"पाहुणा"

Submitted by निलेश उजाल on 18 May, 2010 - 06:29

ज्यावेळी पाऊस येतो आणि आपल्या मनात पावसाळा दाटतो,आता खुप मज्जा आनंदी आनंद मन अगदी खुलुनी जात.पण हाच पाऊस ज्यावेळी मुसळधार पडु लागतो त्यावेळी मात्र आपल्या ह्रिदयात धडधड निर्माण होते.मुसळधार पावसाने शहर,गाव जनजीवन उध्वस्त होते आणि हेच चित्र मी येथे रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे............!!!
......................................................................................................................
आला पाहुणा पाऊस आज माझ्या घरट्यात,
मन अती आनंदले धडधड काळजात...॥धु॥

चिंब भिजले माझे तन,जीवा राहीले नाही भान
त्यात धारांचा थैमान,दुर दडले आसमान
वार्‍याची मंद शिरशिरी.धून जागवे तनूत,मन अती आनंदले धडधड काळजात...॥१॥

राजा वरुण तो आला,आज मला भेटायला
माझ्या घरात शिरुनी,मिठी मरीली सर्वांनला
गारठुनी गेले सारे.चिपळी आवाज रदनात,मन अती आनंदले धडधड काळजात...॥२॥

नद्या-नाले तुंबले सारे,हाहाकार माजला
माझ्या सख्या मैतराचा,रुद्र रुप मी पाहिला
हा सखा नव्हे माझा.जणू यमाचा तो दुत,मन अती आनंदले धडधड काळजात...॥३॥

भान हरपुनी गेले,सैरावैरा मी धावलो
बुडल्या सृष्टीस बघुनी,तिळतिळ मी तुटलो
काय आहे सांग देवा.तुझ्या प्रेमळ मनात,मन अती आनंदले धडधड काळनात...॥४॥

पाला-पाचोळा मृतांचा,पडला माझ्या परसात
माझे ओलावले डोळे,पण पाणी नाही त्यात
दु:ख दडले ते सारे.माझ्या नयनी काळजात,मन अती आनंदले धडधड काळजात...॥५॥

त्या सागरामधील,वाळू किनार्‍यावरती
अन् मध्यात सजिव,मृत्युशी झुंज ऐसी देती
कित्येकांचे प्राणपखेरु,गगनी स्वच्छंदी फिरती
सुखी संसाराची देवा,केली सरे माती-माती
काय गुन्हा आम्ही केला.समशेर घातलीस पोटात,मन अती आनंदले धडधड काळजात...॥६॥

गुलमोहर: