...तेव्हा माझी चिडचिड होते

Submitted by अविकुमार on 22 July, 2010 - 08:41

नमस्कार मंडळी.

आपल्या सर्वांचीच कधी ना कधी चिडचिड होत असते (हो..आता काही सन्माननीय योगी असतीलही ज्यांनी यावर विजय मिळवला असेल). कारण छोटं असो अथवा मोठं. पण काही काळासाठी का होईना, ही चिडचिड आपला रक्तदाब नक्कीच वाढवून जाते.

चला तर मग्..या चिडचिडिला या पानावर रस्ता करुन देउया..अंशतः का होईना जर ही चिडचिड कमी झाली तर बरेच नाही का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हि चिडचिड कधी कधी क्षुल्लक कारणानेही असू शकते बरं का!

तर अशीच माझी एक चिडचिड..कारण क्षुल्लक अगदी...किंबहूना उगाच..

एखाद्या बीबीवर प्रतिसाद दिल्यावर मी लगेचच तो बीबी रांगेत पहिला आला की नाही हे पहायला 'नविन लेखन' या पानावर येतो. आणि तेव्हा हमखास त्याचवेळी दुसरा बीबी पहिल्या स्थानावर आलेला असतो आणि मी प्रतिसाद दिलेला बीबी दुसर्‍या किंवा तिसर्‍या स्थानावर फेकला गेलेली असतो. तेव्हा माझी विनाकारण चिडचिड होते. Happy (सहसा 'कटटा' हा बीबी पहिल्या स्थानावर असतो तेव्हा!) Happy

सहसा 'कटटा' हा बीबी पहिल्या स्थानावर असतो तेव्हा!) >>> आत्ता माझी झाली खुप चिड्चिड. काहो तुम्हाला का नाही पहावत आमचा कट्टा वर आलेला Angry

Light 1 घ्याच Proud

अ॑र्रे... मी लिहिलेला बीबी जेव्हा पहिल्या स्थानावर नसतो तेव्हा 'कट्टा' हा बीबी पहिल्या स्थानावर असतो हे निरिक्षण नोंदवले मी. बाकी त्या दिव्यांमागचे जळणारे पतंग दिसत आहेत हो मला. खासकरुन खालील ओळींवरुन. Happy

<<<वर्षा_म | 22 July, 2010 - 18:26 नवीन
http://www.maayboli.com/node/18055

हाना रे याला >>> Light 1

अविकू
माझी आत्ता भयंकर चिडचिड होते आहे. घटना एकदम ताजी काही तासांपुर्वीची.
हडपसर वरून दुचाकीवर घरी येत असताना बिग बाझार च्या अलिकडे रस्त्यात काहितरी सांडलेले होते.
चुकवता नाही आले. मग काय
फर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र गाडी घसरली. गाडी वेगात नसल्याने लागले नाही. रस्ता ओलांडणार्‍या काही लोकांनी मदत केली. तितक्यात आजून एक जण कोसळला. दुसर्‍या गाडीवरील मागे बसलेल्या माणसाने मागुन येणार्‍या गाड्यांना सावध केले आणि तिथे माती टाकली. मग मात्र अक्षरश: ते जे कोणी सांडले होते त्याचा नावाने शिव्या हासडल्या.

फार वाईट घटना सचिन. तुम्हाला लागले नाही ना कोठे?

तेच स्थळ, बीग बझार समोर, ५ वर्षापूर्वी, माझ्याबरोबरही अगदी हीच घटना झाली. तेव्हा बराच मुका मार लागला होता आणि माझी आवडती जिन्स फाटली होती.

आत्ताच तासाभरापूर्वीच मी सुध्धा तिथूनच आलोय. पण सुदैवाने पावसामूळे चार चाकीमधे होतो.

मी बराच सावध होतो. पँट गुढग्याच्या वर पर्यंत फाटली. पण केवळ काही ओरखड्यांवर निभावले.

तिथुन पुढचा प्रवास म्हणजे आगदी
बाजूने जाणारा प्रत्तेकजण माझ्या फाटक्या पँटकडे पहात होता.

नशीबवान आहात्. रोज पी.एम्.पी.एम्.एल ने जाऊन पहा. रोजच काही नविन आणि चुकीच दिसत. मग रोजच चिड चिड होते.