अंदाज

Submitted by राजेश्वर on 6 August, 2010 - 01:44

अंदाज वर्तवणे ही एक कला आहे, आणि तो बरोबर येणे म्हणजे अंदाज वर्तवणारा अभ्यासु आहे एवढेच मी म्हणेल.आता आमच्या गप्पा क्रिकेट वर चालु होत्या, भारत २०-२० वर्ल्ड कप हारला होता तर आमच्या मित्रांनी सांगुन टाकले की सामने फ़िक्स होतात आणि भारत आणि पाकिस्तान फ़ायनल मध्ये येणार आहे कारण काय तर सर्वात जास्त सम्पत्ती भारत क्रिकेट बोर्डाकडे आहे.
भद्रा मारोतीला पायी जायचे म्हटल्यावर ४ झण तयार झाले पण ऎन वेळेवर सर्वांचे अंदाज खोटे ठरवित सचिन गळाला अन प्रभाकर तयार झाला.
माझा मित्र मनोज ४ वर्षापासुन शेअर बाजारात खेळ्तो या अंदाजावरच की एका वेळी १० लाखाचे कर्ज चुकते करेल.
पंकजचे मात्र ७०% अंदाज खरे ठरतात आणि सर्व मित्र त्याचा सल्ला घेतात यामध्ये, नविन खरेदी करणे, नोकरी सोडणे, धरणे, इत्यादी प्रकार आहेत.
आज आमचा अंदाज होता की साहेब येणार नाहीत त्यामुळे ग्रुपगप्पा चालु होत्या आणि साहेब हजर.
थोडक्यात अंदाज चुकतात आणि मग--- जाऊदयान. तुमचे सांगा.

गुलमोहर: