तो प्रसन्ग !

Submitted by सुनिल जोग on 28 May, 2010 - 06:08

काल दुपारी सदाशिव पेठेतील एका जुन्या पण प्रसिध होटेलमधे जाण्याचा प्रसन्ग आला. माझ्या दुर्देवाने ते होटेल मराठी माणसाचे होते. एका टेबलावर एक कुटुम्ब - त्यात एक चिमणे मूल. त्यानी ऑर्ड् र दिली.पदार्‍थॅ आले. मूल रडु लागल्याने आजीने एक लाडु मागविला. ते मूल खेळत खेळत लाडू खाऊ लागले. एव्हढ्यात मोबाइल वाजला म्हणून आजीबाइ बाहेर गेल्या. मूल रडू लागले. म्हणून आइ आणि मूल दोघेही बाहेर गेले.
गिर्हाइक गेले समजून वेटरने टेबल साफ केले. आजीबाइ आणि मुल आत आले तो काय टेब्ल साफ ! आजीबाइ धावत धावत वेटर पर्यन्त पोचल्या पण हाय रे देवा - टेबल साफ झालेले. आजीबाइनी कळवळून सान्गितले ,"अहो पोराने अजुन घास पण खाल्ला नाही. थोडे थाम्बला असता तर ! कोणी काही बोलले नाहि.शेवटी ती माउली काउन्टरवर पोचली. गल्ल्यावरील मालकीणीला कळवळून सान्गितले पण ती जाम थन्ड !काहीही प्रत्रिक्रिया नाही. शेवटी ती माउली नशिबाला दोष देत गेली.
ती गेल्यावर देखिल वेटरची मुजोरी कमी झालेली नव्ह्ती. तो आपण कसे बरोबर आहोत हे तोर्यात सान्गत होता.तरीही ज॑नता ढिम्म !
वेटरचे जाउ द्या. पण मालकाने निदान लहान मूल म्हणून तरी माणूसकी दाखवावी ही माझी अपेक्शा चुकीची नाही ना? माझी प्लेट तशीच टाकून मी बाहेर पड्लो. भूकच नाहीशी झाली होती माझी.

गुलमोहर: 

माणुसकी बद्दलच्या संवेदना थोड्या बोथट झाल्या आहेत.

हर दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम... त्यांचे नाव नसेल लिहीलेले :अरेरे:.

मी पण स्वतः गावातल्या मराठी मालकाच्या हॉटेलमधे वेटरची अतिशय खराब सर्विस अनुभवली आहे. अशी सर्विस दिली तर माणुस परत पाय तरी ठेवेल का अशा हॉटेलात. या मालकांना कळत कसे नाही. अशा नोकरांना कशाला पोसतात.