माझे टाकाऊ पासुन टिकाऊचे प्रयोग - पर्स

Submitted by मिनी on 2 August, 2010 - 12:07

मला शिवणकामाची खुप आवड आहे. इथे अमेरिकेत घरी शिलाई मशिन नाही म्हणुन काही करता येत नाही. पण भारतात असतांना मी वेळ मिळेल तसं शिवणकाम करायचे.

हि घरच्या घरी अगदी २०-३० रुपयात केलेली पर्स. ह्यासाठी मी घरी असलेले प्लॅस्टीकच्या पातळ फाईल्स (जेणे करुन पर्स वॉटरप्रुफ होईल) , काळ्यारंगाचे कापड (हे नविन विकत आणले), फ्रॅब्रीक पेंटीगचे रंग, आतुन अस्तर लावण्यासाठी घरी असलेले सुती कापड, चेन्स इतक्या गोष्टी वापरल्या. आधी नविन कापड धुवुन घेतलं आणि ते कडक वाळल्यावर त्यावर इस्त्री फिरवुन मग वारली पेंटींग केलं. आणि मग हव्या त्या आकारात पर्स शिवली. आतुन अस्तर आणि सुती कापडाचे २-३ थर लावले म्हणजे पर्स स्टेडी आणि दणकट होईल. आतुन २-३ कप्पे पण केले आहेत.

ही पर्स ५-६ वर्षांपुर्वी केली आहे आणि मैत्रिणीला गिफ्ट म्हणुन दिली होती. तिने ती अशक्य पुदाडली आहे. पण अजुन व्यवस्थित आहे.

DSCN0613.JPGDSCN0614.JPGDSCN0615.JPG

गुलमोहर: 

सही पर्स आहेत मिनी. भेट द्यायला एकदम उपयुक्त. इथे पण करून ऑर्डर्स घ्यायला लाग की.

मिनी,खूप छान आहे तुझी कल्पना....मस्त झाली आहे ही पर्स.बाकीचे म्हणतात तसे मशिन घेऊन शिवायला सुरु कर..पहिली ऑर्डर माझी Happy

मस्तच गं मिनी. बघ इथे मैत्रिणींच्या कित्ती ऑर्डर्स आल्या ते. मी पण तुझी मैत्रिण + शेजारीण Wink आहे हे लक्षात आहे नां?

Pages