२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः - भाग ५

Submitted by बेफ़िकीर on 5 June, 2010 - 02:21

आयुष्याच्या जडणघडणीच्या काळातच असले विलक्षण सरांउंडिंग असले तर? तुमच्या आमच्या मुलांसारखी कशी व्हायची मुले? चूक कोणाची? ललिताच्या नवर्‍याची? ज्याने मरण्याआधी ललिता व्यवस्थित जगू शकेल याची तरतूद केलेली नव्हती? की भानूची? ज्याने ललिताला पळवून इथे आणून विकले? भानूची चूक निश्चीतच आहे. पण असे बरेच भानू आहेत. पेपरात वेगवेगळ्या नावांनी असे भानू रोज वाचायला मिळतात. समजा त्यांना पकडून ठार मारले.. नवीन भानू नाही निर्माण होणार? काय गॅरंटी? सगळे भानू कसे सापडतील? सगळ्यांवरचे आरोप कसे सिद्ध होतील. 'ही मुलगीच चवचाल होती, त्याशिवाय हा माणूस असे करूच शकणार नाही' म्हणायला आपल्यातील किती जण तयार होतील? किमान तीस ते चाळीस टक्के! मग?

की ललिताचीच चूक होती? भानूवर प्रेम केले, त्याच्याबरोबर पुण्याला आली, गिर्‍हाईकांसमोर स्वतःला सादर केले, इस्माईलचा मार खाल्ला नाही, स्वतःची अन साहूची उपासमार सहन केली नाही, मरून गेली नाही. कोणती चूक ललिताची?

की गंगाबाईची चूक? तिला खरेदी केले ही? मुंगूसची चूक वाटते? तिला वेलकमला आणले ही? की पलीकडच्या इमारतीतील मुलींची चूक? नेमक्या त्याच मजल्यावर साहूला नेले ही?

शेवटी एकच ऑप्शन आहे. बहुधा त्या गिर्‍हाईकाची चूक म्हणावी लागेल. ज्याला खिडकी उघडी ठेवणे आवडत होते अन त्याचे त्याने पैसे मोजले होते.

तुमचा विश्वास बसणार नाही.. पण.. एक महत्वाचे सांगायलाच हवे.. ललिता जरी कोलमडून पडलेली असली त्या प्रसंगानंतर तरीही... झाले त्यामधे काहीच विशेष नाही हे वाटणारे किमान सत्तर टक्के लोक होते आजूबाजूला.. हे काय? होतेच असल्या भागात!

खूप मारले तिने साहूला त्या रात्री आणि दुसर्‍या दिवशी! साहू आक्रोश करत होता. थांबवणार कोण? आईच मारतीय म्हंटल्यावर? 'का गेला होतास तिकडे' या एकाच प्रश्नावर साहूचा गाल सुजला होता. पाठ लालबुंद झाली होती.

आणि मग.. ललिताने स्वतःचे कपाळ भिंतीवर आपटायला सुरुवात केली. ताबडतोब मुलींनी तिला आवरले.

रडणार्‍या साहूला कुशीत घेऊन ललिता खूप वेळ आक्रंदत बसली होती. हा प्रसंग पाहून मात्र सुनंदा आणि डिम्पलही गहिवरल्या होत्या. शरीफा गंभीर झाली होती. ती एकटीच तिच्या पलंगावर बसली होती.

ललिता साहूला घेऊन आपल्या खोलीत गेली. त्याला औषध लावले. चहा प्यायला दिला. काहीतरी खायला दिले. नंतर खूप वेळ त्याचे पापे घेत ती त्याच्याकडे बघत बसली होती. हळूहळू साहूची मनस्थिती पुर्वपदावर येत होती.

जवळपास तासाभराने तिने साहूला पुन्हा खेळायला बाहेर सोडले! खेळायला! काय खेळणार?

व्हॉलीबॉल! क्रिकेट! डबा ऐसपैस!

अंहं!

भज्याच्या गाडीशी दहा मिनीटे उभे राहिल्यावर भजीवाला प्रेमाने कशी तीन भजी देतो...
मुंगूस काय काय बोलतो रस्त्याने फिरताना..
लक्ष्मी रोडवर जाणारी माणसे आपल्यापेक्षा किती वेगळी असतात.. वगैरे वगैरे!

आणि कबीर त्याच वेळी ललिताचे बौद्धिक घेत होता.

कबीर - यहा रिश्ता सिर्फ बदनका होता है रेश्मा.. बुधवार पेठ है ये.. हिंदोस्तानका एक एक आदमी जानता है इस इलाकेको.. यहा कोई किसीकी मा नही होती.. बहेन नही होती.. बच्ची नही होती.. यहा एकही नजरिया है.. बदन.. तू यहा कैसे पहुचगयी.. किसीने फसाया या भगाके जबरन लाया.. ये और बात है.. अब आगयी है तो एक बात ध्यानमे रख.. उसीपे गौर करते हुवे दिन काट यहांके.. जबतक जवानी है.. खूब कमाले.. कोईभी आये खरीदार बनकर.. सगा भाईभी आ सकता है.. और बुढापा छाने लगेगा.. तब तू यहांसे चली भी जायेगी तो कुत्ता भी नही देखेगा तेरी तरफ.. लेकिन.. तब तेरे दिलसे भागनेकी आरजू कबकी खतम होगयी होगी.. बाहरकी दुनियाके दरवाझे तेरे लिये हमेशा के लिये बंद हुवे होंगे.. बदन सडचुका होगा.. एकही चारा रहेजायेगा तेरे पास.. और वो है खुद मौसी बनजाना.. हर कोई नही बन सकता.. अभीसे लडकियोंपर रौब जमाना चालू करदे.. शरीफाके काममे उसका हाथ बटा.. या फिर डिस्को वापस जाके गंगाबाईके हाथमे काम बटाना शुरू कर.. ये सब मै इसलिये नही कह रहा हूं के मै तेरा बुरा चाहता हूं.. ये हकीकत है रेश्मा..

मुळीच मान्य नव्हतं हे लेक्चर ललिताला! कोणताही मुद्दा मान्य नव्हता. इतकी कणव असेल कबीरला तर तो तिला पळून जायला मदत का करत नव्हता हे तिच्या मनात येत होते. जे सर्वात वाईट होणार आहे ते होणार आहे हे सांगण्यात काय विशेष होतं? ते तर तिलाही माहीत होतं!

कबीरच्या सर्व लेक्चरबाजीवर एकच सडेतोड उत्तर देऊन त्याला गप्प बसवण्यासाठी तिने त्याला एकच प्रश्न विचारला..

ललिता - अगर.. बदनकेही रिश्ते होते है तो.. आपने अभीतक.. मुझे छुवा भी नही.. ये कैसे??

तिला म्हणायचे होते की माणुसकीचा ओलावा अजून आहे या भागात! कबीर हा एक चांगला माणूस आहे. तो आपल्याशी भावासारखा वागत आहे. तो मदत करू शकतो पळून जाण्याच्या कामी! पण तिच्या प्रश्नाने कबीर अवाक झाला होता. सगळे आश्चर्य एकाच डोळ्यात जमा झालेले होते.

बर्‍याच क्षणांनंतर कबीर म्हणाला..

कबीर - अमजदको जानती है?

ललिताने नकारार्थी मान हलवली.

कबीर - सुनंदाको तो जानती है ना?
ललिता - हं!
कबीर - अमजद अभी जेलमे है.. तीन महिने के बाद छुटजायेगा.. और आयेगा यही..
ललिता - कौन है वो..?
कबीर - .. वेलकम का मालिक..
ललिता - वेलकमका मालिक? तो.. शरीफाबी कौन है??
कबीर - अमजदकी पहली शिकार..
ललिता - क्या?
कबीर - और.. ये जो आख फुटी है मेरी.. वो.. अमजदने फोडी हुवी है..

नखशिखांत हादरून कबीरच्या डोळ्याकडे बघत होती ललिता!

कबीर - सुनंदाको.. भगानेके जुल्ममे .. सजा मिली है मुझे.. डेढ साल पहले.. मैने कंप्लेंट की.. वो पकडा गया.. जाते हुवे बोला था.. आकर देखलुंगा.. अब वो आयेगा.. और मै.. पैर पकडुंगा उसके..

ललिता - तो.. आप..
कबीर - अभी भाग क्युं नही जारहा हूं? है ना?
ललिता - हं?
कबीर - सलोनी तयखानेमे रहती है.. वेलकमके.. उसको मारदेंगे..
ललिता - कौन सलोनी?
कबीर - मेरी बच्ची!
ललिता - बच्ची? ... आपकी लडकी??
कबीर - हं!
ललिता - आपकी.. खुदकी लडकी.. वेलकममे है????
कबीर - हं!
ललिता - तो.. वो.. खुद क्युं नही भागजाती आपके साथ..?
कबीर - वो.. ठीकसे चल नही सकती.. दाहिना घुटना टूटा हुवा है..
ललिता - क्या? .. कैसे??
कबीर - अ‍ॅक्सीडेंट हुवा था.. लक्ष्मी रोडपे..
ललिता - लेकिन वो.. यहा कैसे आयी??
कबीर - वो यहा कैसे आयी ये सवाल नही है रेश्मा.. उसको तो भगाकेही लाये ये लोग... सवाल ये है के मै यहां कैसे आया..
ललिता - .. कैसे आये आप??
कबीर - बच्ची को ढुंढते हुवे आया.. मिलगयी तो बाप कहनेसे इन्कार कररही थी..
ललिता - क्यों?
कबीर - जाहिर है बहन.. कौनसी लडकी पसंद करेगी धंदा करनेके बाद बापसे मिलना?
ललिता - फिर??
कबीर - मै जबरदस्ती मिला.. बहोत रोये दोनो..
ललिता - कबकी बात है ये?
कबीर - सात साल पहलेकी...
ललिता - सात साल?
कबीर - हं!
ललिता - वो सात सालसे यहा है?
कबीर - वो दस सालसे है! वो यहां आनेके दो सालके बाद उसका अ‍ॅक्सीडेंट होगया था.. तीन सालके बाद मै आया था.. मै सात सालसे हू यहांपर..
ललिता - तो.. आप.. पुलीसके पास..
कबीर - महिनेके बारा हजार जाते है फरासखाने मे अमजदके कोठेसे.. कौन सुनेगा हमारी?
ललिता - लेकिन.. उसे .. तयखाने मे.. क्युं रख्खा हुवा है..?
कबीर - उसका उपर कोठेपर आना बुरा शकुन मानती है शरीफा..
ललिता - मतलब.. अब वो. धंदा नही करती??
कबीर - करती है.. मैने मुंगूससे कहके रख्खा है.. कोई ग्राहक मिले तो ले आना..

व्वा! काय वातावरण होते! बापाला इतकीच लाज वाटत होती की निदान आपण आपल्या मुलीसाठी ग्राहक शोधू नये.. बाकी. तिने धंदा करायला हवा हे त्याचेही मत होतेच..

ललिता - कैसे बाप है आप??
कबीर - मै? मै कहा बाप रहगया हूं किसीका?
ललिता - अपनीही बच्चीके लिये ..मुंगूस..
कबीर - भाडा देना पडता है तयखानेका.. मेरे आमदनीमे सिर्फ खाना मिल सकता है दोनोंका..
ललिता - भाडा? भाडा किसलिये? अगर आप दोनो उसको नही चाहिये तो शरीफाबी आपलोगोंको निकाल क्युं नही देती?
कबीर - नही चाहिये तोही निकालेगी ना??
ललिता - मतलब??
कबीर - तू सून नही सकेगी..
ललिता - बताईये..
कबीर - एक पैसा भी नही देकर... शरीफा..
ललिता - .....
कबीर - रोज रात सलोनीको अपने पास बुलाती है.. हक समझती है वो उसका.. और.. ये अमजदको मंजूर है..

कबीर निघून गेला तरीही हबकलेली ललिता तशीच बसून होती.

आज पहिल्यांदाच.. साहू पोटचा गोळा असूनही.. तिला लोढणे वाटू लागला होता. त्याच्यासाठी खूप काही सहन करत राहावे लागणार आहे हे तिला जाणवले होते. येत्या दोन ते तीन दिवसात साहूला कुठेतरी पळवून लावायचा अन नंतर एक तर जीव तरी द्यायचा किंवा साहूला शोधण्यासाठी दिवाभीतासारखे फिरत बसायचे हे तिने मनातच ठरवले.

झिरमी! झिरमी नावाची मुलगी होती ती! जिने साहूला आपल्या मजल्यावर नेले होते काल! झिरमीची आठवण आली तशी ललिता तीरासारखी उठली.

हे काय? असे कसे झाले? प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हाच प्रश्न होता.

पंचेचाळीस मिनिटांचे बाराशे रुपये घेणारी रेश्मा.. डिस्को अन वेलकम गाजवणारी रेश्मा.. आज इकडे? कशाला?

कुणाकडेच तिचे लक्ष नव्हते. गिर्‍हाईके या इमारतीत असाही माल आहे या गोष्टीकडे डोळे फाडून पाहात असताना अन एकाही मुलीचे जिन्यात तिला हात लावणे दूरच.. शब्दही उच्चारण्याचे धाडस झालेले नसतानाच ललिता दुसर्‍या मजल्यावर पोचली होती.

वेलकमच्या मुख्य मुलीचे इथे येणे यात निश्चीतच काहीतरी गंभीर होते. नाहीतर इथे कोण येणार मरायला? सगळ्या मुली अवाक होऊन पाहात होत्या.

झिरमी मौसीच्याजवळच बसलेली होती. ताडकन प्रवेशलेल्या ललिताने मागूनच झिरमीची वेणी हातात धरली अन तिच्या पाठीत लाथा घालायला सुरुवात केली. तिला इतर मुलींनी आवरेपर्यंत किमान सहा लाथा तिने घातलेल्या होत्या. झिरमीला कोण मारते आहे हेच समजत नव्हते. ललिताला इतर मुलींनी रोखल्यानंतर जेव्हा झिरमीने पाहिले तेव्हा.. सगळ्याच गिर्‍हाईकांचा अंदाज होता की आता झिरमी ललिताला बडवणार!

पण अमजदच्या वेलकममधील प्रमुख आकर्षणाकडे नजर वर करून बघणे मौसीलाही शक्य नव्हते.

झिरमीने सरळ सर्वांदेखत माफी मागीतली आणि.. मौसीने ललिताला थोपटून शांत केले..

खूप चर्चा झाली सगळ्यांमधे! झिरमीने केवळ निरागस थट्टा म्हणून साहूला वर आणलेले होते, उलट त्याला खायला पेरू दिला, निशाचा मुलगाही अकरा वर्षाचा आहे, मुलांना कसे वागवायचे याची आम्हाला कल्पना आहे, यापुढे काळजी करू नकोस, साहूला पुन्हा कुणीही इथे आणणार नाही, आणि मुख्य म्हणजे तू खिडकीतून साहूला दिसणे हा आमचा मुळीच उद्देश नव्हता, ते चुकून झालेले होते.. वगैरे वगैरे सांगीतल्यावर निराश ललिताने राग कमी केला..

आणि तेवढ्यातच... एका गिर्‍हाईकाबरोबर आतल्या एका कंपार्टमेंटमधून चक्क.. डिस्कोची प्रार्थना बाहेर आली..

ललिता - तू इधर??

प्रार्थनाच्या चेहर्‍यावर अतीव दु:ख होते. गिर्‍हाईक तिला सगळ्यांदेखत पुन्हा मिठी वगैरे मारून गेल्यानंतर खाली गेलेल्या आवाजात आणि खाली गेलेल्या नजरेने पाहात प्रार्थना म्हणाली..

प्रार्थना - एड्स हुवा है.. परसोही पता चला.. अब सिर्फ येच बिल्डिंगमे रह सकती हुं मै.. यहा.. सब एड्सवाली लडकिया रहती है..

उदास मनाने जिना उतरून खाली आलेल्या ललिताने वेलकमकडे पावले वळवली.

एकदा मनात आले. सलोनी कशी दिसते पाहावे. एक अंधारा, खाली जाणारा जिना होता. तो आजवर तिने दुर्लक्षितच ठेवला होता. हळूच ती तो जिना उतरून खाली गेली. तेही दोन, तीन मुलींनी पाहिलेच. त्या जरी तिला काही बोलल्या नसल्या तरी त्यांच्यात एकमेकींमधे आंखमिचौली झालीच!

एक अतिशय घाणेरडे दार लोटलेलेच होते. ललिताने ते उघडले. आतला अंधार कुबट आणि घाणेरडा होता.

आतून एक आवाज आला.

सलोनी - मुंगूस.. लाया क्या तू किसीको?
ललिता - मै हूं.. रेश्मा..

चटकन दिवा लागला. सलोनी!

पायाने लंगडी होती म्हणून!

नाहीतर.. डिम्पल, सुनंदा, डिस्कोची संगीता.. आणि खुद्द रेश्मा उर्फ ललिता..

अख्ख्या बुधवारात कुणाचेही कधीही नाव झाले नसते अशी सलोनी.. !

ही?? ही कबीरची मुलगी??

सलोनी - उपर जा! किसीको बोल मत यहा आयी करके.. कुत्तेकी तरहा मारेंगे..
ललिता - फिलहाल मुझपर हाथ उठानेकी हिम्मत नही है किसीमे..
सलोनी - बादल पहले दिनसेही मंडराते है हर किसीकी किस्मतपर रेश्मा.. पता तब चलता है जब सब उजड जाता है.. चली जा..
ललिता - कुछ खायेगी??
सलोनी - रिश्ते बढा मत .. निकल जा..
ललिता - मै आती रहुंगी.. हर रोझ.. तुझसे मिलनेके लिये..
सलोनी - अभी उपर जाकर उस कमीनीका मार खायेगी तो भूल जायेगी मुझे.. ज्जा...

ललिता वर निघून आली. एक गोष्ट मात्र तिने त्यातही नोटिस केली होती. जी गोष्ट.. अत्यंत विसंगत होती त्या तळघराशी.. आणि.. दिवा लावल्यावरच ते लक्षात आले होते..

तळघराच्या मागच्या बाजूला.. एक छोटेसे दार होते.. कुठे उघडत होते कुणास ठाऊक ते.. कारण.. ती बाथरूम नक्कीच नव्हती.. बाथरूम तर प्रवेशद्वाराच्या शेजारीच होती... मग?? कसले दार होते ते?? एक नक्की.. ते दार झिरमीच्या बिल्डिंगच्या विरुद्ध दिशेला होते.. म्हणजेच.. ललिताच्या खोलीतील खिडकीतून काहीच अंदाज येणार नव्हता.. अंदाज आला असता फक्त एकाच खोलीतून.. शरीफाबीच्या..

आणि.. तिथे जाणे पहिल्या दिवसापासून टाळले होते ललिताने..

आज रात्री मन लावून सजायला हवे होते. ललिता संध्याकाळी सहालाच आपली आंघोळ खूप लांबवून बाहेर आली होती. करकरीत हिरवी साडी नेसून ती स्वत:च्या शरीरावर अत्तराचे हलके हलके शिडकावे मारत होती.

सजायलाच हवे होते! बायको माहेरी गेलेली असल्यामुळे रमासेठ आज येणार असे तो म्हणाला होता. समजा आलाच नाही तर गोष्ट वेगळी! पण आला तर.. त्या दिवशीपेक्षा आज खूपच सुंदर दिसायला हवे आपल्याला.

साडे सात वाजले तरी रमाच्या येण्याची चिन्हे नव्हती. मुली मात्र वळून वळून ललिताकडे पाहात होता. 'किसपे मेहेरबान होगयी मेरी जान' असे विचारून तिला सतावत होत्या.

आणि आठ वाजता रमा आला. आला तो सरळ ललिताकडे बघतच बसला. आज तोही जरा झकपकच आला होता. त्याचे ते सजणे जरा सहजच लक्षात येण्यासारखे होते. मंद सेंट, नवीन वाटावेत असे कपडे!

त्याला काय कारण होते सजायचे? शरीफा विचार करत होती. माणूस असा येतो याचा अर्थ अनुभवाने तिला ठाऊक झाला होता.

प्रेम! प्रेम बसण्याची सुरुवात असू शकत होती ती!

शरीफाला आता काळजी घेणे आवश्यकच होते.

शरीफा - आईये सेठ! डिम्पल.. जा .. सेठको लेके जा.. सेठ.. चारसौ..
रमा - अंहं! इसके साथ जाना है.. रेश्मा..
शरीफा - अलग अलग टेस्ट किक्या कीजिये सेठ.. वेलकममे हूरें रख्खी है हमने..
रमा - रेश्मा.. फुल्ल नाईट.. कितना?

रमाच्या स्वरातील अधिकार शरीफाला निश्चीतच दुखावून गेला. रमाचे वास्तविक बरोबर होते. या बाजारात तुम्ही मागीतलेली किंमत दिल्यावर आणि आम्हाला पाहिजे असलेली व्यक्ती उपलब्ध असल्यावर तुम्ही नाही म्हणण्याचे कारणच काय? पण तरीही शरीफाला मुळीच आवडले नव्हते. पण एक मात्र होते! रमाच्या अन रेश्माच्या निमित्ताने बरेच दिवसांनी कोठ्यावर फुल्ल नाईटचे चार हजार निश्चीतच येणार होते.

डिम्पलसकट सगळ्या मुली रमाकडे अन शरीफाबीकडे खिळून बघत होत्या. हा खरच चार हजार देतो की काय? शरीफाने आकडा सांगीतला अन रमाने खरच दिले..

चार हजार! विक्रमी उत्पन्नाची दुसरी बातमी केवळ दोनच दिवसात दुसर्‍यांदा सर्वत्र पसरणार होती. अमजद आल्यावर खुष होणार होता.

आणि अत्यंत नटून थटून उभ्या असलेल्या रेश्माने रमाला हात धरून खोलीत नेले.

खोलीपण अतिशय स्वच्छ केली होती तिने. रमाने त्या दिवशीप्रमाणे धसमुसळेपणा न करता निवांत प्रणयचेष्टा करायला सुरुवात केली.

रात्री अकरा वाजता खाना मागवला गेला खोलीत!

खाना झाल्यावर पुन्हा जेव्हा दोघे एकमेकांच्या निकट झोपले तेव्हा ललिताने हळूच चाचपणी सुरू केली.

ललिता - मॅडम.. पूनाकी नही है??
रमा - अंहं!
ललिता - मै आज आपसे टीप नही लुंगी
रमा - क्युं?
ललिता - जिनपे.. दिल आजाता है.. टीप कैसे लुंगी उनसे?
रमा - दिल?
ललिता - सचमुच.. आपको भरोसा नही होगा.. इस दुनियामे किसीका किसीके साथ दिलविल नही लगता ये सच है.. मगर.. मै आपका.. शामसे इंतेझार कर रही थी.. सुबहसे लग रहा था.. आप आयेंगे तो कितनी खुशकिस्मत लगुंगी खुदको मै.. और.. ये भी लगरहा था के.. आप जरूर आयेंगे..
रमा - मै महिनोंतक आता नही हूं! लेकिन.. इस बार ऐसा हुवा के तीनही दिन मे दुबारा आगया..
ललिता - बताईये ना.. क्युं??
रमा - तुझमे जादू है..

ललिता हसली. आता तिबे स्त्रीसुलभ बोलायला सुरुवात केली.

ललिता - जागू तो.. हर लडकीमे है वेलकमके..
रमा - अंहं! सिर्फ तुझमे..
ललिता - शुक्रिया सर.. लेकिन... ये जादू.. कुच्।अही दिनोंका है..
रमा - ऐसा क्युं?
ललिता - मर्द बहोत जल्दी अपना दिल बदललेते है..
रमा - कैसे?
ललिता - कल कोई और लडकी भायेगी आपके दिलको..
रमा - मै कोई हररोज आनेवाला आदमी नही हूं! तेरे लिये दुबारा आया हूं!
ललिता - फिर भी..
रमा - ऐसे बोलेगी तो रात बिगडजायेगी..

ललिताने पुन्हा रमाला सुखी केल्यानंतर मात्र तिने मुद्याला हात घातला.

ललिता - अगर.. बच्चा नही होता और... आप नही मिलते .. तो.. मै तो जानही देदेती..
रमा - बच्चा? तेरा बच्चा है??
ललिता - हं! साहू! आठ नऊ सालका है..
रमा - नऊ सालका? इतना बडा बच्चा??
ललिता - हं! जल्दी शादी होगयी थी..
रमा - और.. मिस्टर??
ललिता - गुजरगये..
रमा - तो.. यहां.. कैसे क्या??
ललिता - फसाया एकने..
रमा - कहांकी है??
ललिता - राऊरकेला.. ओरिसा..
रमा - ओरिया बोलती है??
ललिता - हं! और हिंदी..
रमा - बच्चा किधर है अभी??
ललिता - गलीमे भटकता रहता है.. सिखाना चाहती थी.. लेकिन..
रमा - लेकिन क्या?
ललिता - कौन सिखायेगा? एक धंदेवालीके बच्चेको..
रमा - रेश्मा.. एक बात कहता हूं.. मै.. आदमी बुरा नही हूं..
ललिता - आप??? बुरे नही है??? कौन कहरहा है आपको बुरा?? आप तो भले इन्सान है..
रमा - नही.. खुष करनेकेलिये झुठ बोलनेकी जरूरत नही.. बीवीसे झुठ बोलके यहा आता हूं मै.. वो अच्छी औरत है.. मुझेभी एक बच्चा है.. कॉलेजमे जाता है.. लेकिन.. अगर तू चाहती है.. तो..
ललिता - .. क्या सर??
रमा - तेरे बच्चेकी पढाईका खर्चा उठालुंगा.. भगवानने बहोत दिया है मुझे..
ललिता - शरीफाबी मना करेगी सर..
रमा - क्युं?
ललिता - वो बाहर जायेगा ... और.. अगर एक दिन.. भागवाग गया तो...??
रमा - भाग कैसे जायेगा??
ललिता - वो तो यही सोचेगी..
रमा - तो.. फिर.. भागही क्युं नही जाती हो तुम??

ललिता खूप जोरात हसत तिथून उठली अन खिडकी उघडून त्या खिडकीतून बाहेर बघत म्हणाली..

ललिता - सामने प्रार्थना रहती है.. कलतक डिस्कोमे थी.. अब सामने रहने आयी है.. एड्स हुवा है.. हम औरतोंके बहगमे .. सिर्फ एड्स है सर.. यहांसे भागना नही है हमारे भागमे.. कभीकभार आपजैसे भले इन्सान आते है दरवाजेपर.. तो... उतनाही भाग खुलजाता है.. दो चार बाते होती है.. बाकी सबके सब.. भुखे शेर होते है भुखे शेर..

रमा - मै.. भगांऊ तुमको यहांसे..??

यावेळेस ललिताने स्वतः पुढाकार घेऊन रमावर प्रेमाची बरसात केली.. आणि नंतर म्हणाली..

ललिता - देखिये साहब.. अगर कल सुबहतक मै याद रही.. तो जरूर आईये दुबारा..
रमा - ऐसे मत बोल.. मै.. सचमुच भगा सकता हूं तुझे.. यहांसे...
ललिता - (उपरोधिकपणे) तो भगाईये ना..
रमा - हस मत.. पंधरा दिनके बाद आउंगा.. तब प्लॅन बताउंगा.. बादमे.. भगाके ले जाऊंगा..

पहाटे साडे चार वाजता खोलीतून बाहेर चाललेल्या पाठमोर्‍या रमाच्या पाठीला आपल्या सगळ्या आशा चिकटवून ललिता खिन्न उदासीने पाहात होती...

आणि बरोब्बर पहाटे पाच वाजता.. साहूचे बुधवार पेठेतील आयुष्य खर्‍या अर्थाने... आज सुरू झाले होते..

रात्रभर जागाच राहिलेला साहू सतत मुंगूसबरोबर होता.

तीन साडे तीन वाजता मुंगूस कंटाळून झोपी गेल्यानंतरही तो जागा राहिलेला होता. काल आईने दिलेल्या माराच्या काही वेदना अजून डासत होत्याच. भूक लागली होती. पण आता उपासमार वगैरे मुळीच होत नव्हती.

उगाचच एका दुकानाच्या पायरीवर बसलेल्या साहूचे लक्ष इकडे तिकडे जात होते.

आणि एक भिरभिरत्या नजरेचा तरुण मुलगा त्याच्या नजरेस पडला. साहूला दोन तीन दिवसात किंचित अंदाज आलेला होता. टेस्ट करून पाहू म्हणून साहू त्या मुलाच्या दिशेने गेला. तो मुलगा साहूला पाहून सटकला. इतक्या लहान मुलासमोर काय उभे राहायचे??

साहूने चालतच, पण वेगात त्याचा पाठलाग केला. मग ते पाहून तो मुलगा एका कोपर्‍यात उभा राहिला.

साहू जवळ जाऊन उभा राहिल्यावर त्या मुलाने भुवया उडवून 'काय' असे विचारले..

साहूला जेवढे पाठ होते.. यडचापसारखा तो तेवढे बोलून गेला..

'मल्याळी.. नेपाळ. बांगला.. जो भी मंगता.. सस्ता महंगा.. ये इतना बडा बडा..'

झिरमीच्या बिलिंमगमधे त्या मुलाला सोडताना त्या मुलाने दिलेले वीस रुपये ही..

साहू ... रेश्मा.. थापा... यांची वयाच्या नवव्या वर्षी केलेली पहिली वहिली कमाई होती..

दलालीतून मिळालेली...

आणि वर येऊन साहू ललिताला सगळ्यांदेखत सांगत होता..

साहू - बीस रुपये मिले मा.. मैनाके पास भेजा एक आदमीको.. मुंगूस भेजता है वैसे.. ये देख बीस रुपये..

गुलमोहर: 

हे काय.
शेवटी साहु हि दलालच झाला.....................
फार फार वाईट वाचले आज.....................
असच होत असेल ना...........प्रत्येका सोबत.....................................
विदारक सत्य.

आई ग..... काय हे , शेवटी बिचारीची जी धडपड चालली आहे साहूसाठी ती निरर्थकच का? Sad
पण त्या बिचार्‍या साहूची तरी काय चूक , वाईट संगतीचा परिणाम Sad

नमस्कार. मी मायबोली वर नविन आहे. कादम्बरि खूप छान आहे. वाचतना चित्र डोळ्या समोर उभे राहते.
ही कथा कितीही मोथी करा, पण शेवट मात्र गोड करा, नायतर उगाच जीवाला रुखरुख लागुन राहते.

बेफिकिर..... अत्यंत वेगवान कथा अन खिळवून ठेवणारी शैली.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

डॉ.कैलास

अक्षरश: अंगावर काटा येतोय हे वाचताना...!
फक्त बुधवारातील ही गोष्ट आहे म्हणण्यापेक्षा 'ही' बुधवार पेठ याबाबत प्रातिनिधिक आहे.
तालुका किंवा निमशहरी भागात वेश्या वस्तींच अस्थित्व याहून भयानक आहे.

मांडणी अगदी बांधेसूद होतेय्...घाई न होता...!!
हळव्या मनाला सोसेल किंवा कसे म्हनून लिखाण वाचावं कि काय करावं या सम्भ्रमात पडतो.
पहिल्या दोन्ही विषयांपेक्षा हा फिल्मसाठी चपखल आहे...भांडारकरांना भेटावे.
शुभेच्छा!

अरेरे , बिचारा साहू पण त्याच दुष्टचक्राचा बळी होणार की काय? बेफिकीर, जादू आहे तुमच्या लिखाणात! विषय छान फुलवता तुम्ही!

काटा आला अंगावर वाचताना..!
पंखा झालोय बेफिकीर मी तुमच्या लेखनाचा! कुणीतरी बेफिकीर पंखा क्लब काढा रे, मला आजीव सभासदत्व घ्यायचेय!

मी आज सगळे भाग वाचलेत. छान लिहीत आहात. भिषण वास्तवाचे दर्शन होते :अरेरे:.

पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

खरं सांगू का? ह्या भागाच्या प्रतिक्रिया आधी वाचल्या... आणि हा भाग वाचायची इच्छाच झाली नाही... आज धीर करून वाचला... खरोखर भीषण. अनिच्छेनेच पुढचा भाग वाचायला घेते आहे. Sad

इंजिनियरिंगच्यावेळी प्रोजेक्टसाठी पुण्याला राहायला होते. आम्ही दोघीजणी गावाकडून आलेलो... त्यामुळे हे रेडलाईटवगैरे प्रकार विशेष माहीत नव्हते तरी प्रोजेक्ट पार्टनरला थोडीफार माहीती होती... असेच फिरत असताना पाटयांवर नाव पाहीले, बुधवार पेठ... आणि मैत्रीण सावध झाली. रस्त्याच्या मधून चाल घराजवळून चिकटून चालू नको, मुलींना आत ओढून नेतात, आणि मग आतून बाहेर यायचा मार्ग नसतो... त्यांचे धिप्पाड गुंड असतात... सत्राशे साठ सुचना... मी डोळे विस्फारून ऐकत होते... अजूनही बुधवार पेठेचे नाव ऐकले तरी त्यावेळची भीती आजही अंगावर काटा आणते...

कुतुहल असायचंच की आत ओढून नेल्यावर काय करत असतील, आत चुकून किंवा ओढून नेलेल्या मुलींचं नंतर काय होत असेल... आता वाचायला मिळतेय... मूर्तीमंत नरक!
ओढून नेतात की नाही खरं खोटं देव जाणे पण हे वाचून तरी वाटतेय आपण त्या गल्लीत फिरूनही सुखरूप बाहेर पडलो...

dreamgirl, तू लिहिलयस ते वाचून आठवलं, आमची शाळेची ट्रिप दिल्लीला गेली असतांना आम्हाला 'चांदनी चौक' दाखवायला नेलं होतं. नेण्याआधी बर्‍याच सूचना दिलेल्या...
इथे मुलींना पळवून नेण्याचे प्रकार घडतात. चार-चार मुली एकमेकींचा हात घट्ट धरून चाला. अजिबात हात सोडायचा नाही...
आम्ही इतक्या घाबरलेलो होतो, की चांदनी चौक पाहण्यात लक्षच लागलं नाही. तिथे काही खरेदी करण्यातही मन लागलं नाही. सतत कोणी पळवून तर नेणार नाही ना? याची भीती मनात होती... इतकाच जर धोका होता, तर आम्हाला इकडे आणलंच कशाला? हा राग पण मनात होता...
खरंच आजवर आयुष्यात असं काही घडलं नाही म्हणून देवाचे आभारच मानायला हवेत... टच वुड!
बेफिकीर दाखवत आहेत तो नरक आहे, ह्याची कल्पना होतीच... पण आता तो नरक किती भयाण आहे याची सविस्तर ओळख होते आहे...