खरं सांगते!

Submitted by के अंजली on 11 June, 2010 - 05:16

खरं सांगते आजपासून
हळवं व्हायचं सोडून दिलय...
लागलेल्या ठेचेलाही
कुरवाळायचं सोडून दिलयं...

अनोळखी कुणी येथे
भासो जीवलग तरी
नाव गाव त्याचे काही
पुसणे आता सोडून दिलयं...

का? कुठे? कसे? कधी?
कुणी आणि कशासाठी
कुणास ठाऊक केव्हांपासून
विचार करणं सोडून दिलयं....

किती चालायचे असे
कुठे आहे विसावयाचे
कुणासाठी इथे तिथे
थांबणं आता सोडून दिलयं....

जिव्हारलेल्या जखमा अशा
काळजाच्या कितीतरी
एक,दोन गणती अशी
करणं आता सोडून दिलयं...
खरं सांगते....

गुलमोहर: 

जिव्हारलेल्या जखमा अशा
काळजाच्या कितीतरी
एक,दोन गिनती अशी
करणं आता सोडून दिलयं...
खरं सांगते......... खुप सुन्दर....
जख्माच जख्मा आहे.. वाटते.???

मस्त आहे कविता..

तू सोडून दिलं असलंस तरी,
जखमांना या काहीतरी अर्थ आहे,
भरल्या असतील त्या कदाचित,
म्हणून काय व्रणाच्या या खुणा व्यर्थ आहे ?

अंजली उत्तर हवय ...

हे सगळं खरं नाही ना?

अनोळखी कुणी येथे
भासो जीवलग तरी
इथे अडखळायला होतंय्...बाकीची कविता गद्य शैलीत सहज उतरलीय पण 'भासे जिवलग तरी' हे नाही.

आग्ग आईग्ग्ग .. तीव्र .. खुपच तिखट मारा होता ..

का? कुठे? कसे? कधी?
कुणी आणि कशासाठी
कुणास ठाऊक केव्हांपासून
विचार करणं सोडून दिलयं ...... -- मीपन .. पन असं प्रात्यक्शिक निभावणे खूप अवघड आहे हो ..

पण खरंच खुप .... छान .पन आता भावना येथे सांगता येत नाहिये शब्दात ..

मस्त! खरं सांगते, '' हेच सर्व सोडून दिलंय'' असं रोज म्हटलं जातं..पण्...ते काही जमत नाही बुवा.:हाहा: नको त्या गोष्टींचाच ''रियाज'' केला जातो!!:अओ:

जिव्हारलेल्या जखमा अशा
काळजाच्या कितीतरी
एक,दोन गणती अशी
करणं आता सोडून दिलयं...
खरं सांगते....

अ प्र ति म...!!!!:)

किती चालायचे असे
कुठे आहे विसावयाचे
कुणासाठी इथे तिथे
थांबणं आता सोडून दिलयं....

खुपच सुंदर