माझेही दुहेरी इंद्रधनुष्य...

Submitted by मार्को पोलो on 21 June, 2010 - 23:44

हैद्राबाद मध्ये असताना एका सुंदर संध्याकाळी घराच्या गच्चीवरुन हे दुहेरी इंद्रधनुष्य दिसले...
पटकन् मोबाईल कॅमेर्‍याने फोटोज् टिपले...


--
--
--
एका वेगळ्या अँगल ने...

--
--
--


--
--
--

आणी त्याच वेळी समोरच्या बिल्डिंग वर ह्यांचेही दर्शन झाले. बहुदा ते पण आमच्यासारखेच दुहेरी इंद्रधनुष्याची मजा लुटत असावेत...

गुलमोहर: 

चंदन सुंदर टिपले आहेस रे फोटो... बाकी शेवटच्या फोटोतून टिपले आहेस काय?:हहगलो: Light 1

दुसरा फोटो एकदम ठ्ळ्ळ्क...

इंद्रधनुष्य तर सह्हीच दिसताहेत, आणि बाजूच्या हिरवाईची तकाकीही सुंदर उठून दिसत आहे छायाचित्रांत.... वानरदूतपण भारी! Happy

चंदन , हो तेच तर पाहून बोललो ना की हे इंद्रधनुष्य तू त्या बिल्डींग वरून टिपताना छान दिसतोय Light 1 .. चंदन पण कॉंक्रीटच्या जगंलात तितकं मोहक वाटत नाही रे इंद्रधनुष्य.. आरती २१ ने काढलेलं इंद्रधनुष्य पाहीलस ना..!

हो तेच तर पाहून बोललो ना की हे इंद्रधनुष्य तू त्या बिल्डींग वरून टिपताना छान दिसतोय>>>
Lol

पण कॉंक्रीटच्या जगंलात तितकं मोहक वाटत नाही रे इंद्रधनुष्य>>>
अगदी बरोबर...

अप्रतिम, एकतर इंद्रधनुष्य जमिनीला टेकलेले दिसणे मुष्कील आणि त्यांचे प्रतिबिंब त्याहून दुर्मिळ.
मस्त.

अरे वा !! डबल धमाका
मस्तच

अमोल केळकर
---------------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा

मस्त Happy

मस्तच रे. क्लियर आली आहेत दोन्ही धनुष्ये.
त्या छत्रीजवळून काढलेला फोटो कसला जबरी आला असता ना ?!

दुहेरि इंद्रधनुष्य अगदि क्वचितच दिसते. खुपच छान फोटो. जणु भुलोकाहुन स्वर्गाला जायचि शिडिच.

वावा

एकतर इंद्रधनुष्य जमिनीला टेकलेले दिसणे मुष्कील आणि त्यांचे प्रतिबिंब त्याहून दुर्मिळ >> अगदी बरोबर ... मी पहिल्यांदाच पाहिले ... एकदम मस्त फोटो.