कोल्ड कट सँडविचेस/रॅप्स(Wraps)

Submitted by तृप्ती आवटी on 25 May, 2010 - 16:30

तुम्हाला माहिती असलेल्या, आवडणार्‍या कोल्ड कट सँडविच/रॅप्स बद्दल इथे लिहा. त्यात वापरलेले घटक पदार्थ कुठल्या ब्रँडचे, कुठल्या दुकानातुन आणलेत ही माहिती दिलीत तर उत्तम Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या ऑफिसजवळच्या कॅफे मधे मिळतं
कोणत्याही आवडणार्‍या ब्रेड चे स्लाईस ( मी Sour Dough घेते)
प्रोव्होलान चीझ, स्प्राऊट्स, अवाकाडो स्लाईस, लेट्यूस, सन ड्राईड टोमॅटो, काकडी , मीठ, मिरीपूड.

ब्रेड स्लाईसला क्रॅनबेरी सॉस (हा मी मेथांब्यासारखा करते - मेथीची फोडणी करून त्यात क्रॅनबेरीज, चवीनुसार तिखट, मीठ, ब्राऊन शुगर घालून क्रॅनबेरीज शिजेपर्यंत मध्यम आचेवर ठेवून अधून मधून परतायचा. सीझनला केला की फ्रीजमधे बराच टिकतो.), त्यात लेट्यूस आणि कोणत्याही व्हाईट मीटच्या (चिकन / टर्की) पातळ स्लाइसेस.

(क्रॅनबेरी सॉसऐवजी कोणताही आंबटगोडतिखट सॉस चालेल.)

व्हीट ब्रेड, ग्वाकमोले स्प्रेड, लेट्युस, टोमॅटो, ग्रिल्ड कांदा

Sourdough bread, बेझील पेस्तो, कांदा, टोमॅटो, ग्रिल्ड वांगे किंवा लाल ढबू मिरची

फ्रेंच बॅगेट + रोस्टेड गार्लिक स्प्रेड, कांदा, टोमॅटो, मायक्रो ग्रीन्स किंवा स्प्राऊटस, रोमेन लेट्युस

मी चीज खात नाही त्यामुळे घेत नाही. तुम्हाला हवे ते घालू शकाल बहुदा.

अजून एक ( थोडं देशी स्टाईल)
कोणत्याही आवडणार्‍या ब्रेड चे स्लाईस ( मी Sour Dough घेते)
क्रिम चीझ, काकडी, स्प्राऊट्स आपली सॅण्डवीचची हिरवी चटणी.
ब्रेडच्या एका स्लाईसला क्रिम चीझ लावायचे आणी दुसर्‍या ला चटणी मधे काकडी आणी स्प्राऊट्स.
- स्प्राऊट शिवायपण छान होते.

व्हीट किंवा सँडविच ब्रेडला क्रीम चीज, कोथिंबीर/मिंट चटणी फासून त्यात उकडलेला बटाटा, टोमॅटो, लेट्युस, काकडी घरी खायचे असेल तर कांदा ह्यातलं जे असेल ते चकत्या करुन. टिपिकल देसी सँडविच.

ग्राइंडर रोलला स्पायसी मेयो फासून मध्ये टोमॅटो, लेट्युस, रोस्टेड पेप्पर्स.

व्हीट किंवा सँडविच ब्रेडमध्ये चीज स्लाइस, उकडलेल्या अंड्याच्या आणि टोमॅटोच्या चकत्या, मीठ, मिरपूड. हे थोडं बोरिंग आहे.

माझं आवडतं देसी चटणी सँडविच किंवा मग ciabatta वर मेडिटेरेनियन सॉस, स्प्रेड काहीतरी फासून त्यावर चीजचे स्लाईसेस, लाल भोपळी मिरचीचे पातळ काप, पिकल्स, टोमॅटो, थोडं स्प्रिंग मिक्स, झुकिनी वगैरे घालून अवनला ग्रील.
ह्यापेक्षा मला फार काही प्रकार येत नाहीत.

सिंडे, तुला कोल्ड सँडविचेस म्हणायच आहे का? कोल्ड कट सँडविचेस म्हणजे मीट्चे कोल्ड कटस असं धरलं जात.

क्रीम चीजमध्ये बारीक चिरुन कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, मश्रूम्स, मिठ, आणि मिरपूड घालायची. एका स्लाईसला हे मिश्रण आणि दुसर्‍या स्लाईसला हॉट सॉस.

मलाही ह्यात जास्त प्रकार येत नाहीत. एक आपल नेहेमिच देसी स्टाईल आणि
दुसर मेयो, लेट्युस, टॉमेटो चकत्या, काकडी चकत्या, हलापिनो पिकल्स आणि मस्टर्ड टाकुन.

कोल्ड सँडविच मध्ये मला पुण्यातल्या 'मार्झोरीन' स्टाईलचे चटणी सँडविच आवडतात. नारळाची कोथिंबीर, मिरच्या, मीठ, साखर घालून चटणी. फक्त टोमॅटो आणि काकडीच्या चकत्या.

अंजली.. नॉस्टेल्जिआ :).
मार्झोरीन रॉक्स.. मला त्यांची चिकन सॅन्डविचेस अतिशय आवडतात.
बर्गर खायची पहिली सवय मार्झोरीन नी च लावली :).

येस येस. तिथल्या पेस्ट्रीज ऑस्स्म असतात एकदम. मी आणि सुनित बर्‍याचदा कॉलेज संपल्यावर जायचो तिथे. अंजली तुमने पुरानी यादें ताजा कर दी. Blush

पेस्ट्रीज आणि बाजुच्या दुकानात सॉफ्टी आइस क्रीम.. :).
पेस्ट्रीज पण पहिल्यांदा तिकडेच ट्राय केल्या :).

मी एक सोपा देसी स्टाइल रॅप करते. पराठा करते. त्याला खजुराची चटणी, पुदिन्याची चटणी लावते. त्यात मधोमध कोबीची भाजी भरून तो फॉइल मधे रॅप करते. मुलगा आवडीने खातो. नाहीतर अशी कोबीची भाजी खात नाही. २ चटण्या लावल्या की ती पण आनंदाने खाल्ली जाते. Proud

अजुन एक रॅप तो इतका सोपा नाही.
ऑलिव ऑइल मधे कांदा, गाजर, ढोबळी मिरची (सर्व उभे चिरून), मशरूम्स परतून एकदम ड्राय भाजी करायची
आलू टिक्की बनवायची, पनीर चे क्युब्स शॅलो फ्राय करायचे.
नान ला बटर लावायचं. मग पुदिन्याची चटणी, खजुराची चटणी लावायची. मधे भाजी भरायची, भाजीच्या कडेने दोन्ही बाजूनी आलू टिक्की स्मॅश करून भरायची, ३/४ पनीर चे क्युब्स टाकायचे आणि फॉइल मधे रॅप करायचं.

मस्त पोटभरीचा होतो हा रॅप आणि मस्त लागतो. पण बराच वेळ लागतो याला.

चबाटा रोल , स्टिराटो रोल किंवा साअरडो रोल मधे सन ड्राईड टोमॅटॉ इन ऑइल, त्याचंच थोडं तेल, फ्रेश मॉझ्झरेलाचे स्लाइसेस , वरुन बेसिलची हाताने तोडलेली पानं.

असल्याच रोल मधे वसाबी मेयो, बारीक गोल चिरलेला लाल कांदा, अरुगुला ची पानं, टॉमेटॉच्या स्लाइसेस, ओरेगनो अन मिरपुड

ताज्या बागेत मधे सेरानो किंवा प्रोझुटो हॅम, ब्रीच्या स्लाईसेस घालून पानिनी किंवा सॅंडविच प्रेसमधे प्रेस करून.

पेपरिज फार्मच्या पातळ व्हाइट ब्रेडच्या स्लाइसेस वर कडा कापून ब्री च्या स्लाइसेस अन त्यावर इंग्लिश क्यूकंबरच्या पातळ स्लाईसेस - याचे ओपन फेस सॅंडविचेस पण मस्त दिसतात.

व्हाइट ब्रेड स्लाइसेस वर हमस, त्यावर थोडं लसूण तिखट लावून सँडविच .

अजून आठवेल तसं लिहिते.

अंजली.. नॉस्टेल्जिआ स्मित.
मार्झोरीन रॉक्स.. मला त्यांची चिकन सॅन्डविचेस अतिशय आवडतात.
बर्गर खायची पहिली सवय मार्झोरीन नी च लावली स्मित.>> अगदी अगदी. सुंदर आठवणी आहेत.

मी उद्योजक बाफ वर लिहीले होते एक १०० फिलिंग्ज नावाची सँडविच चेन काढायची आयडिया आहे. विद्यार्थी व तरूण नोकरदार, लहान मुले असलेल्या आया यांना स्वस्त पण हेल्दी ईटिन्ग ऑप्शन द्यावी असे मनात होते. तेव्हा भारतात सबवे आले नव्हते. सब सँडविचेस मला तरी टेस्ट्लेस वाटतात. ब्रेड तोंडात घोळतो.

वर्गिकरण खालील प्रमाणे:
१) शाकाहारी फिलिन्ग्स - १५
२) मांसाहारी फिलिन्ग्स - १५
३) स्वीट फिलिन्ग्स - १०
४) किड्स मेन्यू - १०
५) ग्लोबल डिलाइट्सः २० - देशोदेशींचे उत्तम सँडविचेस प्रकार.
६) ओपन सँडविचेसः १० प्रकारचे - एकाच स्लाइस वर फिलिन्ग.
७) हेल्थ फूड फिलिन्ग्स १०
८) एक्झोटिक फिलिन्ग्सः कल्पनाविष्कार जसे काविआर ट्रफल्स, इत्यादी १०

या बीबीवर येतील तशी माहिती वर्गिकरण करून एक्सेल मध्ये शीट बनविते म्हण्जे आपल्या माबोकरांना रेडिमेड माहिती मिळेल. माहिती बाहेर कुठेही रिलीज करणार नाही. सँडविच माझा अति आवडीच प्रकार आहे. त्या अनुषंगाने तर्‍हे तर्‍हेच्या ब्रेड ची पण माहिती द्या. मला येत असलेली फिलिन्ग्स लिहिते वेगळी.

मला आवडलेली काही फिलिंग्ज जुन्या मा. बो. वर इथे मी दिली होती.

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/123727.html?1173896506

बगेट वर गार्लिक बटर, बारीक चिरलेला कांदा आणी हिरवी मिरची घालून टोस्ट केलेलं पण छान लागतं. जोडीला ट्रेडर जोजचं ऑरगॅनिक टोमॅटो सूप. थंडी मधे एकदम कंफर्ट फूड..

मार्झोरीन मला पण अतीषय आवडणारी सँडविचेस. ईथे सबवे पण आवडतं. व्हेजी पॅटी घालून. फायर हाऊस सब्स मधे वेगवेगळ्या सॉसबरोबर ट्राय करायला आवडले होते सँडविचेस पण ते जरा लवकर सॉगी होतात. आणी दुसरं फडरकर्स. आपण आपल्या आवडीचे फिलिंग्स घालून घ्यायचे.मुंबई मधे हाजी अलीला हीरा पन्नाच्या जवळ एक ग्रील सँडविचचा स्टॉल आहे. ऑसम असतं तिथलं सँडविच.

आत्ताच मी सँडविच केले. ब्रेड्ला बाँबे चटणी(ईथे पट्टु या कंपनीची मिळते. हिरवी चटणी) थोडे बटर, भरपुर अ‍ॅव्हाकाडो, लेट्युस, चिकन ब्रेस्ट स्लाईस आणि चीज स्लाईस. अजुन एक मी करते - उकडलेल्या अंड्याच्या स्लाईसेस+ अ‍ॅव्हाकाडो+टोमॅटो+कांदा स्लाईसेस. यात कधी मेयो आणि टोमॅटो सॉस.कधी फक्त पेपर आणि सॉल्ट. हिरवी चटणी नसल्यास लसूण खोबर्याची कोरडी चटणी पण छान लागते.

घरी मंडळींमधे पापिलर आयटम्स येणेप्रमाणे:

कुठलीही मल्टीग्रेन ब्रेड
Boar's head कंपनीचं केजन टर्की ब्रेस्ट (डेली सेक्शनमधून जरा जाडसर कापून मागायच्या)
स्मोक्ड Gruyère चीज -२-३ कापट्या
माँन्ट्रे जॅक (हॅलापिन्यो घातलेलं) चीज -१-२ कापट्या
जरासं Boar's head कंपनीचं Savory Remoulad (cajun style mayonnaise) किंवा Pepperhouse Gourmaise (mayo, deli mustard आणि मिर्‍याचं तयार मिश्रण)
२ पानं लेट्यूस

ह्यात ब्रेड बदलून, कधी croissant वापरून, टर्की ऐवजी पास्त्रामी, रोस्ट बीफ किंवा लेमन पेपर चिकनच्या स्लाइसेस वापरून सँडविचेस करता येतात.

थंड मीट आवडत नसेल तर लेट्यूस न घालता बाकी सगळं घालून तव्यावर किंवा पानीनी मेकरमधे चीज वितळेपर्यंत गरम करून गरम सँडविचेस खाता येतात.

बोअर्स देडच्या वेबसाइटवर बर्‍याच नव्या कल्पना आहेत. त्या मी पण आत्ताच बघितल्या. ह्यांचे प्रॉडक्ट्स पुण्यात दोराबजीज्मधे बघितले.

बाय द वे, whole foods मधे पाल टॉर्टीया किंवा पालक wraps खूप छान मिळतात. त्यात चीज, परतलेल्या किंवा ग्रिल केलेल्या भाज्यांचे तुकडे उदा: कांदा, काकड्या, हिरव्या किंवा लाल गोडसर सिमला मिरच्या, चिकन किंवा हव्या त्या प्रकारच्या मीटचे तुकडे, वरच्या (माझ्या) पोस्टमधे सांगितलेलं मेयो आणि आपली एखादी देशी चटणी लावून केलेल्या गुंडाळ्या पण खूप छान लागतात.

अरे वा भारी आयड्या आहेत सगळ्यांच्या. आर्च, बाफ सुरु केला तेव्हा "कोल्ड कट" अपेक्षित होते पण इतर प्रकार आले तरी हरकत नाही म्हणून मी पण टाकले १-२ व्हेजी/एगी.

किसलेल्या चीजमध्ये/ क्रीम चीजमध्ये आवडीप्रमाणे बारीक चिरलेला / किसलेला कांदा, सिमला मिरची, कोथिंबीर, मिरच्या, पुदिना/ बेसिल, आवडत असल्यास मिरपूड इ. इ. घालायचे.... व्यवस्थित मिसळायचे.... ब्रेडला फासायचे व गट्टमस्वाहा! टोस्ट करूनपण छान लागते.

छान रेसिप्या सगळ्यांच्या!

हे सगळं नवर्‍याकडनं ऐकीव..पूर्वी पुण्यात टिळक टँकच्या बाहेर एका टपरीवर अंडा-बन मिळायचा. स्विमिंगकरून आल्यावर हादडायला बेश्ट आयटम होता तो. तर त्याच्या रेसिपीप्रमाणे..

कुठलाही बन (मी तर साधा ब्रेड घेते) जर टोस्ट करून घ्यायचा. त्याला आवडीप्रमाणे बटर लावायचं. उकडलेल्या अंड्याचे सुरीने बारिक बारीक चौकोनी तुकडे करायचे (रेग्युलर गोल चकत्या केल्या तरी चालतील). ते त्या बन मधे ठेवून वरून मीठ, काळी मिरी, आणि लाल तिखट भुरभुरायचे. आवडत असल्यास किसलेलं चीझ. झालं झटपट अंडा बन तयार!!

उकडलेल्या अंड्याचे सॅन्डविच

कुठलीही मल्टीग्रेन ब्रेड टोस्ट करुन घ्या.एका स्लाईसला थोडे बटर लावुन त्यावर कोथिंबिरिचि चटणि (कोथिंबिर् + हिरव्या मिरच्या + कांदा + लिंबु + मिठ) लावा. चटणिचा एकदम पातळ थर लावायचा. त्यावर उकडलेल्या अंड्याच्या स्लाईसेस ठेवा. थोडे मिठ, मिर्‍याचि पुड, थोडे तिखट टाका. त्यावर दुसरि स्लाईस (बटर आणि चटणि लावुन) ठेवा. थंडिच्या दिवसात गरम गरम अंड्याचे सॅन्डविच खायला एकदम मस्त लागते.

पूर्वी पुण्यात टिळक टँकच्या बाहेर एका टपरीवर अंडा-बन मिळायचा. >> प्रभाकर बेकरीत.. जबरीच असायचं. गेल्या दोन तीत ट्रिपात तिकडे गेलो तर दुकान बंद झालेले दिसले.. Sad गरवारे शाळा/कॉलेजातील सगळ्यांना माहित असेल हे दुकान)

बनमध्ये उकडलेल्या अंड्याचे काप, त्यावर मेयो/बटर च्या मधले काहीतरी, मीठ, तिखट घातलेले असायचे. घरी करुन बघा. मस्तच लागते..

रच्याकने, टिळक टँकच्या कँटीनमध्ये उकडलेली अंडी मिळायची ती पण अशक्य.. Happy

माझी आवडती, चटणी सँडवीच, ग्वाकमोली सँडवीच. रॅपमधे एग सॅलेड रॅप भरपुर भाज्या घालुन. सबवे व्हेजी पॅटी विथ चिपोटले साऊथवेस्ट (यम्म!!)

नात्या , पर्फेक्ट!!! प्रभाकर बेकरी.. हेच ते नाव!!

माझा अजून एक आवडता प्रकार म्हणजे 'टूना सॅलड सँडवीच'. कोल्ड कट मधे हा प्रकार बसत नाही. पण करायला एकदम सोप्पा.
टूना (मी चिकन ऑफ द सी ब्रँडचा वापरते), त्यात मेयो, काळी मिरी घालून एकत्र करायचे. आवडत असल्यास थोडे सेलरीचे तुकडे (टूनाच्या आकाराचे) आणि लेट्यूस हाताने तुकडे करून घालावा. टोस्ट केलेल्या ब्रेडच्या एका बाजूस हे टूना सॅलड लावावे. दुसर्‍या बाजूस स्विट रेलिश आणि झेस्टी मस्टर्ड लावावे. थोडीशी गोडसर आणि मधनचं तिखट अन आंबट चव मस्त वाटते.

हे एक मिश्रण होल व्हीट्/मल्टीग्रेन ब्रेड मधे भरून टोस्ट करायचं
कांदा चिरून परतायचा थोडया तेलावर, मग त्यात गाजर, उकडलेला बटाटा, उकडलेलं बीट किसून, हिरवी सिमला मिरची बारीक चिरून असं सगळं परतायचं थोडा वेळ. तिखट, मिठ, मिरीपूड, हवं असेल तर पनीर किसून, चिज हवं असल्यास.
हिरव्या चटणीबरोबर छान लागतं.

Pages