"सुखांत एकांताचा"

Submitted by निलेश उजाल on 14 May, 2010 - 07:54

सुखांत हा भावला मनाला,एकांताचा मज ओला किनारा लाभला..........
वाळूतील मी शंख शिंपले
स्वरभरीत लाटांवर गीत माझे गुंफले
भास्कर छेडी वेड्या मनाला,एकांताचा मज ओला किनारा लाभला..........
रोमरोमात चिल्ड मल्हार घुमले
द्विगुणीत आनंद गगनी भिडले
संपो जीवन इथंच क्षणभर वाटले मजला,एकांताचा मज ओला किनारा लाभला..........
केवढा याचा परिवार पसारा
वेढला याने परिसर सारा
फुलारले मन काय सांगू कुणाला,एकांताचा मज ओला किनारा लाभला..........
मग राणी संध्या येता,सुर्य पाण्यात जाता-जाता
पाणावले डोळे परत मागे वळता-वळता
भेट पुन्हा केंव्हा हुरहुरीने मन काहुरला,एकांताचा मज ओला किनारा लाभला..........

गुलमोहर: