अंतर दोघातलं....

Submitted by suryakiran on 21 June, 2010 - 07:17

माझ्या कुशीतले मखमल
रोज पहाटे निघून जाते,
देव्हार्‍यातल्या फुलांसाठी,
एक फूल उगाच का हो दमते...

अंगणात ओल्या थेंबाचा,
रोजच पाऊस पडतो,
तुझ्या तळहाती स्पर्श करून,
तो थेंब हसत हसत लुप्त होतो..

तुळशीलाही होतो आनंद,
ओंजळ तुझी भरलेली पाहून,
म्हणूनच नेहमी लाभते,
सौख्य तूला अगदी भरभरून..

दिवसाची तुझी लगबग,
निवांत पहावीशी वाटते,
प्रत्येक पाऊल सखे,
तू हळूवार जे टाकते..

घरतल्या कोपर्‍यालाही,
झालीये आता तुझी सवयं,
सांग मज आता मगं,
तुला आणखी काय हवयं..

नजरेत तुझा नसतो,
कुठलाच तो अहंकार,
पापण्या झुकवून नेहमीच,
तुझी माफी अन आभार..

भगवंता जमल्यास तूला,
एक मागणे तेवढे पुरे कर,
माझ्या नजरेला पोरकं करून,
होऊदेत तीच्या डोळ्यातून जगसफर..

डोळे नसूनही तीला
तीचं जगं किती सुंदर आहे,
देहाने एकरुप असलो तरी,
तूच सांग केवढं अंतर आहे ?

-- सुर्यकिरण

गुलमोहर: 

छान Happy

मस्त रे सुकि...

फक्त इथे माझ्या हवं का?
माझी कुशीतले मखमल

हे जबरदस्त...

भगवंता जमल्यास तूला,
एक मागणे तेवढे पुरे कर,
माझ्या नजरेला पोरकं करून,
तीच्या डोळ्यातून जगाची सफर कर...

भगवंता जमल्यास तूला,
एक मागणे तेवढे पुरे कर,
माझ्या नजरेला पोरकं करून,
तीच्या डोळ्यातून जगाची सफर कर...>>>>>>.खुपच छान Happy

अरे वा! ही पण छान.
पहिलं कडवं अप्रतिम Happy
(डोंट माईंड, पण इतक्या सुंदर कवितांमधे शुध्दलेखनाच्या चुका म्हणजे सुग्रास जेवणात दाताखाली खडा आल्यासारखं होतं बघ. जरा त्याकडे लक्ष देशील? :हसर्‍या चेहर्‍याने विनंती करणारी बाहुली:
मला कवितेतलं फारसं कळत नाही, पण शुध्दलेखनातलं कळतं :फिदी:)

लले, धन्यवाद. पण खर सांगू कविता लिहिताना मी ती डायरीतून उतरवून किंवा आधी सुचलीये मग ती मी इथे माबोवर टाकतोय अस नाहीये. एक कडवं सुचलं की पुढचं सुचत जातं अन ते मग कवितेत अ‍ॅड होत जातं अन जिथे मन रमतं , आनंदून जातं तिथे बरोबर कविता संपलेली असते. म्हणूनच ह्या कविततेंचा बॅकअप सुद्धा नाहीये माझ्याकडे कारण त्या जश्या सुचल्या तश्या माबोवर टाकल्या आहेत. Happy तरीही मी प्रयत्न करील.

म्हणूनच ह्या कविततेंचा बॅकअप सुद्धा नाहीये माझ्याकडे >>> असं मात्र करू नकोस. बॅक अप ठेवच. Happy

कविता लिहिताना मी ती डायरीतून उतरवून किंवा आधी सुचलीये मग ती मी इथे माबोवर टाकतोय अस नाहीये. एक कडवं सुचलं की पुढचं सुचत जातं अन ते मग कवितेत अ‍ॅड होत जातं >>>

हरकत नाही. पण हे सगळं आधी डायरीत केलंस तर कसं? Happy आणि मग इथे टाक ना Happy

लले.. पेन अन डायरी घेवून बसतो तेव्हा फार कठीण जातं सुचायला तेव्हा मी इथे लिहून पोस्ट करेन. अन मग डायरीत लिहून बॅकअप घेईल अन पुन्हा एडीटून करेक्ट करेल.. हुश्श... Proud .. पण तुझा सल्ला मोलाचा आहे.:स्मित:

ललीला अनुमोदन. कवितेत शुद्धलेखनाच्या भरपूर चुका आहेत. वाचताना रसभंग होतो. काना मात्रेचा फरक असेल तरीसुद्धा शब्दांचे, भावनांचे अर्थ बदलतात. इथे लिखाण अपूर्ण ठेवायची सोय आहे. एकदा लिहून काढलं की दहा वेळा तरी वाचा, तपासा, आवश्यक त्या सुधारणा करा आणि मगच पोस्ट करा.

कळलं का सुक्या.. जे ललीनं आणि मंजुने सांगितलं तेच मी उदाहरणासहित सांगितलय, माझा प्रतिसाद नीट वाच, मग तुझी कविता वाच आणि आवश्यक ती सुधारणा करुन घे Wink

लले.. पेन अन डायरी घेवून बसतो तेव्हा फार कठीण जातं सुचायला

हे म्हन्जे पेपर समोर धरल्याशिवाय होत नाही सारखा प्रकार आहे.

रच्यकने... एक घटना...

आम्ही मित्र बंगाळुरात होतो. एक मित्र सवयीप्रमणे पेपर घेउन गेला. बाहेर आल्यावर त्याला विचारलं. कानडी येतं का तुला ? कानडी पेपर घेउन गेलास आत. म्हणाला, काहीतरी छापिल लागतं समोर, कळ यायला...

पर्‍या.. Rofl

मंजे तुला म्हणायचयं तरी काय ? Uhoh .. मला अश्याच कविता सुचतात Sad कित्येक कविता वाहून सुद्धा गेल्यात अन नंतर मग वाईट वाटतयं की त्यांचा बॅकअप माझ्याजवळ नाहीये ते Sad

ऑर्कूटावर.. Sad माझा खूप जुना आयडी हॅक केला कोणीतरी.. तेव्हापासून मी ऑर्कूटावर जातच नाही. Uhoh आता सगळ्या कवितांचे बॅकअप घ्यावे लागणार तर.

Pages