आतातरी...................

Submitted by अमोल परब on 4 June, 2010 - 06:38

आयुष्याच्या क्षितीजावर दूर गेलेल्या आठवणीचं आभाळ मनात दाटतयं
"आतातरी परत ये खरं सांगतो" तुझ्याशिवाय फार एकट एकट वाटतयं

आठवतयं तुला................
दररोज सांजवेळी खिडकीत उभी राहुन माझी वाट बघायचीच तु
परतण्यास अमंळसा उशीर झाला तरी खोटं खोटं रुसायचीच तु
मात्र आता माझ्यासोबत हे खुळावलेलं घरटं ही तुझीच वाट बघतयं
"आतातरी परत ये खरं सांगतो" तुझ्याशिवाय फार एकट एकट वाटतयं

मला माहितीय..............
तुझ्या एका आठवणीवर सवडीने मुक्त बरसायचा तो
घेउनी कवेत तुला अंगाअंगावर धुंद निथळायचा तो
मात्र आता तुझ्यासोबत पुन्हा अगदी तसचं भिजावस वाटतयं
"आतातरी परत ये खरं सांगतो" तुझ्याशिवाय फार एकट एकट वाटतयं.................

उमगत नाही...........
गेले कित्येक वसंत दारातला गुलमोहर आता ठरवून ही बहरत नाही
तुझ्या स्पर्शास पारखा पारिजात प्रितीचा सडा अंगणी शिंपडीत नाही
समोरच्या ढोलीतलं राघूच जोडप मात्र आपलं उगीचच हळहळतयं
"आतातरी परत ये खरं सांगतो" तुझ्याशिवाय फार एकट एकट वाटतयं...................

समजावतो मी.....................
मनास माझ्या आता नाही येणे तुझे उभे आयुष्य सरले जरी
नाही कळणार तुला माझी घुसमट माझा श्वास विरला तरी
निराशेनं उचललेले पाउल मात्र एका वेड्या आशेवर मागं हटतयं
"आतातरी परत ये खरं सांगतो" तुझ्याशिवाय फार एकट एकट वाटतयं....................

गुलमोहर: 

उमगत नाही...........
गेले कित्येक वसंत दारातला गुलमोहर आता ठरवून ही बहरत नाही
तुझ्या स्पर्शास पारखा पारिजात प्रितीचा सडा अंगणी शिंपडीत नाही
समोरच्या ढोलीतलं राघूच जोडप मात्र आपलं उगीचच हळहळतयं
आतातरी...................खुपच छान आहे..............

इतक्या लांबलचक ओळी पाहताना त्यात इतकी छान लय असेल असे वाटले नव्हते.
या कातरवेळी पाहिजेस तू जवळी ही भावना इतकी छान हळुवार उतरलीय, आयुष्याचे क्षितिज मतेच सुचवतेय ना?