माझी ऑफीसची डायरी - ४

Submitted by भूत on 14 June, 2010 - 01:48

माझी ऑफीसची डायरी - १ ५ जुन २०१० शनिवार http://www.maayboli.com/node/16803
माझी ऑफीसची डायरी - २ ७ जुन २०१० सोमवार http://www.maayboli.com/node/16841
माझी ऑफीसची डायरी - ३ ८ जुन २०१० मंगळवार http://www.maayboli.com/node/16868

११ जुन २०१० शुक्रवार
२१:३०

आज ऑफीस मधे आलो , सकाळ पासुन काम काम काम ...वेळच मिळाला नाही काही लिहायला , आता कुठे वेळ मिळालाय थोडासा . जेव्हा सगळे घरी गेल्यावर माझी एकट्याची केबीन जागी असते तेव्हा फार फार एकटं वाटतं पण .... आज घरी जाउन तरी काय उपयोग ! आज चिंटु मामा कडे जाउन ३ दिवस झाले .
तो( आणि ती ) नसला की कसं घर ओकं ओकं वाटतं ... घरी जावतं नाही
१० वर्षापुर्वीचा मी अन आत्ताच मी ....माझं मलाच हसु आलं ...गोष्टी कशा पट्पट नकळत बदलतात नाई !
मी परत उरलेलं काम संपवायला घेतलं .
********************************************************************************************************

२२:००
बाकी आज सुध्दा रीमा आली नव्हती , सलग ४ दिवस लीव्ह वर तेही फक्त सर्दीच्या निमित्ताने ...
छ्या: आजकालच्या पोरांना excuse ही देतायेत नाहीत नीट !...

शिवाय तिचा फोनही लागत नव्हता दिवसभर .. तीला इतक्या उशीरा फोन करावा की नको याचा विचार करुन मी शेवटी फोन केला
"रीमा ....हॅलो ...रीमा...."
पलीकडुन काहीच रीप्लाय येत नव्हता ...
" ओह्ह रीमा यु ओके ?? तुला खरच बरं नाहीये का ??? बरं एका नवीन प्रोजेक्टच काम सुरु झालयं ..तु सोमवारी येवु शक.................."
फोन कट !!!
हे अनपेक्षीत होतं !!!

तेचढ्यात एसेमेस आला " SIR , i'll be in office 2moro @ 8:30 . i wanna talk 2 u ~ रीमा "

हे सगळंच अनपेक्षित होतं ,
एकतर दिवसभर काम करुन माझं डोकं फुटायला आलं होतं त्यात हे नवीन पझल ...छ्या: उगाचच फोन केला ...

मी वैतागुन सगळ्या फायली आवरल्या ...लॅपटॉप पॅक केला ... जाता जाता सहज सुचलं म्हणुन जी मेल ओपन केला तर ..........
" I am coming to India ....see you soon ~ निशा "

अजुन एक पझल !!

छ्या: मी कशाला जी मेल ओपन केला ? असा विचार करत मी बाहेर पडलो .
आता पाउस जोरात पडत होता ...शोफरने गाडी बाहेर काढली होती व तो छत्री घेवुन गाडीपाशी उभा होता .... बाकी कुठल्याच गाड्या नव्हत्या ... वॉचमन शोफर आणि मी असे तिघेच त्या ऑफीसच्या आवारात होतो. , थोडेसे पावसाच्या सरींचे संगीत अन बाकी सारी शुन्य शांतता................

मी सहज वळुन ऑफीसच्या कडे पाहीले ....पावसाच्या सरींवर ....७ व्या मजल्या वरच्या एका केबीनचा मंद प्रकाश दिसत होता ... बाकी सारे ऑफीस शांत झोपले होते !

( क्रमशः)

गुलमोहर: 

आरे, इथेच पहिल्या भागांचे धागे पण देत जा ना....... मधूनच काही एखादी लिंक आठवत नसेल आणि वाचाविशी वाटली तर शोधत बसावं लागतं

पुढे काय?

१. मंद प्रकाश असणारी प्रसादची केबिन असते. अरे आपण दिवा चालूच ठेवला असं स्वतःशी म्हणून प्र. वर जातो नि सहज काचेतून खाली पहातो. दिव्याच्या खांब्याशी एक तरूण स्त्री उभी असते नि त्याच्या खिडकी कडेच पहात असते. प्र. खाली धाव घेतो (अर्थात लिफ्टने) पण ती गेलेली असते. तिथे प्र. ला एक वस्तू सापडते. नक्की काय सापडते ते समजून घ्यायच असेल तर उद्या याच वेळी.. इथेच!

२. मंद प्रकाश असणारी केबिन प्र. चीच असते. अरे पण आपण तर दिवा बंद केला होता असा विचार करेपर्यंत "आ आ आ.. धप" काच फोडून एका स्त्रीला खाली टाकलं जातं. प्र. तिथे धावत जातो आणि ती जिवंत आहे का हे बघण्यासाठी तिला वळवतो.... नि हे डायरीच पान संपतं. पुढचं पान पोलिस स्टेशनातून..! नक्की काय झाले ते समजून घ्यायच असेल तर उद्या याच वेळी.. इथेच!

प्रगो... Proud

जाजू Proud

चांगला वाढतोय सस्पेन्स....

जाजु, एक फूल Proud

माझी ऑफीसची डायरी - १ - ५ जुन २०१० शनिवार http://www.maayboli.com/node/16803
माझी ऑफीसची डायरी - २ - ७ जुन २०१० सोमवार http://www.maayboli.com/node/16841
माझी ऑफीसची डायरी - ३ - ८ जुन २०१० मंगळवार http://www.maayboli.com/node/16868
माझी ऑफीसची डायरी - ४ - ११ जुन २०१० शुक्रवार http://www.maayboli.com/node/16974
माझी ऑफीसची डायरी - ५ - १२ जुन २०१० शनिवार http://www.maayboli.com/node/17010
माझी ऑफीसची डायरी - ६ - १३ जुन २०१० रविवार http://www.maayboli.com/node/17041
माझी ऑफीसची डायरी - ७ ( अंतिम )१३ जुन २०१० रविवार http://www.maayboli.com/node/17076