थयथयाट

Submitted by harish_dangat on 6 August, 2010 - 01:47

(बायको चार दिवस माहेरी पाहूणचार झोडून परत आल्यावर जो थयथयाट करते, त्याचे वर्णण आहे)

चार दिवस घरी नाही, काय कळा आली घरा
घर कशाला म्हणायचे, यापेक्षा उकिरडाच बरा

बाथरुम मधे बघा, पडलाय कपड्यांचा ढिग
किचनमधे लांबलचक, लागली मुंग्याची रीघ

चार दिवस भुईने बघा , झाडू पाहीला नाही
मी घरात नाही तर, घरात राम राहीला नाही

पातेल्यात पडलीय , बिनामिठाची आमटी
तव्यावर पडलीय, काळी जळालेली दामटी

सोफ्यावर पडलाया , जाड धुळीचा थर
तुम्हीच सांगा आता, गोठा आहे का घर

सिंकमधे पडलया, कालचं खरकटं ताट
चार दिवस नाही, लागली घराची वाट

कोण आलं कोण गेलं, कुणाचा ना मेळ
संसार कशाचा हा, चाललाय पोरखेळ

एक मी आहे म्हणून , चालतय हे घर
दुसरी एखादी कधीच , गेली असती वर

-हरीश दांगट

गुलमोहर: