कविता, कवी अन् ढोंग!

Submitted by ट्यागो on 21 July, 2010 - 06:54

प्रश्न पडतात? का?
कसे? कशाला?
असंच का? तसंच का?
मांडता येतात पोटतिडकीने?
उत्तरं मिळतात? शोधाविशी वाटतात?

प्रगल्भतेची आस आहे?
चांगल्याची भूक अन्
वाइटाची चीड आहे?

जगावरचा राग
शब्दांत उतरतोय?
स्वता:वर ताबा..... शब्दांनी येतोय?
सृजन विचार अस्वस्थ करतात?
कुठल्याही क्षणांपेक्षा मोठे वाटतात?
माणूसपणा जिवंत ठेवतात?
मग ती कविता अन् तू कवी!!

शब्द जोडायचं ढोंग कधी करु नकोस,
ते तुझाच घात करतील,
जे उमटतंय तेच लिही
अन्यथा तेच साथ सोडतील!!

मयुरेश चव्हाण, मुबंई.
२०.०७.१०, १८.४५

गुलमोहर: 

शब्द जोडायचं ढोंग कधी करु नकोस,
ते तुझाच घात करतील,
जे उमटतंय तेच लिही
अन्यथा तेच साथ सोडतील!!

अगदी खरं...

छान कविता. Happy

ढोंग फक्त संतानीच नाही केलं, म्हणुन त्यांना संबंध समाजाने स्विकारलं.

बाकी सब झुठ.
म्हणुन तर कविकडे समाज कुचेष्टेच्या नजरेने बघतो.

त्यांचं काय आहे, भावना ज्या शब्दांतून उफाळून येतात त्याच शब्दांत कविता झाली पाहिजे हा आग्रह चुकीचा आहे. कारण शब्दांवर नियंत्रण कवीने ठेवलेच पाहिजे; ते त्याचे कर्तव्यच आहे. आणि तसे करूनही प्रसादगुण राखला पाहिजे. हे अभ्यासाशिवाय साध्य होणार नाही.

अर्थात काव्यबीज हे भावनेतूनच येणार. त्याबरोबर प्रामाणिक राहिलेच पाहिजे. Happy

भरतजी,
तेव्हाही आणि आजही या देशातील जास्तीत जास्त घरात
ज्ञानेश्वरी किंवा तुकोबांचे अभंग गायले जातात.

तेवढ्या प्रमाणात साहित्यिकाचे पुस्तक वाचले जात नाही.
किंवा लोकांनी मुखोदगत करण्यामध्ये तुकोबांच्या भजनांची उंची कवितेला गाठता आली नाही.

(समाज म्हणजे या देशातली १०० टक्के जनता असे मी गृहित धरतो)

...