आनंद बँक

Submitted by निंबुडा on 2 July, 2010 - 02:44

पूर्वी मला एका ढकलपत्रातून एक खूप छान गोष्ट आली होती. ते विपत्र आता नाही माझ्याकडे आणि exact शब्दही आठवत नाहियेत, पण कथेचा आशय मनावर पक्का कोरला गेला आहे. ही कथा मी माझ्या शब्दात थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतेय. मूळ कथेपेक्षा थोडंफार (कदाचित बरंच Wink ) इकडे तिकडे होईल... पण असो!

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
एक तरुण जोडपं होतं. दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम होतं. दोघांच्याही घरून आई-बाबांचा सपोर्ट होता. यथावकाश आपापले करियर वगैरे मार्गी लागल्यानंतर दोघेही एकमेकांशी विवाहबद्ध झाले. तो दिवस त्यांच्या मते त्यांच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा दिवस होता. आपलं ज्याच्यावर आणि ज्याचं आपल्यावर असीम प्रेम आहे तोच आपला life partner बनणे ही त्यांच्यासाठी भाग्याची गोष्ट होती.

लग्नाच्या दिवशी जेव्हा पाठवणीची वेळ आली तेव्हा मुलीच्या आईने दोघा वधू-वरांच्या हातात एक पाकीट दिलं. दोघांच्या चेहर्‍यावरील उत्सुकता बघून तिने सांगितलं "अमुक अमुक बँकेमध्ये नवीन अकाउंट ओपन करण्यासाठी लागणारे फॉर्म्स आहेत त्यात. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तुम्हा दोघांचं एक जॉइंट सेव्हिंग अकाउंट उघडून घ्या. या अकाउंट मध्ये भरायची initial amount म्हणून मी माझ्यातर्फे ५००० रु. या पाकिटात घालून दिलेले आहेत. आज तुमच्या आयुष्यातला मोठ्ठा आनंदाचा दिवस आहे. या दिवसाची आठवण म्हणून ही रक्कम त्यात भरा. या पुढीलच्या तुमच्या वैवाहिक आयुष्यात जेव्हा जेव्हा आनंदाचे क्षण येतील तेव्हा तेव्हा या रकमेत भर घालत जा. आणि तुमच्याकडे त्याची नोंद ठेवा. या अकाउंट मधून पैसे काढू नका. उलत जमेल तेव्हा भरच घालत जा. हा तुमच्या आनंदाचा ठेवा आहे असे समजा. त्यानिमित्ताने बचतही होईल आणि पुढे मागे गरज लागल्यास इमर्जन्सी साठी रक्कम हाताशी राहील."

नवपरिणीत जोडप्याला ही कल्पना खूपच आवडली. आणि त्या प्रमाणे करण्याचे त्यांनी मुलीच्या आईला वचन दिले. सर्वच नवविवाहित दंपतीप्रमाणे त्यांचे जीवन सुखेनैव सुरु झाले. पहिल्या वर्षभरात सगळे काही आनंदात उत्साहात पार पडले. अधून मधून आईला कबूल केल्याप्रमाणे त्या अकाउंट मध्ये जमेल तशी रकमेची भर घालत गेले. लग्नाचा पहिला महिन्याचा वाढदिवस, दोघांचे पहिल्या वर्षभरात साजरे झालेले वाढदिवस, नवीन घर घेतले, प्रमोशन झाले, कार घेतली इ. सर्व प्रसंगाच्या वेळी दोघेही खूप आनंदात होते. त्यामुळे त्या त्या दिवसाच्या आठवणीसाठी त्या अकाउंट मध्ये पैसे जमा होत राहिले. आणि त्याची नोंदही एका डायरीत ते करत गेले.

