.

Submitted by क्ष... on 24 June, 2010 - 14:00
लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिनोती खूप धन्यवाद Happy माझी अत्यंत आवडती भाजी आहे. आमच्या इथे या भाज्या अजिबात मिळत नाहीत. भारतात गेले की आईला दोनदातरी करायला लावते. Happy या भाजीबरोबर ज्वारीची भाकरीच हवी Happy

अंजली पुढच्यावेळी बिया घेउन येणार आहे मी. उगवेल इथे असे मला विश्वसनीय सुत्रांकडून कळालेय Happy
मला पण नाही मिळत ग इथे Sad आठवली म्हणून लिहिली.

या भाजीबरोबर ज्वारीची भाकरीच हवी >> अगदी अगदी Happy

पुण्यात मिळत नाही की काय कोण जाणे, पण माहेरी झाली नाही कधी.. >> मिळते. निदान डेक्कन्/प्रभात रोडवरच्या भाजीवाल्यांकडे मिळते.

बस्के मिळते की गं पुण्यात. हडपसरच्या मंडईत तर अगदी ताजी शेतातून काढून आणलेली मिळते. बाकी ठिकाणीपण पाहिली आहे.

पुण्यात सहज मिळतो आंबट्चुका.

आम्ही त्याची कोशिंबीर करतो.

चुका बारीक कापायचा. त्याच्यात कच्चा कांदा बारीक कापून, भाजलेल्या दाण्याचा कूट, मीठ, साखर घालून कालवायच आणि वरून हिंग, मोहरी, जीरे आणि तिखट किंवा हिरव्या मिरच्याची फोडणी. एकदम झकास.

इथे आंबटचुका मिळत नाही म्हणून ब्रॉकोलीची अशीच कोशिंबीर करते आणि आंबटपणासाठी लिंबू पिळते. ब्रॉकोली अगदी बारीक कापायची मात्र.

चुका बारीक कापायचा. त्याच्यात कच्चा कांदा बारीक कापून, भाजलेल्या दाण्याचा कूट, मीठ, साखर घालून कालवायच आणि वरून हिंग, मोहरी, जीरे आणि तिखट किंवा हिरव्या मिरच्याची फोडणी. एकदम झकास.>>>>> आर्च, आम्ही लेट्यूसच्या पानांची करतो अशी कोशिंबीर. फोडणीत भरलेल्या मिरच्यापण घालते कधी कधी.

आणि आम्ही पातीच्या कांद्याची आणि पालकाची. दोन्हींवर लिंबू पिळून. कांद्याला तिखट/मिरची नाही लागत, आणि पालकात टोमॅटोपण चांगला लागतो. (पण आम्ही कोशिंबीर नाही, पचडी म्हणतो त्याला.)

बाकी आता मला मिनोतीच्या विठाईचा हेवा वाटायला लागला आहे! Happy

मिनोती, रेसिपीबद्दल आहेच पण फोटोबद्दल खास धन्यवाद!!

चुक्याची चटणीही सुरेख लागते. माझे वडील खूप छान करतात Happy

मिनोती, तुम्ही छान पालेभाज्यांच्या रेसिपी देत आहात Happy
ही माझी आवडती भाजी पण इथे नाही मिळत Sad
आमच्याकडे आंबट चुका,मेथी,दुधी भोपळा घालुन दालचा करतात, मस्त लागतो.

अहाहा, मिनोती काय छान छान रेसिप्या टाकते आहेस तू! सगळ्याच पालेभाज्या माझ्या भयंकर आवडीच्या!!
भाज्यांचे फोटो पण फक्कड आहेत. Happy

मस्त! Happy

मिनोती, पालेभाज्या म्हणजे माझाही वीक पॉईंट. त्यामुळे भयंकर हळहळते आहे मी. आधी शेपू तरी मिळायचा आता तर तोही दिसला नाहीये इकडे Sad

मिनोती, तुमच्याकडे आंबटचुक्याला अंबटचुका असे म्हणतात का? की शीर्षकात टायपो झाला?

पुण्यात मिळत नाही की काय कोण जाणे, पण माहेरी झाली नाही कधी.. >> मिळते. निदान डेक्कन्/प्रभात रोडवरच्या भाजीवाल्यांकडे मिळते.>> होम सिक झाले कि ग. आई दोन रुपये देउन मिरची कोथिंबीर खोबर्‍याचा तुकडा आणायला लावायची तेच आठवले. डेक्कन वर स्पेशल पालेभाजीवाला होता.

करून बघतेच.

मिनोती ही भाजी आमच्याकडे एकच भाजीवालि घेउन बसते. मी तिला विचारल तेंव्हा ति म्हणाली की आंबट चुका आहे. पण मला धाडस झाल नाही. कारण आमच्याकडे ही भाजी मी कोणाकडे पाहीलि नव्हती. आता तु फोटो टाकलास त्यामुळे कळल की तिच भाजी आहे. आता आणुन तुझ्या पद्धतीने करेन. धन्यवाद.

>>आई दोन रुपये देउन मिरची कोथिंबीर खोबर्‍याचा तुकडा आणायला लावायची तेच आठवले. >> २५ रुपये जुडी कोथिबीर झाली हो मामी आता Happy