नजर

Submitted by saakshi on 3 August, 2010 - 11:01

नजर....
कसला शब्द आहे ना हा....! जग अनुभवण्याचा सोहळा सुरू होतो बघण्यापासून.... आईच्या नजरेतून आपण जग बघायला शिकतो.

लहानपणी आई सांगायची, "बाळा, त्या रस्त्यावर बाऊ रहातो, तिकडे जायच नाही हं..."
डोळे मोठे करून मी ऐकत रहायचे... तो बाऊ त्या गर्दीच्या रस्त्यावर छोट्या मनूनं जाऊ नये म्हणून रहायचा, हे खूप दिवसांनी कळलं, तोपर्यंत बाऊ वगैरे गोष्टींची भिती वाटायची बंद झाली होतं...

शाळेत होते तेंव्हाची गोष्ट... आमचे खेळांचे सामने चालू होते. आमच्या वर्गानं दुसरया वर्गांना हरवून आम्ही semi-final जिंकली होती. final ला आमच्या च ईयत्तेतली दुसरी तुकडी आमच्या विरुद्ध होती... त्यावेळी दिलेली खुन्नस अजून आठवते... तो सामना आम्ही जिंकल्यावर जे काही होतं आमच्या नजरेत ते शब्दात सांगणं अवघड आहे...We are the best असण्याचा अभिमान..."कशी जिरवली" types खुन्नस आणि final जिंकल्याचा आनंद....

पहिल्यांदा hostel वरून घरी येत होते, तेंव्हा पप्पांचा सल्ला, "मन्या, लक्ष ठेवायचं आजूबाजूला... प्रवासात सावध रहावं नेहमी..." आज इकडेतिकडे भटकताना तीच सावध नजर मदत करते...

पुढे college ला आल्यावर "नजरे करम..", "नजरके सामने..." असली गाणी का लिहिली गेली असतील हे हळूहळू कळायला लागलं...
group मध्ये एखाद्या मित्राची group मधलीच एखादी मैत्रीण आल्यावर बदलणारी नजर.... आणि त्या नजरानजरेकडे टक लावून बघणारे आम्ही उरलेले दोस्त लोक!! Happy
वर्गात lecture ला timepass comments pass करताना सरांनी डोळ्यांनीचं दटावणं... proxy लावताना कोणी पकडणार तर नाही ना म्हणून घाबरणारी नजर....
class room मध्ये आलं की आपला कंपू शोधणारी नजर....
lecture संपायला आलं की घड्याळाच्या काट्याला चिकटून राहणारी नजर... result लागला की marklist हातात पडेपर्यंत कावरी बावरी होणारी नजर....

पुढे पुढे नजरेचे पण हजारो अर्थ असतात हे कळालं.... कोणीतरी पाहिलं की आपोआप खाली जाणारी नजर, वेडावलेली नजर... कुणावरून तरी न हटणारी नजर... कोणाची तरि वाट बघणारी, अपेक्षित व्यक्ती दिसल्यावर ओठांवरच्या हास्याचा आरसा होणारी नजर.... आणि नाही दिसली तर
हिरमुसलेली वेडी नजर....

परवाच कुठेतरी वाचलं,
"एखाद्या वक्ती कडे १ मिनिटापेक्षा जास्त पाहणं is not good म्हणे!!!" Happy
म्हटलं जाउ दे... नजरेचा खेळ असाच असणार.....

गुलमोहर: 

छानच

छान ...
आमचा एक मित्र लग्नाला ६ वर्ष होऊन ही दुर वर 'नजर' ठेवुन असतो.
मग आम्ही म्हणतो, त्याची नजर अजुन 'नीवळली' नाहीये ... Wink