माझ्या आईने केलेलं भरतकाम

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 4 August, 2010 - 01:53

हे माझ्या आईने माझ्या ड्रेसवर केलेलं भरतकाम -

आणि हे मी आणि आईने मिळून केलेलं शिरीनसाठी दुपटं -

गुलमोहर: 

दुपटं खूपच सुंदर झालंय. सगळे डिजाईन्स एकसे एक आहेत त्यावरचे.
ड्रेस चा रंग माझा एकदम फेवरेट आहे. भरतकाम पण सहीच.

मस्त!:)

सगळ्यांना धन्यवाद Happy

पुण्यात बेड्शीट \ ड्रेस वर छापून कुठे मिळतं ? सध्या मी शनिपारच्या इथे एक दुकान आहे तिथून घेते करून.

<<पुण्यात बेड्शीट \ ड्रेस वर छापून कुठे मिळतं ? सध्या मी शनिपारच्या इथे एक दुकान आहे तिथून घेते करून.<<
शनिपाराजवळ 'चिंतामणी एम्ब्रॉयडरी' बेस्ट! )

कच्छी टाका ! मस्त भरलाय. आणि दुपटं कसलं क्युट आहे. क्रॉस स्टिच एव्हढी सुरेख मी बघितली नव्हती.

आत्ता आईला दाखवल्या प्रतिक्रिया , आईकडून सगळ्यांना धन्यवाद !!!!!!!

प्राजक्ता, काम अप्रतीम झालेय.
तू सम्राटमधे विचारलेस का ते छापून देतात का ते? पूर्वी द्यायचे आता कदाचीत आउटसोर्स केले असेल Happy

तू आणि आईने घरी छापले तर २ एक तासात छापून होईल.

फुले मंडईच्या समोर विश्व नावाचे दुकान होते आता कुठे शिफ्ट झाले माहीत नाही.ड्रेस खूप सुंदर झालाय.

@ मिनोती , सम्राटमधे विचारलं पण जास्त डिझाईन्स नव्हती , एकच कॅटलॉग होता

ड्रेसचं कापड आणलं की नक्की कुठे छापायचं ते नाही कळत Sad

पूर्वी माझी मावशी अहमदाबादला होती तेव्हा तिथे छान मिळायचं छापून

Pages