यथावकाश मूल झाले. त्याचं बारसं झालं. मुलगा मोठा झाला. आता नव्या लग्नाची नव्हाळी, गोडवा थोडा थोडा आटला होता. रोजच्या गोड गोड मधाळ संवादांची जागा आता हळू हळू थोडीशी धुसफूस, छोटे-मोठे वाद, भांडणे, मतभेद यांनी घ्यायला सुरुवात झाली. संसाराचा पसारा जसजसा वाढत होता तशा वाढत्या जबाबदार्‍या, ऑफिसमधली टेन्शन्स, नातेवाईकां आणि मित्रपरिवाराबरोबरच्या संबंधांतले ताण्-ताणाव, मुलाला वाढविताना, त्याचा अभ्यास घेताना येणार्‍या समस्या, इ. कारणांमुळे उगीचच या दोघांत भांडणे विकोपाला जाऊ लागली. परिस्थिती एक दिवस इतकी चिघळली की दोघांनी एकमेकांना सोडण्याचा निर्णय घेतला. आता या पुढे आपण कुठल्याही परिस्थितीत एकमेकांबरोबर काढू शकत नाही, त्यापेक्षा वेळीच सामंजस्याने वेगळे झालेले बरे हा त्यांचा निश्चय झाला. दोघांनीही स्वतंत्र फ्लॅट घेऊन रहायचे, मुलाला आलटून्-पालटून दोघांकडेही ठेवायचे, घरातील कुठकुठल्या वस्तू कुणी कुणी कशा कशा वाटून घ्यायच्या वगैरे बाबींवरही खल झाला. वडिलधार्‍यांना घरी बोलावून आपला निर्णय त्यांनाही सांगितला.

मुलीची आई फक्त इतकेच म्हणाली की "तुम्ही दोघांनी घरातले सर्व निम्मे निम्मे वाटून घेतलेत. अगदी मुलाबद्दलाचाही डीसीजन घेऊन झाला. पण या सगळ्यात तुम्ही त्या आनंदठेव असलेल्या अकाउंटला विसरलात. त्यातली amount पण वाटून घ्या बघू. दोघांनीही प्रत्येकी किती किती amount टाकलीत याची नोंद असेलच ना तुमच्याजवळ. मग जरा चेक करा आणि घ्या वाटून!". दोघांनाही ते पटले. कसं काय त्या अकाउंटला विसरलो आपण, असे दोघांनाही वाटून गेले. ठिके, आता लक्षात आले ना. मग त्याचाही सोक्षमोक्ष लावूनच टाकू एकदाचा असे म्हणून पत्नी जाऊन त्या अकाउंटचे पासबुक आणि चेकबुक घेऊन आली. दोघेही एक कागद-पेन घेऊन बसले. कधी कधी कुणी कुणी किती amount भरली याची यादी करू लागले. जसजसे एकेका नोंदीवरून पुढे पुढे जाऊ लागले एकेका क्षणाची, प्रसंगाची आठवण मनात ताजी झाली. त्या त्या प्रसंगाच्या वेळी एकत्र घालवलेले क्षण, साजरा केलेला आनंद, एकेमेकांचा सहवास या सर्व गोष्टी जणू कालच घडल्या प्रमाणे त्यांना आठवल्या. दोघांनीही नकळत एकमेकांकडे पाहिलं. डोळ्यांचा डोळ्यांशी मूक संवाद झाला. हाच तो की ज्याच्यावर मी इतकं प्रेम करत होते की त्याच्याशिवाय एकही क्षण राहण्याची मी कल्पनाही करू शकत नव्हते, असं तिला वाटून गेलं. त्याच्याही मनात नेमक्या त्याच वेळी तोच विचार आला. नकळत दोघांच्याही डोळ्यांतून अश्रु ओघळले. दोघांच्याही सहज सुंदर अनुबंधावर जी धूळीची पुटं जमा झाली होती ती अश्रुंच्या ओघळात वाहून गेली. दोघांची मनं नितळ झाली. राग, द्वेष, चीड सगळं धुकं एका क्षणात निवळलं. Happy आपल्या आयुष्यात इतक्या छान छान घटना घडल्यात की त्यांच्या नुसत्या आठवणीने सुद्धा इतका आनंद झालाय मग एकमेकांवर इतकं प्रेम असूनही वेगळं होण्याची कल्पना करूच कशी शकलो आपण या जाणीवेने दोघांना एकदम अपराधी वाटलं. एकमेकांपाशी त्यांनी तसं कबूलही केलं आणि परत एकदा नव्याने डाव मांडण्याचा निश्चय केला."

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

कथा छोटुशीच होती आणि इंग्लिश मधून आली होती. मी त्याचा हा स्वैर अनुवाद केला आहे. तुमच्याकडे ते विपत्र असेल मला संपर्कातून जरून पाठवा. Happy

कथा वाचून माझ्या मनात विचारतरंग उठू लागले. किती तरी वेळा असं होतं ना की आयुष्यातल्या नीगेटिव्ह घटनाच तेव्हढ्या आपल्या लक्षात राहतात. लग्नातले मानापनात, कार्यालयात एखाद्याने केलेला अपमान, भांडणे, अपयश, भोगावे लागलेले भोग इ.इ. हे सर्व आपल्या मनाच्या बँकेत अगदी महत्त्वाची ठेव जपून ठेवावी तसे जपतो आपण. वेळप्रसंगी ते ते सर्व आठवून स्वतःबद्दलच सहानुभूती वाटायला लागते आणि जवळच्या व्यक्तींबरोबर ते सर्व शेअर करून त्यांची पण सहानुभूती मिळवू पाहतो. यात काही गैर आहे असं म्हणायचं नाहिये मला, पण upto certain limit पर्यंत ते ठिक आहे. पण अति झालं की आपल्यालाच त्याचा त्रास होतो. नकारात्मकतेच्या वाईट दुष्टचक्रात अडकून जातो आपण.

आपलं मन ना एखाद्या द्वाड बालका सारखं असतं. ज्या गोष्टीची सवय पडते त्यातच गुरफटून रहायला बघतं. मग आपण आपला फोकस आनंदक्षणांवर का केंद्रीत करू नये हा नवा दृष्टिकोन मला या कथेने दिला. मनाला एकदा आनंदाच्या ट्रॅक वर रहायची सवय लागली की आपणहूनच आनंदक्षण तुमच्या आयुष्यात येऊन दाखल होतात. जीवनात आनंदाने व्यतीत केलेले प्रसंग नुसते आठवून सुद्धा उल्हसित वाटते. मग वरच्या कथेत त्या आईने वापरलेली साधी सोपी युक्ती आपल्या आयुष्यात का वापरू नये, असे वाटून गेले. ते विपत्र मी लगोलग मोदकला पाठवले आणि याच धर्तीवर आपणही काहीतरी चालू करुया अशी कल्पना मी मांडली. मोदकसुद्धा प्रेरीत झाला. तसा पण real life मध्ये तो माझ्या पेक्षा खूप म्हणजे खूपच जास्त positive आहे. त्यानेसुद्धा ही कल्पना उचलून धरली.

त्या दिवसापासून आम्हीही एक स्कीम चालू केलीये. Happy फक्त bank मध्ये नवे अकाउंट वगैरे ओपन केले नाहीये, तर घरच्या घरी एक envelop मेंटेन केलेय ज्यात वर सांगितल्या प्रमाणे प्रत्येक आनंदक्षणाची साक्ष म्हणून थोडी थोडी रक्काम add करत जायची आणि त्याची नोंदही ठेवायची. फक्त आपल्याच नाही पण आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तींच्या बाबतीतही काही छान घडले असेल आणि त्या घटनेने आपण खुश झालो असू (उदा. आई-वडीलांची साठी, घरात साजरी झालेली पूजा etc.) त्याही साठी जमेल ती रक्कम टाकायची. आम्ही या स्कीम ला "आनंद बँक" असे नाव दिले आहे. ठराविक महिन्यांनी जरा मोठी amount जमली की दोघांचे एक जॉइंट अकाउंट आहे (already अन्य काही कारणांसाठी उघडलेले) त्यात ती रक्कम भरून टाकतो. या amount चे पुढे जाऊन काय करायचे ते ठरवले नाही अजून पण एक मात्र नक्की की कुठल्यातरी आनंदयोजने साठीच ती रक्कम सत्कारणी लावणार. Happy

ही कथा आणि आम्ही चालू केलेला उपक्रम शेअर करावासा वाटला म्हणून हे लिहिलंय. याच धर्तीवर तुम्हीही काही करत असाल तर जरूर शेअर करा. Happy

गुलमोहर: 

निंबूडे माझ्याकडे त्याची प्रिंटऑऊट आहे ह्या पत्राची, मी स्कॅन करून इथे नक्कीच पोस्ट करेन. एकदम सही वाटलं होतं ते वाचून. निंबुडे एकदम सही उपक्रम आहे. असाच काहीसा उपक्रम आम्ही सुद्धा सुरू केलायं. आम्ही दोघेही कमवतो. दर दोन आठवड्यातून आमची भेट होते. दुसरी भेट हि पहिल्या भेटीपेक्षा वेगळी असावी म्हणून नविन ठिकाण निवडतो. अन त्या भेटीत काही आनंदक्षण अन काही पैसे आवर्जून जमा करतो. आता बर्‍यापैकी जमले आहेत. अजूनही तो उपक्रम चालू आहे. अन त्या प्रत्येक क्षणाची आठवण, अन रक्कमेचा आकडा माझ्या डायरीत लिहून ठेवला आहे.

"आनंद बँक" नाव पण छानच आहे!
>> अगं, एक "आनंद बँक" आहे आणि दुसरी "अक्षय बँक" पण आहे. त्यात आम्ही दर महिन्याची कॅश मध्ये जी रक्कम शिल्लक उरते ती टाकतो. Happy

फार सुंदर कल्पना आहे. नक्कीच आमलात आणायला पहिजे प्रत्येक जोडप्याने. मस्तच!!
कल्पना आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद निंबुडा.

मस्तय.. कथा नि तुझा उपक्रम दोन्हीही.. Happy
निंबे.. मला तुझ खरच कौतुक वाटतय.. कथा नुसती वाचून थांबली नाहीस तू तर ती आचरणात आणण्याचा प्रयत्न केलाय्स.. खरच खूप छान.. तुमच्या ह्या आनंद बँकेची उत्तरोत्तर भरभराट होवो ही शुभेच्छा.. Happy

असाच काहीसा उपक्रम आम्ही सुद्धा सुरू केलायं. ...... अजूनही तो उपक्रम चालू आहे. अन त्या प्रत्येक क्षणाची आठवण, अन रक्कमेचा आकडा माझ्या डायरीत लिहून ठेवला आहे. >>>
सुकी, छान Happy तुम्हा दोघांनाही शुभेच्छा Happy

निम्बे खूप सुंदर !!!

खूप वर्षां पुर्वी हीच गोष्ट मला माझ्या एका मित्राने सांगितली होती ,मी विसरलोही होतो , पुन्हा स्मरण करुन दिल्या बद्दल आभार ....अगदी मनापासुन .....

त्या मित्राकडे ते विपत्र आहे का ते पहातो .

छानच गं निंबुडे! खूप मस्त वाटलं वाचूनही! अतिशय मस्त आहे उपक्रम...... सर्वांनीच असे आनंदक्षण साठवून ठेवले तर आयुष्य अजूनच समृध्द होईल. तुम्हाला व तुमच्या ह्या आनंद उपक्रमाला खूप शुभेच्छा! Happy

'emotional bank account' नावाचा जो प्रकार असतो जिथे तुम्ही तुमची इमोशन्स, अडजस्टमेंट्स साठवून/नोंदवून ठेऊ शकता Happy

मस्त...

मलाही आलं होतं ते विपत्र्.. कल्पना आवडली ही होती. पण खरोखर असं काही करायचं राहिलं. आता करुया म्हणते.. Happy आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद निंबुडा Happy

Pages