.

Submitted by क्ष... on 22 June, 2010 - 14:15
लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी आवडती भाजी. तूमच्याकडे देठ घेत नाहीत का ? आम्ही देठ सोलून, म्हणजे वरचा केसाळ पापुद्रा काढून घेतो. आमच्याकडे उडदाची डाळ फोडणीत घालतात.

छान आहे गं पाकृ.... भोपळ्याच्या पानांचीही भाजी होऊ शकते हेच मुळात माहीत नव्हते!

मिनोती, दोन्ही कृती छान आहेत. २-३ चमचे डाळ आणि तांदूळ ही पद्धत नवीन वाटली.

माझी एक मंगलोरची कलीग करते ही भाजी.

आमचीही खूप आवडती भाजी. कोंकणात साधारणपणे प्रकार २ नुसार करतात व थोडं किसलेलं खोबरंपण[नारळ] टाकतात. पाला कोवळा व लाल भोपळ्याचा [डागर] अत्युत्तम. मुंबईत मिळणं कठीणच. एका वेगळ्याच स्वादाची ही भाजी ज्याना आवडेल ते "निवडक १०" पदार्थात नोंदवतील. कांहीना भोपळ्याच्या फुलांची भाजीही खूप आवडते. आवड एकेकाची !

<<भोपळ्याच्या पानांचीही भाजी होऊ शकते हेच मुळात माहीत नव्हते!>> हल्लीच एका टीव्ही वाहीनीवर
द्राक्षाच्या वेलीवरची कोवळी पानं घेवून त्याच्या अळुवडीसारख्या छान वड्या करण्याची पद्धत दाखवली गेली. शेवग्याच्या [शेंगा देणार्‍या] कोवळ्या पाल्याचीही कोंकणात भाजी करतात व ती छानही होते. म्हणूनच, मा.बो.सारख्या मंचावर अशी माहीती देणार्‍याचे आभारच मानायला हवेत.

मुंबईत काही ठराविक भाजीवाल्यांकडे मिळतात भोपळ्याची पानं. अन ते सुद्धा क्वचितच. अशी पानं आत्याला, मावशीला किंवा आईला कोणालाही मिळाली की तीनचार जुड्या घेउन, साफ करून मिठाच्या पाण्यात शिजवून सगळ्यांच्या घरी पोचती करणे हे एक महत्वाचं व्रत असायचं.

ही शिजवलेली पानं + देठ, शिजलेली तुरीची डाळ , थोड्या तेलावर परतलेल्या बेडगी मिरच्या+धणे+ हळद+ खोबरं यांचं वाटण अन ताजी तिर्फळं ठेचून हे एकत्र शिजवायचं. खोबरेल तेलावर कढीपता , सुकि मिरची हिंग मोहरीची फोडणी घालायची अन बशीभरुन भाजी ओरपायची ! स्लर्रप ! देठ चावून चावून खायला काय मजा येते !!

इथे कुठे मिळाली तुला ?

मेधा, मला इथे फार्मर्स मार्केटमधे मिळाली अग. खुप चायनीज लोक घेताना पाहिले. तुझ्या पद्धतीने करुन पहाणार आता नक्की खुप मस्त लागेल असे वाटतेय. ताजी तिरफळे नाहीत पण जी काही आहेत ती वापरेन.

भाऊ, मम्मी कधीकाळी शेवग्याच्या पाल्याची भाजी करायची. आता विचारावे लागेल. द्राक्षाच्या पानांमधे भात, पाईन नट्स वगैरे घालून डोल्मा मस्त होतो.

कारल्याच्या पानांची जुडी पण मिळते आणून पाहिन एकदा (घरच्या गिनीपिगच्या पोटावर अत्याचार Wink ).

आमच्या बाजूच्याच्या घरात भोपळ्याचा भला मोठ्ठा वेल आहे. त्यामुळे आई बर्‍याचदा ही भाजी करते. पण ती शेपू घालूनच करते. शेवग्याच्या पाल्याची भाजी पण घरात फेवरेट.

आता या पद्धतीने पण करायला सांगेन. मेधा, तुझ्या पद्धतीची रेसिपी जरा विस्तृतपणे टाकशील का प्लीज??