न्याय

Submitted by harish_dangat on 7 August, 2010 - 19:22

एक घार उंच आकशी
खाली ठेउन सारे लक्ष
उपवाशी पिलासाठी
ती शोधीत होती भक्ष

पिले नुकतीच उबवलेली
उघडले नव्हते डोळे
कोवळ्या पिसात झाकले
लाल मांसाचे गोळे

झाडांच्या गर्दीत तेथे
होती एक अरुंद घळ
नागीनीची दोन पिल्ले
करीत होती वळवळ

एकदाच टाकला तिने
पिलावरती दृष्टीक्षेप
तिक्ष्ण नखांनी उचलली
क्षणार्धात घेउन झेप

एक नागीन शोधीत होती
पोटासाठी दोन घास
अंडी उबवताना तिने
काढला महीन्याचा उपवास

झाडाच्या खोबणीत तिला
जाणवली हालचाल
घारीची पिल्ले तिथे
जन्मली होती काल

झाडावरती चढून गेली
नागीण ती सरसर
मिटकावली ती पिल्ले
क्षणात मिळता अवसर

हरीश दांगट

गुलमोहर: 

हं...!
पण हे रूपक म्हणुन बघितले
तर समाजाचा एक विद्रुप चेहरा डोळ्यासमोर समोर आल्याशिवाय राहात नाही.