तुटतात रोज तारे मजा पाहण्यात आता

Submitted by कमलेश पाटील on 19 June, 2010 - 01:48

तुटतात रोज तारे मजा पाहण्यात आता,
सरतात रोज रात्री तुला मागण्यात आता.

मम काच ही बिलोरी तडा वादळात गेला,
दिसती मला तुझ्या प्रतिमा आरशात आता.

छळतात येथ आता तुझे भास दाटलेले,
उरले इथे न काही मिथ्या जीवनात आता.

झुरतात रातराण्या निशा कोसळून जाते,
उगा दु:ख झाकताना किती होय मात आता.

जगण्यास वेचताना तुला साठवीत गेले,
वनवास संपताना जगे मी तुझ्यात आता.

गुलमोहर: