शीर्षक सुचवा

Submitted by कमलेश पाटील on 4 July, 2010 - 03:38

आज खूपच उत्सुकता वाटत होती. आज मी विक्रमला भेटायला जाणार होते. विक्रम, चाटींग करता करता भेटलेला एक मुलगा एवढी छोटीशी ओळख बरोबर ठेवून. मनात थोडी धाकधूक होतीच. कसा असेल तो, काय बोलेल तो. कारण कॉम्प्युटर आणि फोनवर गप्पा मारणं वेगळं अन् त्याच माणसाला प्रत्यक्षात भेटणं वेगळं.

तरीही मी त्याला भेटायला चालले होते.एक वेगळीच आपुलकी होती त्याच्या बोलण्यात म्हणूनतर त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करताना मी जास्त आढेवेढे घेतले नाही.

ठरलेल्या वेळेप्रमाणे आमची भेट घडली. पुणे स्टेशनवर. तो माझ्या आधीच आला होता. मी त्याला भेटले तेवढ्यातच त्याला फोन आला. फोनवरही तो अगदी शांतपणे बोलत होता. त्याचं हसणं त्याच धीर देणं सारंच कसं आश्वासक होतं. मी त्याची वाट बघतेय हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने फोने बंद केला. कदाचित मला तसं वाटलं असेल.

त्यानंतर आम्ही असंच बोलता बोलता चालू लागलो. त्याने मला विचारलं कोठे जायचं. मी सांगितलं आपण वाडीया कॉलेज कढे जाऊ. कारण ते जवळही होतं अन् मला तो रस्ता नीट माहीतही होता.

चालत चालत आम्ही वाडीया कॉलेजपर्यंत पोहचलो मला कळलं की तो एका केपीओ मध्ये कामाला आहे आणि तो त्याच्या कंपनीच्या क्वार्टरमध्ये राहतो. त्याला हिंदी गाण्यांची खूपच आवड होती. तसा तो बसिकली साउद इंडियन होता. पण त्याला बऱ्याच भाषा येत होत्या.

मी कविता करते हे मी त्याला फोनवर बोलताना सांगितलं होत. त्यामुळे तो माझ्या मागेच लागला एखादी कविता म्हणून दाखव म्हणून. मला खरंतर असं वाटत होतं की याला मराठी काय येतं आणि मग माझ्या कवितांचा अर्थ कसा कळेल.म्हणू मी भितभीत माझी कानात ही कविता ऐकवली. पण त्याने जेव्हा त्या कवितेचा मथितार्थ मला सांगितला तेव्हा मी चक्कर येऊन कोसळायचीच बाकी होते. मग काय मी एकानंतर एक कविता त्याला म्हणून दाखवल्या. कसा वेळ चालला होता हे माझं मलाच कळेना.

मग आम्ही चहा प्यायला गेलो. तेथेही त्याला माझ्या कविता ऐकायच्या होत्या. मीही जास्त नखरे न करता त्याला त्या ऐकवल्या. परत आम्ही कॉलेजमध्ये गेलो. बऱ्याच गप्पा झाल्या.पण अचानक तो एकदम गप्पच झाला. त्याला काहीतरी सांगायचं होतं. तो मला म्हणाला माझं तुझ्यावर प्रेम आहे अन् तेही चक्क मराठीत. मी एकदम गप्पच झाले.

त्याला माझ्याकडून उत्तर हवं होतं. मी सगळं काही आठवून बघितलं तर मला विक्रम मध्ये वावगं काहीच दिसलं नाही. मग मीही चाचपडत त्याला होकार दिला. तर त्याने मला पटकन त्याच्या मिठीत घेतलं अन् माझ्या ओठाच चुंबन घेतलं.माझ्या बुद्धीला ते पटत नव्हतं पण माझ्या मनाला ते हवंहवस वाटत होतं. मीही मग त्याला प्रतिसाद दिला. थोड्या वेळाने आम्ही सावरलो. तेव्हा त्याने पहिल्यांदा मला परत मिठीत घेतलं अन् माझ्या कानात कुजबुजला "मला माफ कर. मी असं करायला नको होतं." पण मला का कोणासठाऊक त्याने जे केलं ते गैर वाटलंच नाही़ उलट त्याचा तो अधिकारच आहे असं वाटलं.

क्रमशः

गुलमोहर: