अटळ..(भाग २)

Submitted by स्मिता द on 20 July, 2010 - 03:34

भाग एकः http://www.maayboli.com/node/17954

अटळ..(भाग २)

काय चांगला अन काय वाईट याचेच बेसिक चुकतायेत का?चुकीला चुक म्हणताना ही बुध्दीने चुक वाटणारी गोष्ट मनाला का परत परत चा्टुन जावी..अघळपघळ वागण्याचा हा परिणाम म्हणाव तर विनी मॅडम इतक कोणीच स्ट्रिक्ट नाही हा माझा आजवरचा लौकीक..फ़ारशी कोणात न मिसळणारी..कायम दोन हात लांब असणारी अशी मी..आणि माझ्याच वाट्याला या घटना का?...इथे मी चुकतेय कि समोरचा.. कुठलही परिपुर्ण सुख माझ्या वाट्याला का नसाव....वैचारिक स्वातंत्र म्हणाव तर हे अस स्वातंत्र संस्कारी मनाला स्वैराचार का वाटावं मग? हे खरच वैचारिक स्वातंत्र्य आहे का..वैचारिक स्वातंत्र्य अस स्वैराचार वाटते....

"विनी मॅडम लक्ष कुठे आहे..Are you not feeling well..?

’ अं.." रिजनल मॆनेजरच्या या प्रश्नाने मी भानावर आले..

"Yes what happen? Im talking with you.."

"sorry ...Im fine .."

मिटिंग मध्ये लक्ष लागायला डोक्यात दुसरेच विचार फ़ेर धरुन होते....वेळ मारुन नेली पण खरच खुप डिस्टर्ब आहे मी...खुप.. शांत तळ्यात एखादा खडा पडावा अन असंख्य तरंग उठावेत तसे विचारांचे मोहोळ उठलेय...माझ लक्ष चारुच्या चेह-याकडे गेलं ..ओह शीट... तो ही अस्वस्थ दिसत होता....

मिटिंग कधी संपली माहित नाही...डोक्यात तेच विचार होते..माझा पाया डळमळीत केला त्या विचारांनी..माझा संसार..माझ घर , माझा नवरा...मुलं..यात गुरफ़टलेल्या माझ्या शांत आयुष्यात देवेन आला..पण त्याच येण खुप शांत होत जराही पडझड जाणवु न देणार..Its on spiritual level..but what is this??

**********************************************************************

"विनी.."

चारुच्या हाकेने परत जाग आली मला

"हं..चारु..अरे काय हे कितीदा सांगीतल..."

"विनी सॉरी..तेच म्हणायला आलोय मी..मी रात्रभर विचार केला..You are right....तु म्हणतेय ते पटतय मला..आणि तुला असा त्रास होण बघवत ही नाही मला..सॉरी .........म्हणालो ते विसरुन जा प्लिज..प्लिज विनी..पण आनंदात रहा हसत.. its worth me lot "

चारु असं म्हणुन झटकन आला तसा निघुन गेला...

हुश्य केल मनात चला गुंता न होता हा प्रश्न सुटला.... पण जाता जाता चारु स्वतःला सोडब्वुन मला त्या विचार्रांच्या भोवर्‍यात उडकवउन गेला होता... प्रतिक्षिप्त क्रियेनुसार ते विचार तितक्याच फोर्सने परत परत माझ्यावर आदळत होते

******************************************************************************

हल्ली पंधरा दिवस झाले बघतेय..मी तर फ़ारशी कोणाशी बोलतच नव्हते..पण बडबड्या चारु एकदम शांत असतो....कोणाशीच फ़ारस बोलत नाही..मी समोर आले की टाळतोच मला..निघुन जातो..ठिके म्हणा...good one.. हे घडणारच

पण ह्या विचारांचा ह्या ओढताणीचा ताण असह्य झाला मला..खुपखुप विचारांच्या आवर्तात ढवळुन निघातेय मी ,, त्या आवर्तात जस माझ आणि माझ्या नवर्‍याच नात आहे..मुलांचे बंध आहे तसेच देवेनच ही नात आहे आणि हे वावटळी सारख चारुच येण देखील आहे..........

सतत हे विचार आणि मनात रुजलेले संस्कार यातली पडझड...मनाच अस्तर अस विरविरीत होत चाललेल की बस .....या प्रसंगाने ढवळुन गेलेय मी अंतरबाह्य ..कशात लक्ष लागेना

"विनी काय होतय ..हल्ली इतकी का शांत असतेस गं..बरं का नाहीये..?"

नव-याच्या या प्रश्नवर भडभडुन येतय अन देवेनच फोन आला की

"विनी काय होतय नक्की..काहीतरी होतय हे मात्र नक्की..जाणवतय मला" या देवेनच्या प्रश्नाला काय उत्तर देऊ मी...

माझ्या कडे उत्तरच नाहिये...चारुच समोर ते असं वागणं दिसतय..उजाड भकास...छान मित्र होता हा पण माझा.. का हे अस व्हाव...माझ्या वागण्यात काय असं असाव नाही उत्तर मिळते..आणि हे कोणाशी शेअर ही करु शकत नाही मी नाही करु शकत...

व्यभिचार.... किती दचकले मन या शब्दाने ...
हा भले शारीर पातळीवरचा नाहीये पण मानसिक पातळीवरचा हा व्यभिचारच ना..दुस-या व्यक्तीचा विचार मनात येण हाही व्यभिचारच....ही नैसर्गिक वृत्ती की अखेर पाय मातीचेच हा प्रकार..संस्कार संस्कार म्हणुन नकळत्या वयापासुन बिंबवलेले विचार का असे तकलादु ठरावे..मी दोषी आहे..दोषी..पण खरच दोषी??????

उच्छृंखल.उथळ अशी कधीही मी नव्हतेच ....नाहीये..हळवेपण आहे पण इतक वाहवत नेईल अस आहे ते?????????..घट्ट पाय रोवलेले असे का डगमगले..म्हणजे हा माझ्या हृदयाने केलेल्या अन डोक्याने केलेल्या विचांरा मधला संघर्ष आहे का?......मानसिक पातळीवर कोणी अस जवळच वाटु शकत नाही का?आणि शकल तर तो दोष ठरावा का ? स्वैराचार म्हणतात ना याला..मग तो कृतीतला स्वैराचार असो वा विचारातला..स्वैराचारच ना शेवटी...

मी नाही न्याय देऊ शकत..नाही..... बायको म्हणुन अपयशी ठरले आई म्हणुनही...मुलांच्या बाबतीत ही आदर्श अशी आई नाही ना मी..आईच्या कल्पनात न बसणारी कल्पना आहे माझी...मी आई म्हणुन त्यांच्या विषयीच्या कर्तव्यात, प्रेमात, मायेत कमी पडले नाही तरी आई म्हणुन मी ज्या मानसिकतेतुन जातेय ते निश्चितच चुकीचे आहे...मी विरेशला म्हणजे नवर्‍याची देखील परिपुर्ण बायको नाही होऊ शकले...नाही होऊ शकले ....दुसरा आला माझ्या मनात, माझ्या विचारात... म्हणजे मी ते डागाळेच..ओह..चारुच्या निमित्त्याने हे सगळेच विचार जणु मंथन केल्या सारखे वर आले तरंगुन....... स्वतंत्र विचारसरणी म्हनुन मिरवणारी मी स्वतंत्र कुठे राहिले..स्वतंत्र वेगळ अन ..स्वैरविचारी वेगळ..

रात्रंदिवस केवळ हेच विचार ..सतत नवर्‍याचे, मुलांचे ,आई बाबांचे, देवेन चारुचे, चेहरेसमोर येतात....अगदी अखंड फ़ेर धरलाय या चलतचित्रांनी माझ्या भोवती....भोवंडुन गेलेय मी....संपुर्ण उध्वस्त. मी व्यभिचारी ठरलेय..मानसिक व्यभिचार....कंलकित अगदी जगण्यास नालायक..रसरसल्या जीवन रसाचा आंकठ रसपान करणारी मी अशी असावी..हे पातक का घडावे माझ्याकडुन..पातक...????????? हो पातकच....दृष्यस्वरुपात न दिसणाया या पातकाला प्रायश्चित काय...प्रायश्चित घेतल्या शिवाय हा दोष जाणार नाही.......याला प्रायश्चित????????????????????????????? अटळ आहे हेच
........................................................................
............................................................................................................
.....................................................

***************************************************************************************************

आजच्या वर्तमा्नपत्रात ठळक बातमी झळकत होती....

विवाहितेची आत्महत्या..

उच्चशिक्षीत व उच्चाधिकारी असलेल्या मध्यमवयीन महिलेने काल रहात्या घरी झोपेच्या गोळ्यांचा अतिरिक्त डोस घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण अजुन समजले नसुन घरच्यांना व कार्यालयातील लोकांशी चर्चा करुनही या घटनेवर प्रकाश पडु शकला नाही.

गुलमोहर: 

शेवट नाही आवडला.... घाई घाईत उरकल्यासारखा वाटला...
म्हणजे अगदी खूपच तत्वज्ञान दिल्यासारखा वाटला.....

i m sorry पण नाही आवडला दुसरा भाग

बासरी.. कथा आवडली. लगेचच निवडक १० मधे गेली.

पण आधीच्या भागात क्रमशः टाकायला हवं होतंत असं प्रकर्षानं वाटलं. क्रमश: न टाकल्याने ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या त्या तुम्ही पाहील्या असतीलंच. तोच कथेचा शेवट आहे असे माननारे आणि त्याचं समर्थन करणारे, हा पुढचा भाग पाहून किती ओशाळले होतील? तुम्ही पण काही कारणाने तिथे तसं स्पष्टिकरण दिलं नाहीत. असो. हे माझं मत झालं. वाईट वाटल्यास हा माझ्या अकलेचा दोष समजून म्या पामरास माफ करावं.

पुन्हा एकदा, विचारांच ओघवतेपण अगदी समर्थपणे मांडलंत कथेत. पु.ले.शु.

no way!
in real or practical life there was not singal incident
of sucide like this.
I DISAGREE WITH END.

((Todays life : - 80% women are like VINI.)) अमान्य... ८०% म्हणजे खुप होतात ना ?.>>>>>>

oooooooo! i made misatake. it should be 89.90 % .
now it's correct.

हा पुढचा भाग पाहून किती ओशाळले होतील?>> ओशाळले कशाला? शेवट हाच असू शकतो? म्हणजे तिला आयुष्यापेक्षा, कुटुंबापेक्षा, मुलांपेक्षा ती मैत्री जास्त महत्वाची होती का? आणि तिला तो मानसिक पातळीवर समजून घेणारा देवेन, चारूची मैत्री महत्वाची वाटते? ज्यांचा त्यांच्या नवर्‍याशी संवाद नसतो, मुलं आपापल्या मार्गी गेल्यावर एकाकीपणा जाणवतो, त्यांनी अशीच मैत्री करावी का? आणि वैचारिक पातळीवर समजून घावं तर पुरूषच का? जस्ट बिकॉज अपोझिट अ‍ॅट्रॅक्स? की पुरूष बायकांपेक्षा (बायकांना) जास्त समजावून घेतात असं बायकांना वाटतं म्हणून?

आणि मग ही तगमग कशाला? प्रायश्चित्त म्हणून आत्महत्या कशाला? दुसरा काहीच मार्ग नाहीय की ते तिला विसरणं जमत नाहीय?

प्रश्न ... प्रश्न... माहीत नाही कदाचित मीपण एकांगी विचार करतेय...

बासुरी पुन्हा एकदा अप्रतिम हाताळणी... नेहमी आजूबाजूला घडणारं उदाहरण...
विनी जास्त संवेदनाशील आहे म्हणून आत्महत्या केली.. बाकीच्या चलता है टाईप असतात.

in real or practical life there was not singal incident>>> असे बरेचसे इन्सीडन्स रियल लाईफमध्येही होतात... ती आत्महत्या सोडून... मुलींकडूनही आणि मुलांकडूनही! कारण त्यामध्ये विशेष काही त्या मुला-मुलींना वाटत नाही...

माझ्या ओळखीच्या मुलीने सांगीतलेली गोष्ट... आमची एक कॉमन मैत्रीण दिसायला आकर्षक आहे, हुषार आहे, स्ट्रेट फॉर्वर्ड आहे. ती पहील्या कंपनीत असताना बरोबरच्या सहकार्‍याबरोबर मित्रत्वाच्या नात्याने वागायची... तो एंगेज होता. लवकरच साखरपुडा करणार होता. हिच्या फ्रँक स्वभावावर भाळला. तिच्यात गुंतत चालला. तिला रोज मेसेजेस करू लागला. मॅटर सिरीयस होतोय हे पाहून तिने स्पष्ट शब्दांत त्याला समजावून सांगितले... आणि ती कंपनी बदलली. पण तिला वाईट वाटले या गैरसमजामुळे तिला एका चांगल्या मित्राला मुकावे लागले.

