"गणेशगीत"

Submitted by निलेश उजाल on 4 August, 2010 - 04:25

मझ्या मना शांतवणारा ऋतु पावसाचा आला
मोहरला निसर्ग सारा,गणेशाच्या स्वागताला__॥ध्रु॥
सारी गंधारली धरणी माता,
स्वारी गणेशाची दारी येता(२)
शाहीरांनी मग काव्ये गाता,
गण रणामध्ये नाचत येता(२)
#देव नाचले हो छुम-छुम त्रिभुवन गेले हर्षुन(२)
असा नृत्य मनोहर पाहुनी,देव दरभार गजबजला___॥१॥
मना-मनात भरला गणेश,
पाना-फुलात हसला गणेश(२)
सुखसमृध्दीचा आभास,
छेडीतो माझ्या मनास(२)
#या मुर्खाच्या बाजारा,अहो देवा तुम्ही सुधारा(२)
गेली लयाला पुण्याई,याहो गरिबांना तारायला___॥२॥
पुजू गणाची मंगलमुर्ती,
तोची देईल जगण्याला स्पुर्ती(२)
त्याची युगायुअगांची ही किर्ती,
दु:ख दारिद्र्य दुर पळती(२)
#सुखकर्ता-दु:खहर्ता,तुची आमचा पालनकर्ता(२)
तव कृपेने गणराया लागला निलेश लिहायला___॥३॥

गुलमोहर: