कथेचा फ्लो छान आहे.
पु.ले.शु.

शेवटी सुधारणा प्रयत्नानीच तर होते.
शुभेच्छा.

तृष्णा.......तुला जे म्हणायचे आहे ते माझ्या लक्षात आले.
अग! पण कथेत अजुन विविध नाटकीय वळणं यायचे आहेत..........हि निव्वळ सुरवात आहे.
कथा अखंड वाचत रहा , मग तुला आपोआप सारे कळेल.

राजुचे वडील
राजुच्या वडीलांचा मित्र
राजुचे वडील
राजुच्या वडीलांचा मित्र
राजुचे वडील
राजुच्या वडीलांचा मित्र
राजुचे वडील
राजुच्या वडीलांचा मित्र
राजुचे वडील
राजुच्या वडीलांचा मित्र
राजुचे वडील
राजुच्या वडीलांचा मित्र
राजुचे वडील
तुम्हीच सांगा की कसं वाटतंय ? अहो नामकरण करा की......

भुषण,
ही तर सुरूवात आहे... नाट्यमय वळणे अजून यायची आहेत. ती आली की वळणावर मोठ होर्डींग आहे त्यावर सगळी नावं आहेत... वळणाची वाट बघ....

या कथेतील सगळ्या ओळींची सुरूवात "राजू" (च्या, ची चे ) या शब्दापासून होते...

खात्री नसेल तर वरची कथा वाचाच. ("राजुच्या" विळख्यात सापडून "भोवळ" येवून पडल्यास मी जबाबदार नाही...:) )

("राजुच्या" विळख्यात सापडून "भोवळ" येवून पडल्यास मी जबाबदार नाही... )
Rofl
रात्री झोपेत हसणार मी....
थांबवा रे थांबवा.... ते कंट्रोलच बीबी कुणी सुरू केलेलं त्याना काही उपाय माहिती आहे का विचारा....

या कथेतील सगळ्या ओळींची सुरूवात "राजू" (च्या, ची चे ) या शब्दापासून होते...

खात्री नसेल तर वरची कथा वाचाच. ("राजुच्या" विळख्यात सापडून "भोवळ" येवून पडल्यास मी जबाबदार नाही...स्मित )>>>>>> Lol

ही कथा जे वाचतील (आणि वाचून वाचतील) त्यांच्या पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये कुणी मुलाचे नाव राजू/राजेश ठेवणार नाही Proud

ही कथा जे वाचतील (आणि वाचून वाचतील) त्यांच्या पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये कुणी मुलाचे नाव राजू/राजेश ठेवणार नाही

मंद्या Lol

अगदी कुत्र्याचंसुध्दा Lol

आमच्या कोकणात की नाही नारळापासून(खरे तर शहाळ्याच्या आवरणापासून) दोरखंड वळायचे (आता वळतात का माहित नाही) त्याला तिकडे राजू म्हणतात. (रज्जुचा अपभ्रंश?) 'त्या' राजूचा विळखा असे तुला म्हणायचेय का अमित?

कथा वाचली. मुद्दा लक्षात आला नाही. वाक्यांमधल्या गॅप अनुपस्थित असल्यामुळे व सतत 'राजूचे वडील, राजूच्या वडिलांचे मित्र' असे उल्लेख असल्याने तसदी होत आहे.

पुढचा / चे भाग आल्यानंतर कदाचित लक्षात यावे.

तरीही 'केलेले खच्चीकरण' जरूरीहून अधिक वाटले. क्षमस्व!

-'बेफिकीर'!

त्याच्या ह्या परिस्थिती बद्दल तज्ञ माणसाला विचारले असता,त्याने ठामपणे सांगितल कि,
राजुत एक मानसिक विक्रुत्ती आहे.
कथेतील "दहावी ओळ".....(माझा विश्वास नसेल तर वाचून पहा किंवा मोजून पहा.)

कशाला उगाच त्या राजूचं नाव बदनाम..."मानसिक विकृती" राजूत नसून "लेखकात" आहे..

कथेत पुढे "मानसिक विकृती" हा शब्द चारदा भेटून जातो....

अजून किती भाग (आमच्यासाठी "भोग") यायचे आहेत. रामुच्या "फुंक"सारखे ..:)

सगळी तीच मंडळी इथेपण ... काय पण कार्यतत्पर रे तुम्ही लोकं... Happy

लेखक, यांना मुक्त करणं आता तुमच्या हातात (लेखनात असे वाचु नका) आहे.... Wink

आता याला सोडा रे सगळ्यांनी.. नाहीतर याला मी 'पुलेशु' देइन.. मग पुढच्या परीणामांना तयार रहा..
सगळ्याची मग वरची आर्या होइल हा.... Lol

ashuchamp

ही तर सुरूवात आहे... नाट्यमय वळणे अजून यायची आहेत.

हळूहळू उलगडा होईल