खस्ता कचोरी

Submitted by निवेदिता on 20 May, 2010 - 12:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

हि रेसिपी मृण्मयीने माझ्या विपूत लिहिली होती. ती मी इथे फक्त कॉपी पेस्ट केली.
खस्ता म्हणजे पापुद्रे सुटलेलं. तेव्हा कचोरीला छान पापुद्रे सुटले पाहीजेत. फार तेलकट लागु नये म्हणून कचोरी-चाट केली तर जास्त छान लागते. एक पोटभरीचा पदार्थ होतो.

खस्ता कचोरी :
पावणे दोन वाट्या मैदा
पाव वाटी कॉर्न फ्लावर
एक चमचा बारिक रवा
एक चमचा मीठ
पाव चमचा इनो फ्रुट सॉल्ट
पाव स्टिक बटर वितळवून
एक कप गरम पाणी

आतलं सारण :
१ कप पिवळी मूग डाळ
२ मोठे चमचे बेसन
जिरं
मीठ
तिखट
आमचूर पावडर
चमचाभर साखर
१ चमचा आलं-मिरची पेस्ट
चमचाभर बडीशेप पावडर
चनचाभर गरम मसाला
एक चमचा धणेपावडर
३ मोठे चमचे तेल.

क्रमवार पाककृती: 

गरम पाण्यात मीठ, इनो, बटर घालून एकत्र केलेलं कॉर्न फ्लावर आणि मैदा घट्ट भिजवून घ्यायचा. गोळा फुलक्यांच्या कणकेपेक्षा जास्त घट्ट भिजवायचा. त्याव्हे १०-१२ गोळे करून ओल्या कपड्यात गुंडाळून घट्ट डब्यात बंद करून अर्धा तास तरी मुरु द्यायचे.

मूगडाळ रात्रभर पाण्यात भिजवून सकाळि निथळायची. फोडणीत तेल घालून जीरं, हिंग,मूगडाळ घालून परतायचं (पाणी निघून जायला हवं). आलं मिरची पेस्ट घालून परतायचं. बाकी पावडरी घालून झाकण ठेवून न जळू देता ४-५ मिनिटं वाफवायचं. रुम टेंप ला थंडं करून फूड प्रोसेस्रमधून जितपत बारिक होईल तितपट (पाणी न घालता) वाटूण घ्यायचं. बारा भागात डिवाइड करायचं.

हे सारण मोदकाप्रमाणे वरच्या पारित (कव्हरमधे) भरून हलक्या हातानी लाटायचं. सगळ्या कचोर्‍या लाटून फ्रिजमधे तासभर ठेवून मग गरम तेलात खरपूस तळायच्या. सारण लाटाताना बाहेर यायला नको. तळण्याआधी प्रत्येक कचोरीला बोटाने मध्यभागी हलकं दाबून तो भाग आधी वर घेऊन तळायचं.

खायला देताना गार दह्यात चाट मसाला-तिखट मीठ साखर घालून फेटायचं. हे दही कचोरीवर घालून त्यावर हिरवी चटणी, गोड चटणी, कांदा, कोथिंबीर आणि शेव घालून द्यायचं.

माहितीचा स्रोत: 
सौजन्य : मृण्मयी, मृच्या मैत्रिणीची आई. (मारवाडी पध्दत).
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आवडते हि कचोरी Happy देशात माझ्या घराजवळ मस्त मिळते. करुन पहायला हवी घरी.

पण एक शंका

मूगडाळ रात्रभर तेलात भिजवून सकाळि निथळायची. >>> हि टायपोच आहे न?? Proud

मस्तच रेसिपी. मला खास्ता कचोरी खूप आवडते पण बाहेरची खूप जास्त डालडा घातलेली तूपकट-ओशट वाटते म्हणून जास्त खाल्ली जात नाही.

परफेक्ट रेसिपी. आज सकाळी केल्या. एकदम जबरा झाल्यात. धन्यवाद मृ, मृच्या मैत्रिणीची आई आणि निवेदिता Happy