वर्तुळ

Submitted by निंबुडा on 17 May, 2010 - 05:04

नवी उमेद, नवी आशा

नवा निर्धार, नवे आकाश

नवे पंख, नवी झेप

...

...

...

...

...

पुन्हा नव्याने......

नवी अंधारी, नवी गर्ता

नव्याने कोसळणे, नव्याने ढासळणे

आणि पुन्हा नव्याने वर्तुळ संपूर्ण....

...

...

...

...

...

आणि मग नव्याने वाट पाहणे...

नव्या उमेदीची......

गुलमोहर: 

छान Happy

आणि पुन्हा नव्याने वर्तुळ संपूर्ण....
ए एकदम मस्त कविता गं निंबुडा Happy
आपल्या जन्माचं पण असंच की नाही? सेम टू सेम...
एक आयुष्य सुरु...नव्या उमेदी आणि आशांनी...कडू-गोड अनुभव गाठीशी बांधून ते एक दिवस संपणार,,,
पण नवीन आयुष्य निर्माण व्हायचं थोडीच थांबणार??? नव्या आकाशात, नव्या पंखांनी, नवीन झेप घ्यायला ते तयार होणारंच... Happy

छान.