तू अन् आठवणी..

Submitted by A M I T on 2 July, 2010 - 01:57

दरवाजा वार्‍याने हलला
स्पंदने धावू लागली
आणि तुझी आठवण आली

तुला ओझरतं पाहून
धुकं पांघरलेल्या
दर्‍यांतून वळणे घेत
दूर गेलेल्या
पटरीकडे पाहत
आपण प्रेमाच्या
आणाभाका घेतलेल्या.......................

आणि गाडीची वाट पाहत
फलाटाच्या बाकावर
बराच वेळ
बोलत बसलो होतो
कधीही न येणार्‍या
प्रवाशाविषयी............................

परवा ओल्या वाळुत
पावलांच्या नक्षा काढीत
सारा सागर पांघरून
माझ्या मिठीत
विसावलेली तू....................

रात्रीचे दिवे विझल्यावर
पौर्णिमेच्या दुधाळ
चंद्राकडे डोळे लावून
माझ्या आठवणींत
जागणारी तू.....................

आताशा तुझ्या तसबीरीशीच
गप्पा मारत असतो
कारण माझ्या खोलीत
आरसा नाहीए......................

गुलमोहर: 

जगजीतच्या "परवाझ" या अल्बममधल्या 'तेरे बारे मे जब सोचा नही था' या गझलमधला हा शेर बघा :
तेरी तसवीरसे करता था बाते...
मेरे कमरेमे आईना नही था....

काय सही उचललाय ना हा शेर त्यांनी तुमच्या कवितेतुन.... तुम्ही कोर्टात खेचा त्यांना Wink

आताशा तुझ्या तसबीरीशीच
गप्पा मारत असतो
कारण माझ्या खोलीत
आरसा नाहीए......................

अहाहा.... क्या बात है!!!
घायल हो गये.
लैला-मजनु आठवले...
कोलटकरांनी लिहलेय,
लैला ही एकच अशी संख्या आहे जी 'म ज नू' अशीही लिहता येते!!
आभारी है अमित जी!!

>>मला माहीत आहे
पण ती गझल "गुलजारांची" आहे..

चुकीची दुरुस्ती :
ती गझल मिराज फैजाबादी यांची आहे!

ती गझल जगजीत सिंग यांच्या "सहेर" या अल्बममध्ये आहे...

तेरे बारे मे जब सोचा नही था
मै तनहा था मगर इतना नही था

तेरे तसवीर से करता था बाते
मेरे घर मे आइना नही था

समंदर ने मुझे प्यासा ही रखा
मै जब सहरा मे था प्यासा नही था

मनाने रूठने के खेल मे हम
बिछड जाएंगे ये सोचा नही था

सुना है बंद कर ली उसने आँखे
कई रातोंसे वो सोया नही था