हे व्यथे...

Submitted by ट्यागो on 29 June, 2010 - 03:42

कशी दिवेलागण करायची घरात
तू नसताना?
कुठल्या सवाष्ण तेलाने पाजळू
पांढर्‍या पायांच्या वाती?
तेवतील असंख्य समया
अन् पळेल देव्हार्‍यातला अंधार,
पण माझ्यातल्या जगण्याची ठिणगी
कुठून आणायची?

हे व्यथे, मी अपूर्णच...
कितीही नाकारलं तरीही.
ये, ये आणि पाजळव तुझी व्यथा
माझ्या व्यथेत...!
बघ दारातली तुळसही
सांडू लागेल मंजिर्‍या,
मग सुकल्या खोडाच्या जपमाळा ल्यायला
कितीसा वेळ लागेल?

गे व्यथे, ये तू,
ये आणि एकदा बघूदे तुला
निस्सीम, परिपूर्ण
ये व्यथे, कुठल्या कोन्यात दडलियेस युगानयुगे?
हे व्यथे...

मयुरेश चव्हाण, मुंबई.
२८.०६.१०, १९.४०.

गुलमोहर: 

.....

तुमची बाप ही कविता वाचल्यापासून तुमच्या इतर कविताही वाचाव्याश्या वाटल्या.
पण प्रतिसादांमधे रसग्रहण नसते तर ही कविता मला कळली असती का शंका आहे.
कामाला लावता की लोकांना तुम्ही!

anuja ranade | 29 June, 2010 - 12:19
स्त्री=व्यथा?
कि
व्यथाच?
पुन्हा असंख्य अर्थ...!!
(अरे एक कविता पचवायला चार दिवस कमि पडतात, जरा दमाने कविता पोस्टत जा!)

अनुजा रानडे च एकत जा............हो साहेब...............त्या खुप मोठ्या कवयित्री आहेत..

Pages