अजहुना आये बालमा...

Submitted by रुपाली on 25 June, 2010 - 06:40

कोणास ठाउक कसे पण पाउस सुरु झाला आणि हे गाणे अचानक आठवले. तशी मला काही जुनी हिंदी गाणि अगदी फार पाठ नाहित. पण काही गाणि आहेत ज्या माझ्या लहानपणीच्या खुपश्या आठवणींशी निगडीत आहेत हे गाणे त्यापैकीच एक.. बालपणिचे अगदी हक्काचे करमणुकीचे घरगुती साधन म्हणजे "रेडीओ".

तेव्हा आमच्या घरात टीव्ही वैगरे नव्हता पण आईला असलेली पिक्चरची, गाण्यांची प्रचंड आवड त्यामुळे सतत रेडीओ चालु असलेला. म्हणजे दुपारचे शाळेत असताना किंवा घरी आल्यावर अभ्यास करण्याच्या वेळांशिवाय रात्रीचा आणि खासकरुन शनिवारी दुपारी अर्ध्या दिवसाने आल्यावर आणि रविवारी सकाळपासुन रेडीओ चालुच. नेहमी शनिवारी दुपारी आई तिचे ठरलेले कार्यक्रम ऐकत असतांना आमची शाळेतुन घरी एंट्री व्हायची. शनिवारी दुपारचा आटोपशीर आणि आवडता बेत म्हणजे "डाळ ढोकळी".( एक गुजराती पदार्थ, दाळ, पोळिचे कच्चे तुकडे, चिंच, गुळ, शेंगदाणे वैगरे टाकुन केलेला..) Happy त्याबरोबर तोंडी लावायला संगीताचे सुर..

अजहुँ ना आए बालमा, सावन बीता जाए
हाय रे सावन बीता जाए

नींद भी अंखियन द्वार न आए
तोसे मिलन की आस भी जाए

आई बहार खिले फुलवा
मोरे सपने कौन सजाए
आ ... अजहुं ...

चांद को बदरा गरवा लगाए
और भी मोरे मन ललचाए
यार हसीन गले लग जा
मोरी उम्र गुज़रती जाए
आ ... अजहुं ...

हे गाणे मला आठवते ते बहुतेक वेळ पावसाळा सुरु होतानाच्या काळातच लागायचे(म्हणजे मला तरी तसेच आठवतेय.. :)). तेव्हा तर हे गाणे कळायची, त्यातले शब्द, त्याच लहेजा, त्याची आर्तता वैगरे कळण्याचे वय देखील नव्हते. फक्त काहितरी गाणं लागलयं यावरच समाधान.. Proud

दुसरे एक गाणे म्हणजे "किसि नजर को तेरा" हे म्हणतान दिसणारा सुरेश ऑबेरॉय.. भलतच उदास व्हायला व्ह्यायचे हे गणं ऐकताना..(अजुनही होते) पण हे गाणे माझ्या "ऑल टाईम फेवरेट" पैकी एक आहे. कोणास ठाउक पण हे गाणे मनात इतके घर करुन बसले आहे की काही करुन माझी पाठ सोडत नाहि. कधीही उदास असले की हे गाणे नक्कीच आठवते.

किसी नज़र को तेरा इंतज़ार आज भी है
कहाँ हो तुम कि ये दिल बेक़रार आज भि है

वो वादियाँ वो फ़ज़ायें कि हम मिले थे जहाँ
मेरी वफ़ा का वहीं पर मज़ार आज भी है

न जाने देख के क्यों उन को ये हुआ एहसास
कि मेरे दिल पे उंहें इख़्ह्तियार आज भी है

वो प्यार जिस के लिये हमने छोड़ दी दुनिया
वफ़ा की राह पे घायल वो प्यार आज भी है

यकीं नहीं है मगर आज भी ये लगता है
मेरी तलाश में शायद बहार आज भी है

न पूछ कितने मोहब्बत के ज़ख़्ह्म खाये हैं
कि जिन को सोच के दिल सोग़वार आज भी है

मग कधी १-२ वर्षंनी घरी टीव्ही घेतल्यावर दर रविवारी मला ह्याच गाण्याने जाग यायची. कदाचित इतकी सुंदर रविवार सकाळची सुरुवात त्यानंतर कधी झाल्याचे मला आठवत नाही. मी मुद्दामुन "झोपेचे सोंग" घेउन बिछान्यात पडल्यापडल्या त्या गाण्याचा आस्वाद घ्यायची.

चंदन सा बदन चंचल चितवन
धीरे से तेरा ये मुस्काना
मुझे दोष न देना जगवालोन
हो जाउन अगर मैं दिवाना

ये काम कमान भावे तेरी
पलकों के किनारे कजरारे
माथेपर सिंदुरी सुरज
होठोन पे दहकते अंगारे
साया भी जो तेरा पड जाये
आबाद हो दिल का वीराना

तन भी सुंदर, मन भी सुंदर
तु सुंदरता की मुरत है
किसि और को शयद कम होगी
मुझे तेरि बहोत जरुरत है
पहले भी बहोत दिल तरसा है
तु और न दिलको तरसाना

तसेच अजुन एक रविवारची सकाळ प्रसन्न करणारे गाणे म्हणजे," कश्मीर की कली" मधले माझे सगळ्यात फेवरेट गाणे. Happy

इशारों इशारों मैन दिल लनेवाले
बात ये हुनर तुने सिखां कहां से
निगाहों निगाहों मैं जादु चलाना
मेरी जान सिखां है तुम ने जहां से

मेरे दिल को तुम भा गये, मेरी क्या थी इअस्मैन खता
मुझे जिस ने तडपा दिया, यहीं थी वो जालीम अदा
ये रांझा की बातें, ये मजनुं के किस्से
अलग तो नही हैं मेरी दास्तां से

मोहोब्बत जो करते है वो, मोहोब्बत जताते नहीं
धडकने अपने दिल की कभी, किसी को सुनाते नहीं
मजा क्या रहां जब के खुद कर दिया हो
मोहोब्बत का इजहार अपने जुबां से

मान के जाने-ये-जहां लाखों मैं तुम एक हो
हमारी की निगाहोन की भी कुछ तो मगर दाद दो
बहारों को भी नाज जिस फुल पर था
वहिं फुल हम ने चुना गुलिस्तां से

अहाहा काय सुंदर वर्णन एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली अणि त्या प्रेमावर असलेला गर्वदेखील आत्ता समजतोय. त्यावेळेला सगळा आनंदी आनंदच होता.. Happy पण हि सगळी आणि अजुन भरपुरशी गाणि अजुनही फेवरेट आहेत आणि आजन्म रहातील.. ह्यात खुपसा किंबहुना पुर्ण: माझ्या "आईचा हात" आहे Proud

समाप्त.

गुलमोहर: 

रुप्स सुरवातीची दोन्ही गाणी माझीदेखिल आवडीची.. Happy हरएक गाणं अन त्या गाण्यासोबत आपल्या आठवणी ह्या प्रत्येकाच्या असतातच पण ह्या आठवणी जगण्याच्या रीतीमात्र प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात.

रुप , गाण्यांबरोबर आणखीय कायमाय आठवत आसात तर लिवत जा. मराठीतली खयची फेव ?
विनय ,बरो रे बाबा तू .

भागो, जाजु, शैलु, विनयकाका, गुरुकाका प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. Happy
हे म्हणजे कोणते विनयकाका?? Happy
गुरुकाका मराठीतली गाणी वेळ मिळला की लिवतलय. एकदम पक्के ध्यानात ठेवलं.. Happy

मला पाऊस आला की
'रिमझिम (झिमझिम?) झरती श्रावणधारा, धरतीच्या कलशात
प्रियविण उदास वाटे रात '

हे गाणे आठवते. त्यातली लबाड बाई म्हणते, पावसा आत्ता थांब, म्हणजे माझा प्रियकर येऊ शकेल, पण तो एकदा आला की
'बरस असा की...'
प्रियकर घरी परत जाऊ शकला नाही पाहिजे.

दुसरे गाणे 'घन घन माला नभी बरसल्या, ..' हे खड्या आवाजातले भीमसेनजींचे गाणे.

आणि आमच्याकडे वर्षभर केंव्हाहि पाऊस पडतो. मग ही गाणी वर्षभर ऐकत बसतो. (पण अजून पाठ झाली नाहीत.)

रुपाली...
'अजहू न आये बालमा...' हे गाणं ऐकण्यातच खरी मजा आहे... गाण्याचं 'पिक्चरायझेशन' एक विनोदी गाणं म्हणुन केलेलं आहे. कलाकार:- 'सोंग' घेतलेला मेहमूद आणि सोबत शुभा खोटे (तरूणपणा तली)... एका अती-उत्तम 'क्लासिकल' गाण्यावर विनोदी कलाकारांचा अभिनय हे काँबिनेशन पटत नाही... असो...

काही वर्षां पुर्वी कोल्हापूर ते कुडाळ हा प्रवास ऑगस्ट महिन्यात मित्रासोबत मोटर-सायकल वरुन करत होतो. मार्ग निवडलेला होता व्हाया गगनबावडा - करूळ घाट. कोल्हापुरातून निघायला ऊशीर झालेला, त्यामूळे घाटात पोचे पर्यंत दिवस मावळलेला होता... व्यवस्थीत ऊजेड असला तरी संधी-प्रकाशाला सुरुवात झालेली, आणी त्यात ढगांनी दरीतून वर येत पूर्ण रस्त्यावर छानपैकी 'आक्रमण' केलेलं... मोटर-सायकल मी चालवत होतो... का आणी कसं कुणास ठाऊक, पण अचानकपणे मला 'प्यासा सावन' मधलं सुरेश वाडकर आणी लता मंगेशकरांचं 'ईन हँसी वादियों से, दो-चार नजारे, चुरा ले तो चले...' हे अप्रतीम गाणं आठवलं... संपुर्ण घाट उतरून कणकवलीत पोचे पर्यंत माझ्या तोंडात तेच गाणं घोळत होतं... शेवटी सोबतचा मित्र वैतागला. 'ह्यां तुझां कधी संपतलां रे?', म्हणुन माझ्यावर अक्षरशः ओरडला... पण त्या गाण्याने माझा काही पिच्छा सोडला नाही. मी दहावित असताना हे गाणं 'रेडिओ सिलोन' वर लागायचं. त्या नंतर तब्बल १०-१२ वर्षांनी ते गाणं मला परत आठवलं होतं. आणि पुन्हा आज बरोब्बर १४ वर्षां नंतर तेच गाणं मला www.mastemag.com वर सापडलं...
एका गाण्याचा अनुभव शेअर करतोय...

झक्की,

दुसरे गाणे 'घन घन माला नभी बरसल्या, ..' हे खड्या आवाजातले भीमसेनजींचे गाणे.

घन घन माला नभी दाटल्या ... मूळचं मन्ना डेचं आहे. भीमसेन जोशींचं नाही.

विनयकाका Lol
झक्की Happy
मास्तरांनु, तुम्ही कित्ती दिवसांनी एवढं बोललात. कदाचित आवडता विषय म्हणुन... Happy पण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद अजुन हे गाणे मी बघितलेले नाही. Sad

व्वाह रुपाली!! अगदी "नोस्टॅलजिक" करुन टाकलस. Happy

'किसी नजर को...' त्या वयातलं अगदी फेवरेट. भुपिंदरच्या वजनदार, गहिर्‍या आवाजाने गाणं जितकं श्रवणिय केलं आहे तितकच डिंपलमुळे प्रेक्षणिय देखिल! Happy

बाकी पाऊस म्हटलं की "तुम जो मिल गये हो" , "जिंदगीभर नही भुलेगी" (हाय मधुबाला!), "रिमझिम गिरे सावन" ही गाणी मनात अलगद येऊन बसतात.

अश्विनीमामी, अहो असे लिहायला घेतले तर ह जन्म अपुरा पडेल मला.. Happy
भ्रमा तुझी पोस्ट.. आनंदच आनंद.. Happy हो पावसाळा विषयावर तर भरपुरच स्टॉक आहे माझ्यकडे, जाउदे.. रोज एक वेगळे गाणे उमटते मनात पाउस पडताना.. Happy

व्वा! मस्तच लिहीलंय...ती सगळी गाणी मा़झ्याही आवडीचीच आहेत..एकदम नॉस्टालजीक झाल्यासारखं वाटलं लेख वाचुन Happy