Submitted by लाजो on 20 July, 2010 - 08:53

आला आला पावसाळा, दवंडीवाला पिटाळा
माबोच्या वविची बातमी कळवा हो सकळां...
पटापट वर्गणी भरा, तयारी लगेच सुरु करा
त्याआधी विकत घ्या, माबोचा चहा सदरा...
काय काय करणार, कोण कोण येणार
येतो म्हणुन न येणार्याला टांगारु म्हणणार... 
तारिख जुलैची अठरा, युकेवर भरली जत्रा
आयुष्यातल्या चिंतांवर वविची हमखास मात्रा...
मस्तीचे सगळेच दिवाणे, गप्पांचे मारले फकाणे
सांसची सुरुवात केली आयड्यांचे घेऊन उखाणे... 
खेळ खेळलो भरपुर, हादडलो फुटेस्तोवर ऊर
वविच्या या अनोख्या क्षणांचा, आनंद घेतला पुरेपुर..
यो दगडाने नाचली लावणी, घसा दुखेस्तोवर गायली गाणी
निघताना मात्र डोळेच काय ढगांनीही पाझरले पाणी... 
सोमवारी माबोवर एकच सुर, फोटो आणि वृत्तांताचा आला महापुर
आनंदाच्या या सोहळ्याला मात्र मुकलो आम्ही कारण, रहातो खुप दुर..................
लाजो 
गुलमोहर:
शेअर करा
लाजो, मी हे तुझं लिखाण कसं
लाजो, मी हे तुझं लिखाण कसं मिसलं?? भारी लिहिलीयेस की ग कविता....
लाजो .. मस्तच लिहली आहे कविता
लाजो .. मस्तच लिहली आहे कविता तुम्ही
खुप खुप आभार
खुप खुप आभार
एकदम भारी...
एकदम भारी...
मस्त...
मस्त...
लाजो मस्तच कविता तुमही
लाजो मस्तच कविता
तुमही हुरहुर जाणवली.
मी हे तुझं लिखाण कसं मिसलं??>>>>>> मीसुद्धा
मस्तच लिहीलयस ग .... आणी
मस्तच लिहीलयस ग ....
आणी काहीच्या काहीत का टाकलीस ....
आणी "यो दगड" "चहा सदरा", "टांगारु"
काय स्वतःचा शब्द कोश काढणारेस का......
जाऊद्या आता पण जस डीजेईन बाई म्हणाल्यात..
गणपती बाप्पा मोरया
पुढ्च्या वविला नक्कि या...
आनंदाच्या या सोहळ्याला मात्र
आनंदाच्या या सोहळ्याला मात्र मुकलो आम्ही कारण, रहातो खुप दुर..................>> आम्ही तर जवळ असुन पण मुकलो
मस्त
मस्त
लाजो सगळं एकदम फुल टू
लाजो सगळं एकदम फुल टू टिपलय्स..
झक्कसच. चाबुक..
पुढच्या वेळी वविच्या वेळीच यायचा प्लॅन कर भारतात..
आनंदाच्या या सोहळ्याला मात्र
आनंदाच्या या सोहळ्याला मात्र मुकलो आम्ही कारण, रहातो खुप दुर...
आम्हीही हेच म्हणतो.
सर्वांना खुप खुप धन्यवाद
सर्वांना खुप खुप धन्यवाद
मस्त
मस्त
Pages