माझी सोनुली

Submitted by आशिष पवार on 10 August, 2010 - 03:25

कधी घुटमळते
कधी बडबडते
माझी सोनुली
तुरुतुरु पळते

क्षणात हसते
क्षणात रडते
माझी छकुली
लाडात वाढते

बोबडी बोलते
बाबा म्हणते
माझी तान्हुली
हट्ट करते

घराचे प्राण
वंशाची शान
माझी मयुरी
लक्ष्मी प्रमाण

आभाळाची माया
बहिणीची काया
माझी लाडली
आईची छाया

घराची ताऊ
गल्लीची चिऊ
माझी चिमुरडी
आमचा जीऊ.......................................(जीऊ हा शब्द-जीव म्हणुन वापरला आहे)

मुला समान
तिला मान
माझी सोनुली
समाजाची आण.

गुलमोहर: 

घराची ताऊ
गल्लीची चिऊ
माझी चिमुरडी
आमचा जीऊ.......................................(जीऊ हा शब्द-जीव म्हणुन वापरला आहे)

ती "सोनुली"पण या बाळ(बोध???)कवितेचा "धसका" घेईल.......:(

आता आमचा जीऊ नाही जाणार. सोनुलीला जिऊ घाल.
माझी सोनुली
समाजाची आण>>>
कोणाला आणायला सांगताय?
असेच प्रयत्न करीत रहा. जमून जाईल. भल्याभल्यांना जमलंय!

छान..

घराचे प्राण
वंशाची शान
माझी मयुरी
लक्ष्मी प्रमाण.... इथे प्रमाणे पाहिजे पण ते लयीत येत नाही म्हणून समान वापरायला हरकत नसावी. प्रमाण या शब्दाचा अर्थ पुरावा असा होतो.

मुला समान
तिला मान
माझी सोनुली
समाजाची आण. या आणचा अर्थ नाही समजला.

पुलेशु.

समितीचे काम योग्य दिशेने चालले आहे... अखंड मार्गदर्शन... Lol अनुमोदन ह बा
आ.पं. वर आणि त्यांच्या कवितांवर समितीचा विशेष जीव आहे हेही वेळोवेळी जाणवतेच...:हाहा:

नॉट बॅड अ‍ॅट ऑल..

पुचांलेशु... (इथे चां हे चांगल्या या अर्थी वापरले आहे Happy )

आण म्हणजे हिंदीत आन असते ना आन बान शान मधली ती. असा प्रत्येक शब्दाचा योग्य त्या भाषेतला अर्थ शोधला तर .....

छान कविता. Happy

xxx आमचा शहाणा,
मोत्याचा तो दाणा

वगैरे टाईप कविता / बोलगीते असतात मुलांच्या praise मध्ये म्हणायची तशी वाटली ही कविता. Happy

छान!!!