'ए मर्कटा' 'मूर्खा' अशी लाडात हाकच मारली

Submitted by रत्नाकर अनिल कमलाकर on 4 August, 2010 - 15:41

हझल:

माझ्या नको त्या नासक्या नादात खाजच वाढली
त्या बेरक्यांनी ऊडत्या तालात लाजच काढली

(बांबूतली ती शीळ का कानात गातच वाजली?
मी वाहताना मोकळा, रानात सादच वाढली)

माझी कशी ती योग्य मापे आज त्यांनी काढली
जी मारली चप्पल मला, पायात छानच मावली

थोबाड माझे एव्हढे का आवडे त्यांना मुळी ?
की डांबराने, दृष्ट ती गावात आजच काढली

गाली खळी ती पीकदाणी, पानदानच वाटली
तोंडावरी नक्षी कशी थाटात छानच काढली

तो पूर्वजच का आठवे बघताच माझे थोबडे
'ए मर्कटा' 'मूर्खा' अशी लाडात हाकच मारली

सौंदर्य माझे देखता ते दोन पाय शिवशिवले
प्रेमात माझ्या प्रूष्ठभागी लाथ छानच मारली

त्या नग्न जीभेला किती ती धार त्यांनी लावली
ऊध्दार साऱ्यांचा करत बारात छानच काढली

गुलमोहर: 

वैद्यबुवा, धन्यवाद.
दुसरा शेर लिहीला खरा, पण तो हजलेत बसत नाही त्यामुळे तुमचे म्हणणे रास्त आहे.

श्री,
अजुन तरी धुलाई कोणी केली नाही, पण थोडक्यात काही प्रसंग हुकले.
तोंडाला काळे फासणे, शिव्या देणे, लाथा घालणे, धिड काढणे, तोंडावर थुंकणे सगळे प्रकार काल्पनिक अनुभवलेले आहेत.
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.

ऋयाम,
दु:खात सहभागी झाल्याबद्द्ल धन्यवाद.
अरे, शांत झालात की काय? ईतक्यात नको, स्तब्ध व्हावे ईतका काही मी मार खाल्लेला नाही.

झकास Wink

Lol जुन्या मायबोलीवरचे एक विडंबन मला माझ्या मैत्रिणीने चालीत ऐकवले होते त्याची आठवण झाली.

ते विडंबन कुणी लिहीले होते ते नाव माहीत नाही. ( प्रसाद शिरगावकर असावेत का?:अओ:)

रेशमाच्या बापाने लाल काळ्या हाताने
कानाखाली जाळ माझ्या काढीला
हात नका लावु माझ्या पोरीला.:खोखो:

हात नका लावु माझ्या पोरीला.>>>ईथे ..हात नका लावु त्याच्या पोरीला....असावे असे वाटते

असे कसे? कानाखाली जाळ काढत असतांना कवीला पोरीचा बाप सांगतोय की माझ्या पोरीला हात लावु नको.:फिदी:

अच्छा...पहिल्या दोन ओळी कवीने म्हणायच्या आणि तिसरी ओळ रेश्माच्या बापाची आहे होय.....

मला वाटले तिन्ही ओळी कवीच म्हणतो....मग रेश्माच्या बापाने कानाखाली जाळ काढल्यावर त्याच्या(कवीच्या) पोरीला हात लावायचा नाही असे तो का म्हणेल....असो गैरसमज झाला Happy