माझी ऑफीसची डायरी -१

Submitted by भूत on 8 June, 2010 - 03:17

५ जुन २०१० शनिवार १६:३०

माझ्या केबीन मधे बसुन सोमवारच्या प्रेझेन्टेशन ची तयारी करत होतो . न कळत समोरच्या काचेतुन बाहेर पाहिल तर नेहमी बर्‍यापैकी वर्दळ असणारार्‍या त्या ऑफीसच्या मध्यभागी असलेली ती शांतता , सुनसानपणा उगाचच मनाला टोचत होता . बाहेरच्या क्युबीकल वर रीमा ह्याच प्रे़झेन्टेशनची इतर तयारी करत होती . (तिला बघुन मला उगाचच माझ्या करीयरचे पहिले काही दिवस आठवतात ...तेच डेडीकेशन ... तशीच मोठ्ठी स्वप्ने .. त्यासाठी सतत प्रयत्न ....)

माझ्या की बोर्ड ची खट्खट अन एसी ची इतर वेळी कधीही न जाणवणारी घरघर सोडली तर बाकी सारी शुन्य शांतता होती .

अचानक काहीतरी लाईटनिंग झाल्या सारखे वाटले मागे वळुन पाहीले तर पाउस सुरु झाला होता .......

समोरच्या बोरीवलीच्या जंगलातल्या त्या दोन टेकड्या उन्हाळ्यानंतरही हिरव्यागार राहीलेल्या... बर्‍यापैकी सुकुन गेलेले पवई लेक .... लिन्क रोड वरची ती नेहमी ची वर्दळ ...अन मी इथे...G & D IT Consultancy Services हिरानंदानी ७ वा मजला च्या काचेच्या भिन्ती मागील संपुर्ण अलिप्त जगातुन हे सारं पहात उभा ... रिमझिम पाउस सुरु झाला अन नकळत अलगदपणे भुतकाळात घेवुन गेला ......

दहा वर्ष ... तब्बल दहा वर्ष झाली या गोष्टीला .... मी दिल्लीहुन कोलेज पुर्ण करुन एकदचा मुंबईला आलो अन महिन्याभरातच " का आलो ? " या प्रश्नाची उत्तरे शोधायला सुरवात केली , एकच आधार होता ऑफीस पवई ला म्हणजे लोकलचा छळ नाही , अन ऑफीसचा एसी ... त्यामुळे मुंबईच्या " थंडगार हवेत " फिरण्यापेक्षा ऑफीसमध्येच बसायची सवय लागली ..... अशाच एका शनिवारी घरी जायचा कंटाळा म्हणुन ऑफीसात बसुन होतो तेव्हा असाच अचानक पाउस सुरु झाला , तेव्हा निशा , माझी २ वर्षे सीनीयर , म्हणाली " प्रसाद कॉफी ? "
" व्हाय नॉट ! चलो "
निशा " चल सीसीडी ला जाउ इथे नको बोअर झालय फार "

मग एक सीसीडी मधे मी एक एक कॉफी पिउन आम्ही दोघ लेक वर गेलो अंधार पडे पर्यंत ....रिमझीम पावसात भिजत होतो .....

पुढे पुढे पाउस वाढत गेला....भेटीगाठी वाढत गेल्या .... ... सीसीडी च्या व्हीझीट वाढत गेल्या अन ...कॉफी ही ...

" सर कॉफी ?? "
खरं सांगायच तर मी थोडा दचकलोच , मागे वळुन पाहीलं तर रीमा !
" सर , आय एम डन विथ माय टास्क , मेल्ड इट टू यु ! इफ यु आर डन , लेट्स हॅव अ कोफी "

मी " ओके . चलो कॅटीन ! "

रीमा " सर , इफ यु डोन्ट माइड , इतका मस्त पाउस पडतोय , .... सीसीडी ...क्यॅपेचिनो ?? "

क्रमशः ७ जुन २०१० सोमवार

( डिस्क्लेमर :
१ ) ह्या लेखातील सर्व विचार लेखकाचे वैयक्तिक अनुभव नसुन केवळ कल्पनाविलास आहे .
२) ऑफीस मधील अनुभवांवर आधी एक लेख वाचला होता , त्याचा याच्याशी कण मात्र संबन्ध नाही ( तो ऑफीसमधल्या कामाला वैतागलेल्या एका कामचुकाराचा लेख होता , ही ऑफीस मधील वर्कोहोलीक मानसाची डायरी आहे .
३) कोणाला यालेखातील काही वर्णनांचे त्याच्या ऑफीसशी सार्धम्य वाटले तर तो एक निवाळ योगायोग असुन लेखातील वर्णनाच्या सार्वजनीनतेचा पुरावा असे म्हणता येइल !
)

गुलमोहर: 

.

ही ऑफीस मधील वर्कोहोलीक मानसाची डायरी आहे . >> हमम्म आमची डायरी नाही अशी कामाने भरलेली Happy

बाकी डायरी आवडली Happy

हा पहिला भाग कसा काय बरं सुटला माझ्या नजरेतून??

असो. २रा भागही आलाय. तिसराही येउ द्या पटापट.

माझी ऑफीसची डायरी - १ - ५ जुन २०१० शनिवार http://www.maayboli.com/node/16803
माझी ऑफीसची डायरी - २ - ७ जुन २०१० सोमवार http://www.maayboli.com/node/16841
माझी ऑफीसची डायरी - ३ - ८ जुन २०१० मंगळवार http://www.maayboli.com/node/16868
माझी ऑफीसची डायरी - ४ - ११ जुन २०१० शुक्रवार http://www.maayboli.com/node/16974
माझी ऑफीसची डायरी - ५ - १२ जुन २०१० शनिवार http://www.maayboli.com/node/17010
माझी ऑफीसची डायरी - ६ - १३ जुन २०१० रविवार http://www.maayboli.com/node/17041
माझी ऑफीसची डायरी - ७ ( अंतिम )१३ जुन २०१० रविवार http://www.maayboli.com/node/17076