ग्लोबल गाणं...

Submitted by सावली on 15 June, 2010 - 02:48

मागे काही दिवसांपूर्वी जपानी डेकेअर मध्ये काही कार्यक्रम होता. मुलच गाणी म्हणणार नाच करणार खेळणार होती. बाकी आम्ही पालक प्रेक्षकाच काम करणार होतो.
सुरुवातीची काही गाणी झाली आणि ४ वर्षाच्या मुलांचे नाविन गाणे सुरु झाले. ते ऐकल्यावर मला अगदी आश्चर्याचा धक्काच बसला. माझ गानकले विषयीच ज्ञान अगदीच शून्य असले तरी हे गाण मी नक्कीच ओळखत होते. हे आपल मराठीमधल पप्पा सांगा कुणाचे च जपानी रुप होत.
गाण्याची चाल तीच, शब्दांचा अर्थ पण साधारण सारखाच. जपान्यांचा भाषांतराचा हातखंडा माहीत असल्याने माझ्या मनाने ठरवून टाकले कि हे गाण नक्की मराठी मधून जपानी मध्ये भाषांतरित झालं आहे.
हे जपानी गाणे इथे बघा व ऐका
http://www.youtube.com/watch?v=uZF94Ts9How

मराठी गाणे इथे बघा व ऐका
http://attmp3.com/music/papa-sanga-kunache_708bf5.html

मग तिथल्या टीचरला जाऊन गाण्याबद्दल सांगितलं कि माझ्या भाषेत पण असच गाण आहे वैगरे. तिने मला जपानीमध्ये गाण आणि रिदम याबद्दल बरीच माहिती पुरवली जी सगळीच्या सगळी माझ्या डोक्यावरून गेली. मी कधी मराठीमधून गाण्याबद्दल माहिती करून घेतली नाही , जपानीमध्ये काय कळणार यातल.
नंतर काही दिवसांनी मी इंटरनेटवर परत एकदा हे जपानी गाण शोधायचा प्रयत्न केला आणि मला आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. हे गाण इंग्रजीमध्ये सुद्धा आहे, फ्रेंच मध्ये सुद्धा आहे. म्हणजे बरच ग्लोबल गाणं आहे कि. सगळीकडे चाल साधारण सारखीच , लय मात्र कमी जास्त. आणि सगळी गाणी आपल्या आईबाबाबद्दलच.
हे इंग्रजीमध्ये इथे बघा व ऐका
http://www.google.com/search?q=papa+he+loves+mama+youtube&hl=en&rlz=1B3G...

आता मला प्रश्न पडलाय कि हे गाण कुठून कुठे भाषांतरित झालं असेल आणि तरीही चाल अर्थ सगळ कसा सारख राहील असेल?
तुम्हाला माहिती आहे का ? असेल तर जरा माहिती द्या बर.

जपानी गाणे
उचि नो पापा तो मामा तो वा
तोतेमो अमाई फुफू
पापा वा मामा गा दाईसुकी
मामा मो पापा गा सुकिसा
मामा बिजिन दे पापा हान्सामू
मामा यासाशिई पापा यासाशी

मामा नो ताईता गोहान वा
इत्सूमो ओकोगे दाकेदो
पापा वा इत्सुमो निकोनिको
मोंकू हितोत्सू देनाई

मामा शिओरेरू पापा नादामेरू
मामा वाराएबा पापा होहोएरू

इंग्रजी गाणे (माफ करा पण मराठिमधे एवढ टाइप करायला होत नाहिए.)

Listen well while I tell you a story,
Of a boy and a girl in the spring,
As the first flower burst into glory,
And I heard, every bird start to sing.

Papa, He loves Mama,
Mama, she loves Papa,
Papa, He loves Mama,
Mama, she loves Papa.

In a church, far away from the city,
On a morning in May, they were wed
And the bride's starry eyes looked so pretty,
That the world looking on smiled and said

Papa, He loves Mama,
Mama, she loves Papa,
Papa, He loves Mama,
Mama, she loves Papa.

Just a year from the day they were married,
Came a gift from girl to the boy,
Looking proud as a queen as she carried,
Such a wonderful bundle of joy.

Papa, He loves Mama,
Mama, she loves Papa,
Papa, He loves Mama,
Mama, she loves Papa.

Papa, He loves Mama,
Mama, she loves Papa,
Papa, He loves Mama,
Mama, she loves Papa.

गुलमोहर: 

Happy

पण ओरिगीनल क्रियेशन कोणाची आहे >> हाच प्रश्न मलापण पडलाय. वरती लिहिलयना मी कि कुणाला माहिति असल्यास सांगा. मी पण वाट बघतेय उत्तराची Happy

सावली, लेख पाहिला होता..गाणं पण ऐकलं होतं..खरच कुठून कुठे भाषांतरित झाले काही कळत नाही.
ही अजून काही गाणी बघ. पण यातली इंग्लिश गाणी ओरिजिनल आहेत हे नक्की माहित आहे.
मूळ इंग्लिश गाणे
http://www.youtube.com/watch?v=f3tlIMJ9bK0
जपानी गाणे
http://www.youtube.com/watch?v=GVJ3xCCWfJE

मूळ इंग्लिश गाणे
http://www.youtube.com/watch?v=KQpm8BGmmzQ
जपानी गाणे
http://www.youtube.com/watch?v=JGRSqQlzlP8&p=4125208AFB2D4204&playnext=1...

एम्बी छान लिंक.
ते "ओकी ना कुरी नो" आम्ही नेहेमी म्हणतो घरी.
लहान मुलांची गाणी इंग्लिश ते जपानीमधे खुप भाषांतरीत झालीत.
आणि आधी जपानी गाणि ऐकल्यावर ती भाषांतरीत आहेत हे कळणार सुद्धा नाहीत इतक्या सहजतेने झालीत.
अजुन एक साउंड ऑफ लाईफ मधल
डो अ डिअर अ फिमेल डिअर
ते झालय
दो वा दोनात्सु नो दो
ドはドーナツのド レはレモンのレ
ミはみんなのミ ファはファイトのファ
ソは青い空 ラはラッパのラ
シは幸せよ さあ歌いましょう ランランラン

सावली,
हे गाणे मूळ मराठी असणे जरा अवघड आहे. घरकूल चित्रपटात असे अनेक प्रयोग होते.

हाऊस ऑफ बांबू (मन्ना डे) याचा पण उगम मराठीबाहेरचा असायची दाट शक्यता आहे.

छानच शोधून काढलयसं गं! मजाच वाटतेय... ओरिजिनल इंग्लिश असण्याची शक्यता वाटतेय.

थोडं विषयांतरः मी असं ऐकलय की, मदरशांमध्ये इंग्लिश शिकवताना, nursury rhymes बदलतात.
उ.दा. twinkle twinkle little star, Allah made you what you are!

तसं काहिसं असेल. म्हणजे एक मध्यवर्ती कल्पना तीच ठेवून आपापल्या culture प्रमाणे बाकिचे गाणे बदलेले गेले असेल.

हे गाणे माझ्या आठवणीप्रमाणे 'बोलकी बाहुली' या चित्रपटातील आहे जो देवबाप्पा चा पुढील भाग म्हणून काढला गेला होता. गीतकार आणि संगीतकार मात्र माझ्या लक्षात नाहीत.

मी माझ्या लहानपणी प्रथम 'Papa, He loves Mam' आणि 'हाऊस ऑफ बांबू' ही इंग्रजी गाणी ऐकली. नंतर त्याच चालीची गाणी सी. रामचंद्रने 'पप्पा सांगा कुणाचे' आणि 'हाऊस ऑफ बांबू' अशी मराठीत केली.

https://www.youtube.com/watch?v=ai1b5oMIvL0
गुगल म्हणतय हे चीनी भाषेत आहे... मला उभी लिपी भैस बराबर असल्याने, मी गुगलवर विश्वास ठेवलाय. संगीताची भाषा नसते हे खरय. तसच काही भावना प्रत्येक कल्चर मध्ये असतात जस- होंगे कामयाब. अमेरिकेत जन्मलेले हे गाणे सगळ्या जगाने आपलेसे मानले. भाषा बदलली तरी भावना आणि संगीत तसेच राहिले. प्रत्येक कल्चर मध्ये एक जाणीव असतेच - the best thing a father can do for children, is love their mom.