मनाचा व्यभिचार हा विचार आपण करू शकतो पण कॉर्पोरेट जगतातील मुलामुलींना शारीरिक व्यभिचाराचेही विशेष वाटत नाही. 89.90 % बायका असा मानसिक व्यभिचार करतही असतील... पण वन नाईट स्टॅण्ड वाले नवरेही कमी नाहीयेत... आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना त्याबद्दल रिग्रेट्सही नसतात.

बासुरी ही कथा फारशी नाही आवडली.. म्हणजे तुमच्या बाकी कथा खुपच आवडल्यात, पण ही अधुरी वाटते.. तुमची कथा आहे आणि त्यातली पात्रे हवी तशी वागु शकतात हे मान्य करुनही नायिकेचे कथेतले वागणे जस्टिफाय नाही होत. म्हणजे तिचे कॅरेक्टर तितके स्ट्राँग उभे राहत नाही तसच तिच्या नवर्‍याबद्दल असलेला संवादाचा अभाव/ मुलांबद्दल दुराव्याची जाणीव हे कशामुळे होतय हे चित्र पण स्पष्ट नाहीये.. म्हणुन अधुरी वाटली मला तरी ही कथा.
स्पष्ट बोलल्याबद्दल गैरसमज नसावा. Happy

हे झाले कथेबद्दल, पण काही प्रतिसाद अजुनच कैच्या कै च वाटले.. याआधीच्या भागावर आलेले प्रतिसाद पण. Uhoh
आयला .. नौकरी करणारी बायको नाही करणार स्मित (आधी ड्युअल माईंड मधे होतो हे वाचुन निश्च्य पक्का ) हे वैयक्तिक मत आहे हे मान्य करुनही.

((Todays life : - 80% women are like VINI.)) अमान्य... ८०% म्हणजे खुप होतात ना ?.
oooooooo! i made misatake. it should be 89.90 % .
>>>>>>भुषन, तुमच्याकडे काही प्रूफ आहे का हो या आकडेवारीचं? काही सर्वे रिझल्टस विथ वास्ट सॅम्पल साईज वै? मी स्वतः ५-६ वर्षांपासुन MNC मध्ये काम करतेय.. अजुन एकही असली केस पाहीली नाही.. आणि घरात राहणार्‍या बायकांचे विचार पण असे असु शकतातच की.. त्यावर कॉर्पोरेट कल्चरचा टॅग कशाला..
नेहमीप्रमाणे काडी टाकुन वादाला सुरवात करणे हाच एकमेव उद्देश आहे या पोस्टचा असे माझे वैयक्तिक मत!

To Chingi Madam,
,,,,मी स्वतः ५-६ वर्षांपासुन MNC मध्ये काम करतेय.. अजुन एकही असली केस पाहीली नाही.>>>>>>

It means that you do not have singal friend (female) who comes to
you & tell about her heart. Maybe you are lonely kind of person.
sorry but...................maybe its true.
i dont want to hurt you. But you are not practical.
You are totaly in the darkness of other side of coin.

To Dreamgirl,
<<<<<>> असे बरेचसे इन्सीडन्स रियल लाईफमध्येही होतात... ती आत्महत्या सोडून... मुलींकडूनही आणि मुलांकडूनही! कारण त्यामध्ये विशेष काही त्या मुला-मुलींना वाटत नाही...
>>>>>>>>>>>>>>>

no way!
in real or practical life there was not singal incident
of sucide like this.

This is my complete sentence which i have mentioned above.

Rest of the part I agree with you.

छान कथा. असं प्रत्यक्षात घडु शकतं. पण बासुरी कथा थोडी अधुरी वाटते.
चिंगीला अनुमोदन.
ड्रिमगर्ल- तुमच्या मताशी बर्‍याच अंशी सहमत. खास करून तुमचे विचार आवडले.
<<आयला .. नौकरी करणारी बायको नाही करणार (आधी ड्युअल माईंड मधे होतो हे वाचुन निश्च्य पक्का )>> मानल बुवा आपल्याला. खुपच लवकर influence होता तुम्ही आणि तुमचे विचार. तुम्हाला जर असं वाटत असेल की घरी राहणार्‍या स्त्रीयांना (housewives) डोकं आणि मन दोन्ही नसत तर चुकीच आहे. त्याना पण भावना असतात आणि त्या पण विचार करू शकतात.
भूषण- तुमच्या मताशी संपूर्णतः असहमत. आयुष्य म्हणजे काही statistic किंवा गणित नाही जे टक्केवारीत अथवा आकडेमोडीत(calculated) राहिल. <> it seems you have come across only such people (may be female frnds) who comes to you n discuss all this type of things.
निखळ मैत्री सुद्धा असते (no give n take)
<> जर ह्या कथेतील नायिके प्रमाणे तुम्हाला हे म्हणाव वाटतय तर म.बो. वरच्या बाकी कथा वाचा (बेफिकीरांची ' सौ. वनिता रानडे - एक असहाय्य स्त्री - एक भागाची कादंबरी). आणि मग ह्या पोस्ट वर प्रतिक्रीया द्या. टाळी कधी एका हातानी वाजत नाही. आणि चुक कोणाच्या ही कडून होउ शकते, त्या वरून समस्त स्त्री अथवा पुरूष वाईट ठरत नाही.
प्रेम , लग्न , आयुष्य हे कधी ही ठरवून करता/जगता येत नाही. (if your mind is pre-occupied with something then life may becomes tough to live as the mind sets does not accept new things easily which might be good for life ) म्हणुनच व.पु. म्हणतात "एक क्षण असतो भाळण्याचा आणि बाकि फक्त सांभळ्ण्याचा"......

बासुरी, भाग १ वाचला. खुप maturedly , तरल पणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रामाणिकपणे विषय हाताळत आहेस असे वाटले, म्हणुन एकाच दमात दुसरा भाग देखिल वाचला, पण दुसर्‍या भागाने disappointment, निराशा दिली.

शेवट नाही आवडला. शेवट पण तू तितक्याच प्रामाणिकपणे हाताळायला हवा होता. थोडी घाई केलीस. किंवा लोकांना आवडेल असा शेवट करु असे तुला वाटुन तू असे केलेस काय? पण कथेशी आणि स्वत:च्या विचारांशी प्रामाणिक रहा, मगं लोकं आपोआप ते accept करतात.

असो, पण प्रयत्न चांगला आहे. आणि अशिच लिहीत रहा.

बर्‍याच प्रतिक्रीया delete झालेल्या दिसत आहेत, पण शिल्लक प्रतिक्रीयेवरुन एकुण प्रतिक्रियांचा सुर समजत आहे. अवाक आणि हतबुद्ध करणार्‍या काही प्रतिक्रीया आहेत. चिंगी तुम्हाला अनुमोदन.

बासु, आधी चिंगीला अनुमोदन दिल. आणि लॉगाऊट करुन जेव्हा ऑफिस बाहेर पडले तेव्हा विचार आला "अरेच्चा! नक्की कशा कशाला अनुमोदन दिलय आणि का ते सांगायचच राहिल, हे म्हणजे अर्धवट प्रतिक्रिया देण्यासारख झाल." म्हणून आज लॉग इन केल्या केल्या पहिल्या प्रथम तुझी कथा गाठली.

चिंगीला अनुमोदन हे बर्‍याच आलेल्या प्रतिक्रियांच्या सुरा बद्दल, वाद घालण्यासाठी लिहीलेल्या प्रतिक्रियांबद्दल. आणि थोडस अनुमोदन ही कथा अपुर्ण वाटल्या बद्दल.

आता माझी कारणं

१)विषय मुळात खूप कठीण आहे. मी समजू शकते तो लिहिताना किती त्रास, किती समिकरणं, किती if & buts मांडून खोडावे लागले असतील ह्याची कारण ह्याच विषयावर मी ४ वेळा ड्राफ्ट लिहून डीलिट केलाय. मला खरच जमल नव्हत तठस्थ लिहिणं. कारण लिहिताना बरेच विचार गर्दी करत होते त्यात तिचं व्यक्तीमत्व कस रेखाटावं ह्यावर पण माझ्या मनात फार खळबळ होत होती. ती जी आणि जशी आहे किंवा तिच्या जागी तो जरी असता तरी तो तसाच जसा आहे तसा यावा म्हणजे "ती" किंवा "तो" ही कथा लोकांनी एका व्यक्तीची म्हणून वाचावी त्यात "ती" किंवा "तो" ह्या लिंग भेदामुळे प्रतिक्रिया बायस्ड येऊ नयेत आणि कथाही बायस्ड होऊ नये अशा प्रयत्नात माझे ४ ड्राफ्ट डिलिट झाले. तुझाही हेतू मला वाटत हाच होता. म्हणजे मला जे जाणवल ते अस की स्वभाव, मनाची उलघाल, आयुष्याचं/एकंदरीत घडणार्‍या घटनांचं साचलेपण, त्यातून आलेली रोबोटीक किंवा टेकन फॉर ग्रँटेड भावना, मिड लाईफ क्रायसीस आणि त्याच वेळी कोणीस दिलेल अटेंशन, घेतलेली दखल, दाखवलेली व्यक्त केलेली काळजी त्यातून जोडल जाणार नातं, त्या नात्याला नाव काय द्याव ह्याचा पडलेला संभ्रम आणि इतक्या वर्षांचे मनावर झालेले संस्कार, जग दुनिया ह्या गोष्टीच असलेल प्रेशर, आपल्या चौकटीला (संसाराच्या वगैरे) धरुन ठेवताना उंबरठ्याबाहेर पाऊल टाकल तर चौकट मोडेल की काय ह्याची वाटणारी भिती आणि ती मोडूही नये अस म्हणणार एक मन हे सगळ तुला मांडायच असाव अस मला वाटलं.

पहिल्या भागात ते थोडफार जमलं तो भाग शॉर्ट आहे पण नक्कीच तुला जे मांडायचय त्याला धरुन आहे. त्यातही जे कॅरेक्टर्स मेन आहेत त्यांचा स्वभाव विशेष अजून हायलाईट झाला असता, आणि तिच्या चौकटी पैकी मेन कॅरेक्टर्स नवरा, नात्यात आलेल साचलेपण हे सगळ अजून ठळक आल असत तर अधीक प्रभावी झाला असता तो भाग.

त्याचा शेवट अ‍ॅब्रप्ट असला तरी मूळ हेतूला धरुन होता.

दुसरा भागात मला वाटत विनी पेक्षा तुझ्या संस्कारांचा, तुझ्या विचारांचा प्रभाव तिच्या कॅरेक्टर वर पडला आणि ठोस निर्णयात्मक शेवट हवा म्हणून गाडी आत्महत्येकडे वळली

किंवा अशी एखादी आत्महत्येची बातमी वाचून तू शेवटाकडून स्टोरीच्या पहिल्या भागाकडे आलीस अस मानल तरी पहिला भाग आणि दुसरा भाग अजून नीट जोडला जायला हवा होता. तुझी विनी बाह्य जगाच्या भाषेत "गॉन केस" नक्कीच नाही आहे. म्हणून तिच समर्थन नव्हे पण तिचा स्वभाव ठळक करणारे संवाद हवे होते अस मला वाटलं

फार लांबण लावलं मी पण तुझ्या बर्‍याच कथा आवडतात, हा विषय देखील अवघड आहे आणि मी स्वतः माझे ड्राफ्ट्स जमले नाहीत म्हणून डिलिट केलेत आणि तू खूप संयत सुरुवात केल्येस कथेची म्हणून माझे विचार शेअर केले.

तिला गिल्ट घेऊन पुढे जाण्याची काहीही गरज नव्हती.
एका इंग्रजी चित्रपटात मी एक वाक्य ऐकले होते ...
"Guilt is a bag of ****ing bricks you are carrying for nothing ! "

आणि ही विनी चक्क फक्त आपल्या विचारांची लाज वाटुन आत्महत्या करते ...
Loooooser !!!

To Chingi Madam,
,,,,मी स्वतः ५-६ वर्षांपासुन MNC मध्ये काम करतेय.. अजुन एकही असली केस पाहीली नाही.>>>>>>

It means that you do not have singal friend (female) who comes to
you & tell about her heart. Maybe you are lonely kind of person.
sorry but...................maybe its true.
i dont want to hurt you. But you are not practical.
You are totaly in the darkness of other side of coin.
>>>>> हम्म्म.. मला वाटते आपण वैयक्तिक पातळीवर येण्याची काहीच गरज नाहीये.. मी/ माझा स्वभाव/ माझं फ्रेंडसर्कल याविषयी तुम्ही बोलण्याचा काय संबंध.यावर उत्तर देण्याच्या लायकीचे पोस्ट नाहीये हे.
अजुन एक आपण या धाग्यापुरतं बोलतोय सो कृपया माझ्या विपु मध्ये काहीही लिहु नका.

माझ्या स्वभावाचे उथळ विश्लेशन करण्याच्या नादात तुम्ही माझ्या प्रश्नाला सोयिस्कररीत्या बगल दिली आहे. म्हणुन परत विचारतेय..भुषन, तुमच्याकडे काही प्रूफ आहे का हो या आकडेवारीचं? काही सर्वे रिझल्टस विथ वास्ट सॅम्पल साईज वै? आणि घरात राहणार्‍या बायकांचे विचार पण असे असु शकतातच की.. त्यावर कॉर्पोरेट कल्चरचा टॅग कशाला..

मी स्वतः ५-६ वर्षांपासुन MNC मध्ये काम करतेय.. अजुन एकही असली केस पाहीली नाही.. >> या वाक्यात वापरलेल्या "असली केस "याचा अर्थ वर लिहीला नाही म्हणुन लिहीतेय.. लग्न होऊन मुले मोठी असण्याच्या मध्यमवयीन वयात म्हणजे कलिग्जच्या गळ्यात हात घालुन फिरणारी स्त्री मी नाही पाहीली. पण बाकी ते मानसिक पातळीवर परपुरुषाच्या प्रेमात पडणे ही गोश्ट uncommon नसली तरी

((Todays life : - 80% women are like VINI.)) अमान्य... ८०% म्हणजे खुप होतात ना ?.>>>>>>

oooooooo! i made misatake. it should be 89.90 % .
now it's correct. हे विधान प्रचंड बेजबाबदार अन् बिनबुडाचं आहे हे नक्की.

कवे मस्त पोस्ट! पहिल्या भागात ते थोडफार जमलं तो भाग शॉर्ट आहे पण नक्कीच तुला जे मांडायचय त्याला धरुन आहे. त्यातही जे कॅरेक्टर्स मेन आहेत त्यांचा स्वभाव विशेष अजून हायलाईट झाला असता, आणि तिच्या चौकटी पैकी मेन कॅरेक्टर्स नवरा, नात्यात आलेल साचलेपण हे सगळ अजून ठळक आल असत तर अधीक प्रभावी झाला असता तो भाग. >>अगदी अगदी.

चिंगे, "भलत्या" प्रतिक्रियांना प्रतिसाद देण्या इतकही महत्व देऊ नकोस. मुद्देसुद, खरच काही ज्येन्युइनली लिहिलेल वाटल आणि ते तुझ्या मतांच्या अपोझिट मतांच असल तर जरुर वाच आणि प्रतिक्रिया दे पण नुसते वाद घालायचे, विषय वहावत न्यायचा म्हणून आलेल्या पोस्टींना काडी इतकीही किंमत देऊन त्यावर मत टाईपण्याचा/त्या पोस्टींचा विचार करुन डोक शिणवण्याचा विचारही करु नकोस. चांगल्या ठिकाणी एनर्जी खर्च कर. ह्या वादावादीने मूळ कथा बाजूला पडतेय Happy

सुंदर विषय आणी चांगल हाताळलायस, बासुरी.
कविताशी सहमत (कविता, किती सरळपणे विश्लेषण केलयस... बहोत खूब).
मलाही शेवट चूक वाटला नाही पण अ‍ॅबरप्ट नक्की वाटला.

कविता काय म्हणतेय तेच मलाही म्हणायचय म्हणून पुन्हा लिहीत नाही.
<<त्यातही जे कॅरेक्टर्स मेन आहेत त्यांचा स्वभाव विशेष अजून हायलाईट झाला असता, आणि तिच्या चौकटी पैकी मेन कॅरेक्टर्स नवरा, नात्यात आलेल साचलेपण हे सगळ अजून ठळक आल असत तर अधीक प्रभावी झाला असता तो भाग. >>
माझं माझ्या काही कथांच्या बाबतीत असं झालय...
बासुरी, छान लिहितेस... एक गंमत म्हणून पुन्हा लिहून बघ हीच कथा... (पण जाम वैतागवाणा प्रकार गं... )

चिंगी १००% सहमत्...>><<चांगल्या ठिकाणी एनर्जी खर्च कर. >>कविता तुमचं म्हणणं पटल बुवा.

To Chingi Madam,

Why Women Cheat | Love Relationships | Extra Marital Affairs |
13 Dec 2009 ... A survey states that, 70 % of women.....................

Please go to Google .....

Extreamly Sorry if i had hurt You.

धन्यवाद सर्वांचे..:)

परंतु आश्चर्यही वाटले कि वैयक्तिक आकस लोक असा व्यक्त करतात्..अरे लोकांनो ही कथा आहे..आणिहो समजा खरे जरी घडले असेल तरीही..घडु काहीही शकते ना..ते आपल्या मनाप्रमाणे नसतेच..पावलोपावली अनपेक्षित समोर येत असते त्याला जुन्या घटनांवर घासुन बघुन काय उपयोग नाही का....

राहिला प्रश्न मी असे का लिहिले असा..एक तर मी अतिशय स्वतंत्र विचारांची आहे तेव्हा जे मला वाटले योग्य तसेलिहिते..ते कोणाला चुकीचे ही वाटु शकते...शेवटी काय चुक किंवा बरोबर हे व्यक्तीसापेक्ष असते असे मी मानते..एखाद्या प्रसंगी आपण घेतलेला निर्णय त्या प्रसंगाची गरज असते म्हणुन ते सगळ्यांना बरोबर वाटतेच असे नाही ना...माझ स्वतःच खर खर मत अस आहे..प्रत्येक जण त्याच्या जागी बरोबर असतो..अर्थात चुकतो ही..म्हणुन तुमचे चुकीचे आहे हे मी मानत नाही पण त्यामुळे माझे मांडताना चुकले हे मला मान्य नाही..:) आणि लिखाणाची शैली हा हि व्यक्तीसापेक्ष प्रकार आहे असे मी मानते त्यामुळे माझी शैली खुप जणांना रुचली नसेल तरी शेवटी ती माझी शैली आहे हे तर मान्य करायला हवेच ना...तुमची शैली तुमच्या लिखाणातुन दृगोचर होऊ देत

आणि अजुन एक विनंती भुषण नामक आय डी ला.ही कथा आहे भांडणाचा आखाडा नव्हे जे काही वाद विवाद करावयाचे असतील ते तुमच्या स्वतःच्या मेल वर अथवा फोन वर करु शकता...माझ अस मत आहे त्यामुळे तुमचही अस असावच हे म्हणण चुकीच आहे अस नाही का वाटत तुम्हाला....अहो हे जग फार मोठ आहे अगदी आपल्या अनाकलनीय अशा घटना सतत घडत असतात भले त्या चुकीच्या असो वा बरोबर..ही कथा आहे ती कथा म्हणुन वाचा वास्तवाच्या तुमच्या कसोट्यांवर घासुन बघु नका...

खुप असह्य झाले तेव्हा रहावले नाही म्हणुन लिहिले..कारण आपली निर्मिती ती इतरांच्या दृष्टिने कितीही रद्दड असो पण ती आपली असते ना तीची अशी चिरफाड नाही बघवत्..असो..पुनश्च आभार..:)

शेवटामुळे मला थोडीफार टॉलस्टॉय च्या 'अ‍ॅना कॅरेनिना' ची आठवण झाली. ही गोष्ट त्याहुन खुप दुर आहे पण विनी ची तगमग जर अजुन जास्त प्रकर्षाने गोष्टीत मांडता आली असती तर तिची आत्महत्या जस्टीफाय होऊ शकली असती असे वाटते.

बासू, मनापासून सच्चा प्रतिसाद देतेय. मला शब्दन शब्द भावलेला आहे. नेहमीप्रमाणे वेगळा विषय. मला चाकोरीबाहेरचं आवडतं.. असे विषय लिहायला हिम्मत लागते. ती तुझ्या माझ्यकडे आहे. पण शेवट अजून का नाही स्पष्ट केलास? किंवा तिची आत्महत्या अपरिहार्य होती का? जिवंतपणी मरण भोगत जगणं हा शेवट नसता का चालला? 'चलता है कॅटेगरी म्हणजे काय? टाइमपास म्हणुन असं नातं स्विकारणार्‍या आणि अनाहूतपणे किंवा गरजेपोटी अश्या नात्यात गुरफटणार्‍या अशा दोन भिन्न कॅटेगरीज आहेत. आत्महत्या करण्यापेक्षा तिनं ते विचार झटकून देवापुढे दिवा लावला अथवा एखाद्या सांसारिक कर्तव्यला सुरुवात केली हे अधिक वास्तव झालं असतं.
बासूरी हे नाव कणभरही छपरी नाही वाटत मला.... उलट खूप सूरीलं नाव आहे. बदलू नकोस.
लिहीत रहा बासू Happy

Pages