एशान उवाच.

Submitted by ऋयाम on 10 July, 2010 - 02:58

प्रेरणेचे मुळ : "शब्द": - http://www.maayboli.com/node/12228

मुळ कथा "शब्द" फार आवडली. ती 'तिच्या' बाजुने लिहीलेली कथा होती. त्यात 'एशानच्या' बाजुनेही काही लिहीण्यासारखं असेल असं वाटुन एशानच्या बाजुने कथा कशी घडली, हे लिहावंसं वाटलं...
शब्दकरिण बाईंची परवांगी घेतली आहे. आभारी आहे परवांगी बद्दल. Happy

* अर्थात, मुळ "शब्द" च्या जवळपास पोहोचु शकीन असं वाटत नाही, पण एक प्रयत्न जरुर करणार आहे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

"क्या हिरो? क्या सोच रहा है? "
"काही नाही गं."
"अपने कंचनसेभी नहीं कहेगा?? "
"कंचन प्लीज...... आणि अचानक हे हिंदीमधे काय लावलयस? " एशान म्हटला.

"सारखं ते 'साथिया' चं गाणं लावतोस रे का ते आजकाल?
पुर्वी तर heavy metal, hard rock music सोडुन काही ऐकायचा नाहीस. ते सगळं सोडुन दिवसरात्र 'साथिया' ?
मै सब समझती हूँ बच्चु!!!"

"हे बघ कंचन, काहीही नाहीये. उगाच मागे लागु नकोस काहीतरी."
"हो, जातेच आहे मी. उशीर होतोय क्लिनिकला जायला.
पण ऐक, " बेटा.......... मैं तेरी माँ हूँ! मैं तुम्हारे दिल की हर बात जान सकती हूँ!!!!" कंचन हसत म्हटली...
"क्या यार, कंचन???"
"चल, उद्या भेटु सकाळी... बाय" , एशानच्या डोक्यात टप्पल मारून कंचन निघाली.
"बाय... टेक केअर."

कंचन खोलीबाहेर जाईपर्यंत एशान तसाच लोळत पडला होता. ती बाहेर पडल्या पडल्या त्यानं डोक्याला हात लावला! " आयला.. कंचनला कसं समजलं?
....की, तो पिक्चरमधला फालतु डायलॉग बेसलेस नाहीये!?
नाही. शक्यच नाही. मी कुठे हातावर नाव लिहीलं नाही, बुकमधे नाही. अस्ली एडेगिरी कोण करेल? हुड!
कॉलेज-गँगमधल्या ज्या कोणाला माहित आहे, त्यातल्या कोणालाही ही ओळखत नाही...
इम्पॉसिबल!!! इट्स इम्पॉसिबल!
जाऊदे. उशीर झालाय ऑलरेडी.. कल्टी मारावी..

"ओ मावशी, जातो... कॉलेज"
"जातो म्हनु नये. एतो म्हनावं एशान बेटा.", घरात काम करणार्‍या मावशी बोलल्या.
त्या असं म्हणतात, हे माहिती असुन मुद्दाम त्यांना चिडवायला म्हणुन "जातो" असं म्हणत एशान निघाला.

"आज कार नको. पल्साऽर!
पण साला. हेल्मेट लागेल. ये साले मामा लोग कभीभी पकड लेते हैं. बघु पकडलं तर..." पल्सरला कीक मारुन एशान कॉलेजला निघाला.

---------------------------------------------------
---------------------------------------------------

"उशीर झाला उगाचच" म्हणत मंजिरी घाईघाईत बसस्टॉपवर आली आणि जणू काही तिची वाट बघत असल्यासारखी, पण ती आल्या आल्या बस निघाली.

"#$%&&%&+*?>+>(%& " - मंजिरी.

आज कॉलेजात 'ट्रॅडिशनल डे' असल्यानं कधी नव्हे ते ही साडी वगैरे घालून निघाली होती.
आई काही न बोलता हसत होती.
घरातून निघताना शेजारच्या काकूंनी साडी नेसण्याच्या तिच्या स्टाईलवर काहीतरी शेरा मारला होता.
म्हणजे संपूर्ण न्याहाळत, 'ब~रं.... आजकाल अशी फॅशन आहे तर!!!" असं म्हटल्या होत्या.
आणि आता वरनं ह्या बसने चांगलं बघुनश्यान बायबाय केलेलं!!!

एवढं सगळं झाल्यावर तोंडात शिव्या आल्या नसत्या तरच नवल होतं. गऽप गुमान लाईनमधे उभं राहून पुढच्या बसची वाट पाहणं चालु झालं.

पाचेक मिनिटं झाली असतील, तिला एशान तिथुन पास होताना दिसला. तीनं जोरात हाक मारली!
त्यानंही पाहिलं होतंच. त्यानं पल्सर तिच्या जवळ आणली. हात पुढे करत "शादी मुबारक!" म्हटला.

"कोणाची शादी??"
"तोंड वाकडं करायला काय झालंय?" तिच्या कपड्यांकडे बघत एशान.
"अरे 'ट्रॅडिशनल डे' आहे ना आज?" मंजिरी बोलली, आणि आता एशानचं तोंड वाकडं झालं.

" @#$ !!! विसरलोच!! " एशान म्हटला.
"असुदे. बरा दिसतोयस असाही. चालशील.. माझ्या बरोबर रहा, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. "
"ए ऐक ना. "
"काय?"
"जाता जाता एक कुर्ता घेऊन जाऊया. म्हणजे मी 'ऑड मॅन आऊट नाही दिसणार!"
एरवी मंजिरीनं असलं काही ऐकलं नसतं, पण आता हाच जरा वेळेत घेऊन जाईल अशी आशा असल्याने ती विचार करू लागली.
तिला विचार करू लागलेला पाहून एशान 'प्लीज प्लीज प्लीज' म्हटला.
त्यानं एकदा सोडून तीन-तीनदा 'प्लीज' म्हटल्यावर मंजिरीदेवी त्याच्यावर प्रसन्न झाली आणि बोलली, 'तथास्तु'!!!

"बस. " एशान.
ही एकदा त्याच्या बाईककडे, एकदा त्याच्याकडे! "ह्या बाईकवर?"
"बाईक नव्हे ,पल्सर! पल्सर म्हणतात ह्याला! द डेविल!! " अभिमानानं एशान बोलत होता, पण मंजिरीचं बाईकला न्याहाळणं चालूच होतं.
"मला बाईक येते मंजरी." परत चिडवत एशान बोलला.

"मंजरी नाही, 'मंजिरी' "मं जि री!" आणि काय बक्षिस द्यायचं का तुला बाईक येते म्हणुन? "
"क्या यार तुम भी? मिलते ही झगडा. कैसी दोस्त हो? आणि मंजरी म्हटलं तर काय फरक पडतो?"
"तुम्ही पंजाबी लोक ना... "
"मी एवढं चांगलं मराठी बोलतो तुझ्याशी आणि तु आहेस की तुम्ही पंजाबी, तुम्ही पंजाबी... And this 'Punjabi' itself is wrong too. I am Sindhi. Remember that! Wink तु भी ना यार..."
"बर."
"बर काय? बस."
"आणि तुझी जी एफ? रिचा?"
"तिलापण घेऊया की. तिला असं इथे मधे उभं करुया. ते बघ ते अंकल-आंटी चाल्लेत ना, त्यांच्या मुलाला मधे घेऊन तसे..."
"एशान, काहीही बोलतोस..." 'मंजरी' हसत, त्याच्या गाडीवर बसत म्हणाली...

"पण थांब! तुझं हेल्मेट कुठाय? " परत गाडीवरून उतरत मंजिरी.
"तसं तर ड्रायव्हर आणि पॅसेंजर दोघांनीही घालायचा नियम काढलाय. तुझं हेल्मेट कुठाय दाखव मग?" एशान.
"नको. मी उतरतेच."
"अगं, बस! तुम मराठी लोग ना... "
"एशान! उगाच काहीही काय? नियम पाळणे ह्यात काय चुक आहे? मराठी चा काय संबंध? "
"अगं मीही हाफ मराठी आहेच ना? तुच कशावरही चिडतेस."
"हाफ मराठी काय अरे? " मंजरी हसत म्हणाली, "बर, चल. लेक्चर संपेल. दुसरं चालु व्ह्यायच्या आत तरी पोचुया... आणि तुझा कुर्ता घ्यायचाय! चल!!! लवकर!!! " मंजिरी त्याला ढकलत म्हटली.
" आणि ते मराठी का म्हणून ओढलंस मधे?" मंजिरी अचानक आठवून बोलल्यावर "काही नाही असंच टीपी!" म्हणून एशाननं पल्साऽर चालू केली!!!

"चल" म्हणुन त्यानं जोरात गाडी गर्दीतुन बाहेर काढली. पाचेक मिनिटात विद्यापिठाजवळचा मोकळा रस्ता लागला .

"तुझा टी शर्ट मस्त आहे रे! कुठुन घेतलास?? " घड्याळाकडं बघत मंजिरी एशान ला म्हटली.
"अजुन १५ मिन्टात दुसरं लेक्चर चालु होईल" - एशान म्हटला. आणि " शर्ट डॅडचा आहे."
मंजिरी काहीच बोलु शकली नाही.
एशानच मग म्हटला, "बघ. फ्रेंडशिप खरी असेल तर येशील. नाहीतर नाही म्हणशील!"
"फ्रेंडशीपचं काय अरे?? ती आहेच! लेक्चरचं जरा महत्त्वाचं होतं रे..." मंजिरी.
आरशात तिच्याकडं खुन्नस देऊन बघत, अ‍ॅक्सिलिरेटर जोरात पिळत "बर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र" एशान म्हटला आणि कुर्त्याचा विचार सोडून दिला.

थोड्याच वेळात गाडीनं वेग पकडला आणि गारगार वारं जाणवायल लागलं. एकूणच गार हवेत छान वाटलं.
"मस्त वारं आहे नाही?? ती अचानक म्हटली
"असं डोळे मिटुन हात हवेत उंचावलं की एकदम टायटॅनिक!" डोळे मिटुन हात दोन्ही बाजुला करत मंजिरी म्हणाली. "तु एकटीनं करुन कसं चालेल पागल? मीपण केलंय बघ!!" एशान असं बोलला मात्र!
"फाट फाट!" टायटॅनिकचे दोन्ही हात धपाधप त्याच्या पाठीत पडले. एशान नीट गाडी चालवु लागला.

"काय रे, रिचा काय म्हणते?" मंजिरी काहीतरी विषय काढावा म्हणून विचारू लागली.
"'एशानच' म्हणते मला ती. " सरळ चेहेरा करून एशान.
अरे हिरोऽ.. 'रिचा' तुझी खरंच जी एफ आहे ना? "
लगेच उत्तर आलं, "नाही. खोटी खोटी आहे."
"जाऊदे. चुकीचा प्रश्न."
"मग!?!?"
"अरे, म्हणजे, तुम्ही एकमेकांचे जी एफ - बी एफ म्हणता, आणि कधी एकत्र दिसत नाही. "
"leave it. तुला नाही कळणार..." मंजिरीचं बोलणं उडवून लावत एशान बोलला.
"ओके." मला तरी काय करायचंय? म्हणत मंजिरीनं विषय सोडला.

तसं मंजिरीचं म्हणणं खरंच होतं. कॉलेजभर सगळीकडं "एशान-रिचा गीएफ-बीएफ " हे सर्वांना माहिती होतं. त्यांनी ते लपवुनही ठेवलं नव्हतं. पण ते कधीच एकत्र नसायचे. मग कसले जी/बी - एफ??
त्यामुळे मंजिरीचा प्रश्न तसा बरोबरच होता, पण एशानला उत्तर द्यायचं दिसत नव्हतं. तिनं विषय बंद केला.

" बर... काका काय म्हणतायत रे?"
"तु भेटलीयेस तरी का कधी त्याला?" एशानचा नेहेमीप्रमाणे उलट प्रश्न.
"अरे. असं का बोलतोस तु? बोलायला दुसरं काही नसलं तर असं बोलायची पद्धत असते." थोडीशी चिडतच मंजिरी बोलली.
"आपल्यात बोलायला काहीच नाहीये का मंजरी?" एशान परत उलट.
" ' मं जि री'. आणि तुला माहितीये? "
"काय?"
"तुझ्या बाईकच्या हँडलच्या उजव्या बाजुची ग्रिप आहे, तिला 'अ‍ॅक्सिलिरेटर' म्हणतात. आणि तो जोरात पिळला, की गाडी जोरात जाते. आणि आपण लवकर पोचु शकतो. "
"ओह... असं आहे का? तुला जोरात जायचं आहे. तसं सांग ना मग!!! हे घे 'पिळला'."
..........
"एशाआअन. नालायक. गाडी चालव."
..........

पाच मिनिटात दोघं कॉलेजवर पोचले. एशाननं गाडी कँटीनच्या साईडलाच घातली. पहिलं लेक्चर संपलं होतं, आणि त्यामुळे आलेला 'हँगओव्हर' उतरवायला सगळे लोक्स टपरीवर चहा पीत बसले होते. या दोघांना येताना सगळ्यांनी पाहिलं होतं. गाडी थांबली.
ह्या दोघांना बघताच सगळे उठून उभे राहिले आणि गाडीकडे येऊ लागले.

मंजिरीला कळेना हे असं का करतायत? "अरे, हे आपल्याला बघुन असे का येतायत?" ती एशानला म्हटली.
"माझ्याकडे नाही तुझ्याकडे बघुन." एशान नेहेमीप्रमाणे तिला कळेनासं काहीतरी बोलला.
तिनं चिडुन त्याच्याकडे बघितलं. फिरुन परत सगळ्यांकडं बघितलं आणि ट्युब पेटली!
ही एकटी सोडली तर बाकी सगळे 'नॉर्मल' अर्थात नॉन ट्रॅडिशनल (?) ड्रेसमधे आले होते.

मंजरी लग्गेच गाडीवरुन उतरली. एशानच्या दंडावर बुक्की मारुन मैत्रिणींकडे गेली.
"काय गं? हे काय? असं काय आलाय सगळे? "
"तुला मेसेज नाही मिळाला का काल?" अमिता तिलाच विचारु लागली. "अगं, पोस्टपोन झालाय डे."
मंजिरी चिडली खरी पण ते दाखवलं असतं तर सगळीकडं शोभा झाली असती. काहीच न झाल्यासारखी ती शांतपणे हसली. तिनं सर्वांकडे बघितलं. कोणीच हसत नव्हतं. तिनं पुन्हा एकदा वेळ मारुन नेली होती!
कॉलेजच्या पहिल्या दिवसा प्रमाणेच!

"चल, आपण पण चहा घेऊया. तुला चहा ना रे ?" एशानला विचारत मंजिरी कॅन्टिनमधे घुसली.
घुसता घुसता मनात विचार येऊ लागले...
ह्या नालायकानं आधी सांगितलं असतं तर घरी जाऊन लगेच बदलले नसते का कपडे?
की ह्याला माहितच नव्हतं?
की तो विसरलाच होता, आणि आता कुर्ता घेऊ म्हणत होता???
की ह्यानं मुद्दाम आपल्याला वाचवावं म्हणून कुर्ता घेऊ म्हटलं होतं???

ती कॅन्टिनमधुन चहा घेऊन आली आणि एशानला दिला.
"थँक्स फॉर द टी. अ‍ॅण्ड थँक्स फॉर द लिफ्ट!" एशान उवाच...

☆★☆★☆★

"क्या बच्चे. इथे कसा आलास आत्ता? आणि आज रात्री मित्राकडं जाणार होता ना 'स्टडीला'? आय मीन स्टडीच्या नावाखाली? "
"तुला सगळं कसं कळतं कंचन?"
"चला. मला काहीतरी कळतं एवढंतरी तुला कळलं."
"तु कोणालाही ऐकत नाहीस बघ. "
"बर. सांगणारेस का मग, कोण आहे ती?"
"थांब. "
"काय?"
"आधी एकदा तुला नमस्कार करु दे."
"हो. कर. आणि म्हण. अशी आई मिळवुन दिल्याबद्दल मी देवा, तुझा आभारी आहे. मी तिला कधीही त्रास देणार नाही. "
"आमीन. "
"आमीन काय पागल?" Happy
"बर, चल. कुठेतरी एक कॉफी घेऊया. तु सांग सगळं, मग जाऊया घरी. पापाही येतीलच."
कंचनला कसं समजलं, एशानला अजिबात समजत नव्हतं. पण हल्ली कधी कधी त्यालाच 'तिला सगळं सांगावं' असं वाटत होतं खरं. धीर होत नव्हता हेही खरं. पण आज बहुतेक बोलणं होणारच आहेसं दिसत होतं.

"नाईस कॉफी. " एशान.
"हं."
"हां, नाव मंजरी."
"मंजरी नाही, .." त्याला तोडत कंचन म्हटली.
"हो हो . मं जि री. "
"कुठली आहे ती बाय द वे?"
"कोंकण."
"अरे. बापरे!"
"मतलब?"
"काही नाही रे... पण म्हणजे ती चक्क मराठी ? तुला एखादी मराठी पोरगी आवडावी?"
"मग मीही हाफ मराठी नाहीये का?"
"वा रे पठ्ठे? ये सवाल अपने माँसे? आणि हाफ मराठी काय काढलंयस? " कंचनला हसु आवरेना.
"बरं, भेटली कुठे? कॉलेजमधे आहे वाटतं. " तीचे प्रश्न चालुच होते..
"येस."
"बाकी?"
"बाकी कुछ नहीं. बाकी अब कुछ टिप्स दो मम्मा.." शेवटी एशान मुद्द्यावर आला.

"असं कर... आंघोळ कर, आणि शुभंकरोति म्हण." आता कंचन टाईमपास मुडमधे आली होती.
"क्या?"
"अरे, टिप्स वगैरे काही नसतात रे. फॉर्म्युला काही नसतो असा. तिला अधुनमधुन भेट. तु जसा आहेस, तसा तिला नक्की आवडशील तर ठिक! " म्हणजे आवडशीलच रे.
"थँक्स मॉम." तिच्या एवढ्या म्हणण्यामुळं उगाचच एशान खुश वगैरे झाला होता.
"तु माझा मुलगा आहेस एशान. You are a part of me. I am confident about you for that. Wink "
"राईट. चल मॉम. घरी जाऊया. "

"अरे, डॅड! तु आलास पण?" डॅडला हॉलमधेच बघुन एशान म्हणाअला.
"थोडी देर पहले आया हूँ.. और, तुम दोनो साथमे?"
"हो. एशानका कुछ प्लॅन था, जो कॅन्सल हो गया, तो ये वहींसे क्लिनिक आ गया. "
"ह्म्म..."
"खाना?? मैने अभी अभी खा लिया." डॅड विचारु लागले.
"हम भी अभी खाएंगे.. चलो, एशान... १० मिनिटात. फ्रेश होऊन ये. "
"ओक्के..."

एशान त्याच्या रुममधे गेल्याची खात्री करुन घेत कंचन, "डॅड. तेरा बेटा गया कामसे. " म्हणून हसु लागली.
"मैने कहा था ना, दाल मे कुछ काला है!? 'साहब जिस स्कुल मे जा रहें हैं, ... यु नो... ' " डॅडने डायलॉग मारला.
"हां यार. तुम्हारा जवाब नहीं! खुब पहचाना. पण... म्हणजे, आगे?"
"आगे देखते हैं. सिरीअस है के नहीं समझ ही जाएगा कुछ दिनोमे. कुछ दिन बादभी अगर इतनाही "प्यार" रहा तो देखेंगे. नहीं तो 'सिम्पल इन्फॅच्युएशन' समझकर भुल जाएंगे.. "
"राईट", कंचन.
"और वो 'रिचा' एपिसोड ?"
"वो तो बस चिढाते हैं रे सब लोग. जस्ट फ्रेंड्स हैं वो तो.. " कंचन...
"हम दोनो भी तो 'जस्ट फ्रेंड्स' थे.... "
"तुम भी, कुछ भी बोलते हो... i have met her. And i know there is nothing between them... Eshan is not her kind of a person... "
"ओक्के. तुम कहती हो तो.. but Kanchan, i am glad you said that.. "
"मतलब? "
"i mean, मैंने तुम्हे सिखा ही दिया.." एशानचा बाप बोलला.
"हांजी.. बहोत शुक्रिया. बडी मेहेरबानी.... चलो. खाना खान है. तुम पढो किताब.. "

☆★☆★☆★

.........."मैं हूँ ना!!" एशान.
"तु काय करणारेस?" मंजिरी.
"मेरे डॅड रेल्वेमे जॉब करते है. "
"कुठल्या स्टेशनला?"
"सी एस टी मधे ऑफिस आहे त्यांचं."
"त्यांच्या ओळखीनं मिळेल म्हणजे तिकीट."
"ओळख नाही, ऑर्डर. तुने समझ क्या रक्खा है डार्लिंग?"
"डार्लिंग काय उगाच? आणि मला काय माहित ? "
"डार्लिंग म्हटलं म्हणुन खरंच डार्लिंग होतं का? he is a Manager by the way.. युं कर दुंगा आपका काम! "
"युं नही, तुम्हारे डॅड. नक्की करायला सांग. अरे, पण माझ्याकडे आत्ता पैसे नाहीयेत. उद्या दिले तर चालेल काय?"
"No Money, No Ticket. क्या यार तुम मराठी लोग भी..."
"ए, यात मराठीचा काय संबंध? "
"असंच... "
............
............
"तु काय उगाचच दिसेल त्याला डार्लिंग म्हणत असतोस काय रे?"
"तु काय कोणी दिसेल ती आहेस का?"
" 'रिचा'चा नंबर दे जरा. "
"०२०-२५५........"
"काय माणुस आहेस.... " इथं मात्र मंजिरीला हसु थांबवता आलं नाही...

"हां. मी घ्यायला येतो." एशान.
"बाईकवर आहेस का? हेल्मेटचा प्रोब्लेम होईल... "
"नाही बाई. कार आणलीये. दहा मिनिटात येतो."
"ओके."
..................
"क्या भिडुलोग... काय चाल्लंय? " कँटीनमधे शिरताच ग्रुपकडे बघत एशान बोलला.
"आओ शान. आज टाईमच्या आधी कसा आलास?"
"आज function आहे ना. 'डार्लिंग? ' रोहनला हळुच खुण करत एशाननं विचारलं..
"तिकडं.. "
" तेवढ्यात ' क्या एशान भाई !' म्हणत, हातात कॉफ्या घेऊन मंजिरी परत आलीच. "
" बोलो मंजरी बहन ." एशान रोहनकडे बघत म्हटला.
" आज वेळेवर कसे महाराज ? "
" असंच.. "
" अरे, ही कोण? ओळख करुन दे ना.. काय नाव गं तुझं ? " मंजिरी.
" मी कंचन. "
" अच्छा. बस ना. कॉफी? "
" थांब, मीच आणते. एशान, तु? "
" येस. दोन आण कंचन..."
" नालायक, सगळ्या मुलींशी असाच वागतोस का रे तु? तुला जायला काय होतंय?" मंजिरी .
" तु जा मग.." एशान.
" अरे, डोण्ट वरी, मी जाते.. " कंचन.
..................
"ही तुझी कोण लागते रे?" माधवीनं विचारल्यावर हा शांतपणे म्हणे, "माझी सख्खी आई आहे ती."
" काआआआ य?"
कंचन कॉफी घेऊन येत होती आणि सगळे तिच्याकडे भुत बघितल्यासारखं बघत होते....
" कंचन, काकु???? " माधवी.
" मला माहित होतं. " रोहन.
" सत्कार करुया तुझा.. " माधवी.
" कंचन. आय मीन काकु.. तुम्ही.... म्हणजे.... " मंजिरी हसतच बोलत होती.
" अगं.. काकु वगैरे नको म्हणुस. कोणीच म्हणु नका. शानपण नाही म्हणत. कंचन is fine... "
" पण तुम्ही एवढ्या यंग कशा ? "
" माझी आई आहे ना..." एशान.. " मी देतो टिप्स तुला डार्लिंग."
" कंचन, sorry to say this, but तुमचा मुलगा अगदी वाया गेलेला आहे. " मंजिरी कंचनला म्हणाली.
" मला माहिती आहे गं. म्हणुनच आता तरी तो चांगल्या company मधे आहे का check करायला आलिये." कंचन.
" खरंच?? "
" नाही ग, मजा केली.. "
" चलो, तुमचं function चालु होईल ना आता. मी निघते.."
" Nice meeting you कंचन." सगळे म्हटले.
" my pleasure... एन्जॉय! " म्हणुन कंचन निघाली.
" मी क्लिनिकला drop करुन येतो " असं सांगुन एशानही उठला. "आलोच... "
..............
" आई शप्पथ! आई? "
" खरंच... आई?"
" मला माहित होतं! " रोहन.
" याला घालवा रे.... " माधवी. " आणि त्या सर्जन आहेत...."
" 'ती' " रोहन.
" आई असावी तर अशी! हो ना??? " सगळ्यांच्या मते ठरलं. तेवढ्यात एशानही परत आला. "ऑटो घेते म्हटली.... चलो. i am here now. Let's go!!! "
" तुझी आई आवडली हां सगळ्यांना... " मंजिरी.
" माझी आई आहे. so damn obvious! "
" कुठे तुझी आई, आणि....."
" कुठे मी ना... डार्लिंग, एक ना एक दिन ये जालिम दुनिया ..... यु नो.... एनीवे तुला आवडली ना. बास मग... "

..............................(final year results )

" एशान, तुझी आई इतकी ब्रिलियंट आहे. म्हणुन. after all, It's all in the GENES!" मंजिरी.
" तशी तर माझी आई पण PhD आहे की... " रोहन.
" हा! हा! हा!" माधवी. " रोहन, टायमिंग कब समझेगा यार तु?"
" जाऊदे रोहन.... luck. I am lucky... that's all! " एशान.
" no. i mean... " रोहन.
" खरं सांग एशान. तु रोज घरी जाऊन रात्रभर अभ्यास करतोस ना? " मंजिरी.
" का? "
" कॉलेजला लेट येतोस. सारखा टीपी करत असतोस. तरीही without KT पास? "
" तुम्हाला कॉल करतो की. when in difficulty... अच्छा तुला पार्टी हवीये का? जॉब लागला की लगेच! "
" तसं नाही रे. तु भारी लाईफ एन्जॉय करतोस. उतर. लगेच झाडावर चढला... "
" actually i am born intelligent. "
" मी उगाचच खरं बोलायला जाते.... " मंजिरी... " रोहन, तु काय करणारेस? जॉब की पुढे काय? "
" डॅड म्हणतायत की,, ........ आणि आई म्हणतीये की,, ........ पण दादाचं,, ...... " रोहन.
" अप्पुन तो अ‍ॅड एजन्सी. कोई आ रहा है तो बतानेका. मस्त काम करेंगे. " एशान.
" मी येईन. " रोहन.
" आईला विचार आधी " माधवी म्हटली आणि पुन्हा ग्रुप हसायला लागला...
" चलो.. माझा तर प्रश्न सुटला आहे. मी अ‍ॅडमिन मधे जाणार आहे. ऑलमोस्ट फिक्स्ड. "
" मीही बघतीये.... " माधवी..
" आता भेटणं कमी होईल नाही ??? "
" जॉब चालु झाला की असंच होतं सगळे म्हणतात.. college life never returns.. "
" म्हणुन म्हणतो, join me in my Ad Agency. It'll be lots of fun! What say guys?? " एशान.
" बघु.."
" रोहन. any time buddy. Just give me a call. I am going to be a successful businessman in just a few months. And you know, you dont need an invitation. "एक call, That's all" ! वाह. चांगली स्लोगन आहे ना??? " एशान.
" शुभेच्छा Mr. Businessman!!! Wish you All The Best! ओळख ठेवा आम्हा 'मराठी' लोकांची! शेवटी तुही 'हाफ मराठी' आहेसच ना? " मंजिरी.
" yes मंजरी ma'm. हाफ मराठी... " एशान हसत म्हटला आणि कॉलेज officially संपलं.....

☆★☆★☆★

" काय रे? हसतोय्स का? "
" वार्षिक काम कंचन... " एशान.
" म्हणजे? "
" तुला नाही माहित. वार्षिक काम म्हणजे, डार्लिंगचं तिकीट... रत्नागिरी पर्यंत. "
" तु तिला भेटत का नाहीस मला समजत नाही. तीही हिरॉईन. कामापुरता फोन करते का रे??"
" बिझी यार. "
" हम्म... तु असं कर..... तिला भेटायला बोलव घरी. किंवा हॉटेलमधेच भेटुया सगळे.. म्हणजे, तिकीट द्यायला म्हणुन बोलाव आणि तु सांग. किंवा आम्ही कशाला? तुम्हीच भेटा. आणि तु सांग. किंवा... "
" क्या कंचन. तुम सब भुल गई क्या? इतने साल मैंने जो सिखाया??? " डॅड पेपर वाचत बसले होते, ते अचानक बोलले..
" बताओ गुरुजी. i mean Love Guruji... " कंचन.
" Dad! " एशानला जरा जास्तीच धक्का बसला. 'कंचन, डॅडला Love Guru म्हणतीये??? ' "बोलो डॅड."

"देखो भाई. सबसे पहले तो तुम हमारे बेटे हो. तो वो in-built Confidence जो होता है, तुममेभी है. होना चाहिये. उसे जगाओ. और सोचो. याद करो, उसे क्या पसंद है? मैं उससे मिला तो नहीं कभी, but as per kanchan's ovservation, She does NOT hate you. So You have to do this some day. She may not have thought about this at all. She is a simple girl. और तुम लोग हमेशा कॉलेजमे साथ रहे हो. I feel ashamed that you could not say this for all these years, but let's keep that aside for the moment... हमेशा सब ग्रुप के साथ होते थे, which CAN be a problem, i know. तो तुम्हे बस इतना करना है, के उसे फिरसे मिलना है. It has been a while. You have an advantage here, if you can see it. तो कुछ बहाना बनाओ. रेल्वे का टिकट बिल्कुल मत निकालो. उसे खुद छोडने जाओ.
Let her spend the most romantic time of her life in those 4 hour journey, with you!!!!
इससे ज्यादा मैं तुम्हे कुछ नहीं कह सकता! "
" मी म्हटलं होतं ना?? " कंचन.
" Yes, Love Guru Dad! Thank you! Thank you so much!" एशान डॅडला नमस्कार करत म्हटला..

-----------------------------------------
-----------------------------------------

"हॅलो... " एशाननं फोन उचलला.
"माझ्या तिकिटाचं काय झालं?" तिकडुन आवाज आला.
"क्या? कौनसा तिकीट?" एशान.
"मेरा तिकीट,, रत्नागिरीका.. पाच वाजताची ट्रेन आहे. " ती ओरडली ..
"ओह शिट.. मी विसरलोच.. डॅडला सांगायला. नेमका तो पण आता टाऊनमधे नाहिये.. सॉरी यार.."
................... एशान उवाच!

गुलमोहर: 

आभार वाचल्याबद्दल, उत्सुकता दाखवल्याबद्दल.

पुर्ण केली आहे. Happy

स्पेशल आभार्स @ मुळ लेखिका. रिमेक ला परवांगी दिल्याबद्दल. Happy

एशानला ही कथा वाचायला दिलेली आहे. Proud

एशान नावाचा एक कॅरेक्टर खरोखर माझा मित्र आहे. एका टीव्ही सीरीयलचा तो असिस्टंट प्रोड्युसर आहे. सेटवर रिकामे बसलेले असताना त्याने एकदा "भुताची गोष्ट" सांगतो म्हणून मुंबई गोवा हायवेवरची स्टोरी चालू केली. मी त्याच्या गाडीचे गीअर बदलत बदलत त्याची लव्ह स्टोरी केली होती. Happy कथेमधले त्याचे बरेचसे डायलॉग त्याचे "स्वत्:चेच" आहेत.

ऋयामा, खूपच डायलॉगभरी कहानी झालिये. मंजिरीचे कॅरेक्टर अजून रंगवता आले असते. आफ्टर ऑल, एशान तिच्या प्रेमात पडायला "ती" काहीतरी स्पेशल असायलाच हवी ना? मात्र, कंचन खूप छान रंगलिये.

कथा आवडली. Happy

चला. खरं खरं सांगितलंत तर एकदाचं. Happy

आणि खरा अभिप्राय दिलात ते चांगलं केलंत.

मंजिरीची गोष्ट, स्पेशलनेस शब्द मधे होतीच सगळी. म्हणुन एशान आणि मंडळींवर कॉन्सन्ट्रेट करु म्हटलं होतं Wink पण बरोबर आहे, मुळात तिचा भारीपणा इथेही यायला हवा. आणि डायलॉग्स जरा जास्तीच झाले असं नंतर वाचताना वाटलं... पण तोपर्यंत वीकेंड संपला होता Lol

लय आभार्स!!! Happy
@ ऋयाम

ऋयामा, आवडेश!

अतिडायलॉग्जमध्ये कथा समजुन घेण्याची (तुझ्या लिखाणाने) सवय झाली आहे त्यामुळे चलता है! :दिवे:

नंदिनीला अनुमोदन... मूळ 'शब्द' मधला संवादांचा नुसताच बाज पकडलाय. सुरुवातीला 'एशानची बाजू लिहावी' असं जे म्हटलंय त्यात मंजिरी आवडण्याचं कारण, प्रेमात पडणं, तिच्यात गुंतत जाणं वगैरे प्रामुख्याने यायला हवं होतं, ते कथेत कुठेही येत नाहीये.

स्वतंत्र पाह्यली तर चान्गली लिहिलिये. पण वरच्या कथेचा भाग म्हणून सलग नाहि वाट्त. दोन लोकांची शैली वेगळी कळून येते. सीक्वेलची फेशन आहे सिएनेमात, तशी प्रीक्वेल ची आहे का?

Pages