झेंडू

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

कालचा गुडीपाडवा परत बाजारात झेंडुची फ़ुले यायला कारणीभूत झाला.

zendu.jpg

मुंबईचा बाजार दसरा, दिवाळीचा पाडवा आणि गुडीपाडवा या दिवसात या गोंड्यानी नुसता ओसंडून वहात असतो. गुढी काय आणि नवरात्रातले घट काय, झेंडु हवाच.
साधारण फ़िक्कट पिवळा आणि वरच्या फ़ोटोतला तेजस्वी केशरी हे मुख रंग. पिवळ्या रंगात आणखी एक फ़िक्कट छटा आढळते. एका प्रदर्शनात मी पांढरा झेंडू बघितला होता पण तो अगदी शुभ्र नव्हता त्यात थोडी पिवळी छटा होतीच. काहि पाकळ्या लाल असणारे पण झेंडू दिसतात, पण ते आकाराने छोटे असतात.

Tagets Erecta असे याचे शास्त्रीय नाव. याचे आफ़्रिकन आणि फ़्रेंच असे दोन मुख्य प्रकार. पण ना फ़्रांस ना आफ़्रिका, याचे मूळ. याचा उगम मेक्सिकोमधे झाल्याचे मानतात. आफ़्रिकन झेंड्य उंच वाढणारा, साधारणपणे कुंपणासाठी याची लागवड करतात. यांचे खोड उंच वाढत असले तरी फ़ारसे मजबूत नसते. फ़ुले मोठाली असतात. फ़्रेंच प्रकार मात्र साधारणपणे कमी उंचीचा आणि लहान फ़ुले येणारा.

आचार्य अत्र्यांचा झेंडूची फ़ुले हा काव्यसंग्रह प्रसिद्धच आहे. त्यातल्या प्रेमाचे अदवैत आणि आम्ही कोण, या दोन कविता आम्हाला अभ्यासाला होत्या. अत्र्यानी झेंडूची फ़ुले हे नाव का घेतले, याचा आमच्या शिक्षिकेने केलेला खुलासा, म्हणजे या फ़ुलांचा कायम राहणारा रंग, अत्र्याना भावला. आणि ते खरेच आहे, हि फ़ुले सुकली तरी याचा रंग तोच राहतो. मुंबईत खुपदा नविन दुकानाचे उदघाटन करताना झेंडूच्या फ़ुलांचे तोरण लावलेले दिसते, आणि त्याचा रंग बराच काळ तसाच राहतो.
झेंडुच्या झाडाजवळ गेल्यास एक तीव्र असा गंध येतो. फ़ुलांपेक्षा झाडालाच तो गंध जास्त येतो. त्याला ना धड दुर्गंध म्हणता येत ना धड सुगंध. या वासामूळे काहि किटक दूर पळत असले तरी काहि किटकांच्या आणि फ़ुलपाखराच्या अळ्या या झाडावर पोसतात. या झाडापासून एक तेल मिळते आणि अत्तरासाठे बेस म्हणून ते वापरतात.
हे तेल अर्थातच सुगंधसाठी कुणी वापरत नाही पण जंतुनाशक म्हणुन ते वापरतात.

झेंडुच्या बिया सहज रुजतात. निर्माल्यातल्या फ़ुलांच्या बियाही पहिल्या पावसात रुजलेल्या दिसतात. झेंडुच्या फ़ुलात बियांच्या खाली एक नखभर पांढरा भाग असतो. लहानपणी तो आम्ही खायचो. झेंडुच्या कळ्या पण काहि कमी देखण्या नसतात. त्या टपोर्‍या कळ्या, हळुहळु उकलतान बघायला मजा येते.
झेंडुच्या पाकळ्यात कितपत प्रथिने असतात याची कल्पना नाही, पण कोंबड्याना त्या पाकळ्या खायला घालतात. खास करुन युरपमधे तशी पद्धत आहे.
याचे कारण वेगळेच आहे. या पाकळ्या खाऊन कोंबड्यांच्या मासाला एक सुंदर केशरी रंग येतो. तसेच अंड्याच्या बलकाला पण केशरी रंग येतो.

विषय: 
प्रकार: 

दिनेश, ह्या घाती झेंडू मिळतात, मला नवल वाटलं खरचं.

असो.. तुम्हाला माहिती असेलच. एक इंग्रजी झेंडू नावाचा प्रकार पण असतो. त्याची फुले छोटी जरी असली तरी रंग लाजबाब असतो. तो झेंडू उंच न वाढता खाली पसरत जातो आणि एकाच फांदीपासून खूप फरदड्या फुटत जातात. जो भाग तुम्ही खायचे तो आम्ही पण खायचो. आम्ही त्याला खोबरे म्हणायचो.

अत्र्यांनी विडंबन संग्रहाला हे नाव का दिले ह्याचा खुलाच छानच आहे. त्याबद्दल धन्यवाद!

दिनेशदा भगवा रंग फारच मोहक दिसत आहे. याची पानेही किती मुलायम असतात. बियांच्या खालच्या नखभर कंदाचे सेवन फारच छान.
युरोपमधली माहिती नव्यानेच मिळाली. असे प्रयोग करण्यात युरोपियन फार तरबेज आहेत. मी काल येथे सफरचंदाच्या फोडी करण्याचे एक उपकरण बघितले. मधोमध गोल सुरीसारखे पाते व त्याच्यासभोवती आठ पाती. सफरचंदाच्या वर हे उपकरण ठेवायचे व खाली दाबायचे. फोडी बियांविरहीत खायला तयार. थोडे विषयांतर झाले परंतु झेंडुबद्दल बरीच माहीती मिळाली. आतापर्यंत माझ्यामते याचा वापर फक्त देवघर व सजावट इतकाच मर्यादीत होता. धन्यवाद.

बी, रंग पिवळाच असतो कि आणखी वेगळा.आणि किशोर लहानपणी आपण सगळेच वेडे होतो म्हणायचे.
मी तर ते सफरचंदाचे तुकडे करणारे उपकरण वापरले आहेच, पण ऑलिव्हच्या बिया काढणारे. संत्रे सोलणारे, फरसबी कापणारे उपकरणही वापरलेय.
ऑलिव्हच्या बिया काढण्यासाठी एक खोलगट भाग असतो त्यात ऑलिव्ह ठेवायचे आणि वरुन एका द्ट्ट्याने दाबायचे. बी बाहेर पडते. मोसंबी आणि त्यासारखी जी संत्री मिळतात ती सोलण्यासाठी एक छोटासा हूक असणारे उपकरण असते, त्याने उभ्या चिरा दिल्या कि साले सहज निघतात. एका चौकोनी तबकडीमधे जवळ जवळ काहि पाती बसवलेली असतात. त्यातून फरसबीची शेंग ओढली कि पातळ चिरून होते.
अननस कापण्यासाठी एक भूमिती मधल्या कर्कटकासारखे उपकरण मिळते. त्याने बाजुची साल आणि मधला भाग सहज निघतो.
टोमेटो कापण्यासाठी पण एक स्लाईसर मिळते. आणि या उपकरणांचा बाकि काहिच उपयोग नसतो.
कल्पक उद्योजक रे बाबा !!!

झेंडुच्या बिया सहज रुजतात. निर्माल्यातल्या फ़ुलांच्या बियाही पहिल्या पावसात रुजलेल्या दिसतात. >>>>>>

आता नाही उगवत. माझ्या बागेत कायम झेंडू असायचा तो निर्माल्यामुळेच. पण आताच्या झेंडूंमध्ये बियाच नसतात. बहुतेक टिश्यू कल्चर केलेले असावे. मला फारशी माहिती नाही. पण फुलामागची हिरवी गादी दाबुन पाहिली तर पोकळ असते. विस्कटून पाहिल्यास बिया नसतात.

हे फुल पाहिले कि मला नेहमी चुपके चुपके आठवतो. 'गेंदे का फुल, फुल होके भी फुल क्यो नही है' हा प्रश्न आठवतो.

साधना.

साधना, बहुतेक कोवळी फुले बाजारात आणत असावेत. द्राक्षात तरी कुठे असतात बिया आता ?

कोवळी फुले आणतात म्हणून बिया नसतात, तर थोड्या फुलांमध्ये तरी असायला हव्या होत्या.

आपण झरबेरा घेतला तर त्यात बिया नसतात, तसेच आता झेंडुमध्येही नसतात. आता फुलरोपे वाढवण्याच्या पद्धती बदलल्यात बहुदा, त्यामुळे बिया बनत नसतील. धान्यामध्ये पण असे प्रकार आलेत ना? शेतक-याला दरवर्षी नवीन बियाणे घ्यावे लागते. पहिल्यासारखे ह्या वर्षीचे थोडे ठेऊन ते पेरल्यास त्यातुन नवीन रोपे होत नाहीत.

सीडलेस द्राक्ष ही वेगळीच जात आहे ना?

फोटो अतिशय सुंदर आहे. रंगाचा तेजस्वीपणा अगदी ऊठुन दिसतोय.

बिया तयार करण्यात झाडाची बरिच शक्ति खर्च होते. झेंडुच्या बाबतीत सर्व झाडातले तेल, बियांमधे साठवले जाते, त्यामुळे ते तेल बिया तयार व्हायच्या आधीच काढले जाते. म्हणुन असे प्रकार करत असावेत.

द्राक्षाची सीडलेस हि खास विकसित केलेली जात आहे पण मला खरेच द्राक्षाच्या बिया खायला आवडायच्या. काळ्या द्राक्षाचा ज्युस करताना त्या बियाहि रगडल्या जायच्या. आणि त्याची खास चव यायची.
या बियांमुळेच, दारुचे दुष्परिणाम टळतात. तसेच द्राक्षांच्या बियाचे तेल हैद्राबादच्या बिद्री कलेच्या वस्तूंच्या पॉलिशसाठी वापरतात. निदान त्यासाठी तरी या बिया उपलब्ध व्हायला हव्यात.

सफरचन्दाचे फोडी करणारे उपकरण आपल्या भारतात मिळते. मी स्वतः वापरते. अशीच टेकनॉलॉजी असणारे पण आकाराने खूप मोठे उपकरण नारळ (विशेषतः असोले - हिरवे )सोलण्यासाठी सुद्धा वापरतात. सेम पद्धत फक्त आकार मोठा.

बिया तयार करण्यात झाडाची बरिच शक्ति खर्च होते... म्हणजे नेमकं काय ते नाही कळलं. कारण कॅलरीजमधे असं काही मोजल्या गेल्याचा रेफरन्स वाचला नाही. कुठे लिंक मिळाली तर वाचायला आवडेल.
बायनॉमिनल नॉमेनक्लेचरच्या नियमाप्रमाणे जीनस चं नाव कॅपिटल अक्षरानी तर स्पिशीज लोअर केसनी सुरु होतं. Tagets Erecta, 'E' लोअर केस हवा. ही नावं ईटालिसाइझ करतात किंवा अधोरेखित.
-मृण्मयी

दिनेश, या छायाचित्रात कथिया रंगाची जी झेंडीची फुले दिसत आहेत तेच ईंग्रजी झेंडू या नावानी ओळखली जातात विदर्भात.

कमाल आहे, फाईल किती वेळा, जोडण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या जोडल्याच जात नाही आहे. नंतर मेल करूनच पाठविन तुम्हाला.

- बी