वारसा (कविता आणि कवितासंग्रह प्रकाशन)

Submitted by harish_dangat on 18 July, 2010 - 11:01

वारसा (कविता आणि कवितासंग्रह प्रकाशन)

--------------------------
येथुन जाताना | तोडले मी धागे |
पाहिले ना मागे | क्षणभरी ||

अपराध घोर | विसरलो नाती |
विसरलो माती | जाता जाता ||

संगे मात्र आहे | तेजाचा आरसा |
मराठी वारसा | काळजात ||

------------------------

सातासमुद्रापार गेल्यानंतर हा वारसा जतन करण्यासाठी मी माझ्या पहिल्या १०१ कविता "वारसा" या कविता संग्रहाच्या स्वरुपात प्रकाशीत करीत आहे. आपण उपस्थित राहून आपले आशिर्वाद द्यावेत ही विनंती.

तारीख - जुलै २४, शनिवार
वेळ - दुपारी २ ते ५
स्थळ - पत्रकार भवन , १९३ नवी पेठ , गांजवे चौकाजवळ, पुणे ३०
हस्ते - डॉ. रामचंद्र देखणे - संत साहीत्याचे अभ्यासक आणि लेखक
अध्यक्ष - अरविंद गोखले, संपादक - लोकसत्ता
---------------------------------

आपण येणार असाल तर या धाग्यवर किंवा मला इमेलने ( harish_dangat@yahoo.com) कळवावे.

धन्यवाद!

हरीश दांगट

आपण येणार असल्यास

गुलमोहर: 

कार्यक्रमाला येणे जुळणार नाहीच.
शुभेच्छा. Happy

पोस्टेजसह मुल्य/किंमत आणि पत्ता कळवावा.
”वारसा’ मागवायची इच्छा आहे.

स्नेहांकित.

अभिनंदन.
पुस्तक इथे मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध करुन द्यायचा विचार आहे ना ?

आपल्या कवितेत भोगलेल्या - पाहिलेल्या अनुभवाचे, संवेदनाशील अविष्कार जाणवतात. अभंग, संत वांगमय आणि आजचं साहित्य, अशा दोन काळांच प्रतिबींब आपल्या कवितेत दिसतं. वाचकांना खुप आनंद देतात.
प्रत्यक्ष उपस्थित रहाण जमलं नाही तरी, मनापासुन अभिनंदन आणि पुढील काव्यप्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.