चिमणीचे घरटे

Submitted by सुनिल जोग on 17 July, 2010 - 00:16

तो चिमणा: चिमणे ही जागा कशी वाटते आपले घरटे बांधायला ?
ती चिमणी: ही ! ठीक आहे.मला काय बाई. माझं काम सोप्प आहे.अंडी उबवायची आणि पिल्लांना भरवायचे.
तो: चल तर मग कामाला लागू.
ती: चल रे राजा !
...
घरट्याचे काम सुरू होते.

तो( फ्लॅट्धारक): अगं इकडे बघ. त्या चिमण्या पुन्हा इथे कडमडायला लागल्यात. पुन्हा इथे घरटं बांधायला लागल्यात.
ती:(बायको) : अगं बाई खरंच की. आल्या का साळकाया परत?
तो: नाहीतर काय. आता घरभर कचरा करतील आणि चिवचिवाट ...
ती: अहो पाहता काय? तो कचरा काढून टाका आणि त्या खिडकीला जाळी लावा.
तो: उद्या लावतोच.
....
चिमणा:अगं पाहिलस का? काल् आपण एवढे खपून जागा निच्शित केली आणि आज त्याने जाळी लावली ? काय माणसं असतात.?
ती(चिमणी): जळ्ळं मेलं लक्षण ! आम्ही काय अख्खा फ्लॅट घेणार होतो की काय. एवढीशी जागा ती काय पण जळ्ळं मेलं लक्षण. मारे त्या बिल्डर कडून फुटावर जागा घेतली असेल. आम्ही काय जन्मभर राहणार होतो की काय. एवढा सिझन गेला की झालं
तो:जाउ दे गं शेवटी माणसंच ती.
....

तो: (फ्लॅट्धारक): गेली एकदाची पिडा.
ती: तर काय?
आता कस सारे शांत शांत वाटतयं नाही ?
तो : हो ना!
....
दहा वर्षानंतर ....
तो( फ्लॅट...): किती एकटं एकटं वाटतय ना.
ती: हो ना...
तो: हल्ल्ली मुले तर सोड... नातवंडं सुध्दा येत नाहीत.
ती: फार एकटं एकटं वाटत...
तो: ए! तुला आठवतं... पूर्वी...त्या बाथरुम मध्ये चिमण्या घरटं बांधत?
ती: हो. .. गं बाई आठवलं..त्या घरटं बांधत... घरभर कलकलाट करत.. नंतर त्यांची पिले आणि त्यांना भरवणं .. काही दिवसांनी पिले मोठी झाली की पुन्हा शांतता ... आणि पुन्हा नवीन जोड्पे आणि नवीन घरटं..
तो: ए आपण ती बाथरुमची जाळी काढुया का?
ती: मी पण हेच म्हणणार होते.. पण म्हटलं तुम्हाला आवडेल की नाही. कुणास ठाउक.
तो: चल..

....
नातवंडं येतात.... आबा इथे चिमणीचे किती छान घरट आहे. केव्हा बांधले?
तो: (डोळे पाण्याने भरलेले..) (आणि निस्तब्ध...)
आजकाल ते घर म्हणजे चिमण्यांचे माहेर झालेय.....

गुलमोहर: