हम आज अपनी मौत का सामान ले चले...

Submitted by विशाल कुलकर्णी on 14 May, 2010 - 06:25

आज सकाळी ऒफ़ीसला येताना, मध्येच एका ठिकाणी सिग्नल लागल्याने थांबावे लागले. बाईकचे इंजीन बंद केले आणि आपली पाळी येण्याची , सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहात थांबून राहीलो. शेजारी एक रंग ओळखू न येणारी डबडा मारुती ८०० येवुन उभी राहीली. मी एकदा तिच्या एकंदर बाह्यरुपाकडे बघितलं आणि नाक मुरडलं. एकदर रंग करडा किंवा तत्सम कुठलासा होता. आणि मालकाने बहुदा तीला गेल्या महिन्या-दोन महिन्यात साफ़ करण्याची तसदी घेतली नव्हती. मी तोंड वाकडे करत खिडकीतून आत डोकावलो. एक साठीच्या घरातले काका गाडी चालवत होते. त्याच्याकडे पाहताना माझ्या लक्षात आले की गाडीत अगदी हळु आवाजात कुठलंसं जुनं गाणं लागलय. मी जरा लक्ष देवून ऐकायचा प्रयत्न केला आणि बोल कळाले...

दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले
हम आज अपनी मौत का सामान ले चले
मौत का सामान ले चले
दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले

तेवढ्यात हिरवा सिग्नल लागला आणि काकांनी गाडी भरकन पुढे काढली. मीही निघालो. पण त्या गाण्याच्या ओळी कानात गुंजत होत्या. त्या गाण्यासाठी म्हणून मी काकांचा गाडी साफ़ न करण्याचा गुन्हा सहज माफ़ करून टाकला होता.

५० च्या दशकात आलेला ’आन’ , दिलीपकुमार, नादीरा, प्रेमनाथ, निम्मी असे सगळेच आवडते कलाकार. माझ्या पेक्षा जवळजवळ २२ वर्षांनी मोठा असलेला हा बोलपट मला खुप आवडला होता. पुढे १९४० मध्ये औरत आणि १९५७ ला एक दंतकथा बनुन गेलेला ’मदर एंडिया’ दिलेल्या मेहबुब खान यांनी १९५२ मध्ये आपल्या या चित्रपटातून नादीराला पहिल्यांदाच ब्रेक दिला होता.

"आन"चे रंगीत पोस्टर

aan.jpg

विशेष म्हणजे ’आन’ हा मेहबुबखानचा पहिलाच रंगीत चित्रपट होता. आणि हा चित्रपट त्याने लंडनमध्ये रिलीज केला होता. एक सामान्य राजनिष्ठ माणुस आणि एक निष्ठूर, क्रूर राजकुमार यांच्यातली जुगलबंदी या चित्रपटात रंगवली होती. असो...

तर या चित्रपटाचे मुख्य आकर्षण होते ’नौशाद’चे कर्णमधुर संगीत.

असे म्हणतात की या चित्रपटाच्या संगीतासाठी नौशादने १०० जणांचा ओर्केस्ट्रा वापरला होता, जी त्याकाळी फ़ार नवलाईची गोष्ट होती. स्व. मोहम्मद रफ़ी आणि लतादीदी तसेच शमशाद बेगम यांचे दैवी स्वर वापरून नौशादने यात एकुण दहा गाणी दिली होती.

आग लगी तन-मन में, दिल को पड़ा थामना : शमशाद बेगम

आज मेरे मन में सखी बाँसुरी बजाए कोई : लतादीदी

गाओ तराने मन के जी, आशा आई दुलहन बन के जी : मो.रफ़ी, लतादीदी, शमशाद आणि शाम

चुपचाप सो रहे हैं वो आनबान वाले, आख़िर गिरे ज़मीं पर ऊँची उड़ान वाले : लतादीदी, मो. रफ़ी

मान मेरा अहसान अरे नादान के मैने तुझसे किया है प्यार : मो. रफ़ी

मुहब्बत चूमे जिनके हाथ जवानी पाओं पड़े दिन रात : मो. रफ़ी आणि शमशाद

सितमगर दिल में तेरे आग उलफ़त की लगा दूँगा, क़सम तेरी तुझे मैं प्यार करना भी सिखा दूँगा : मो. रफ़ी

दिल को हुआ तुम से प्यार, अब है तुम्हें इख़्तियार, चाहे बना दो, चाहे मिटा दो : मो. रफ़ी

खेलो रंग हमारे संग : शमशाद बेगम आणि लतादीदी

तुझे खो दिया हमने पाने के बाद : लतादीदी

आणि शमशाद बेगमनेच गायलेलं "मै रानी हूं राजेकी.....!"

सगळीच गाणी शकील बदायुनी यांच्याकडून लिहुन घेण्यात आलेली होती.

(ज्या गाण्यांच्या लिंक्स मी इथे देवू शकलो नाही, त्या कुणाकडे असल्यास कृपया इथे देणे ह विनंती.)

याच कर्णमधूर मैफ़ीलीतलं हे एक सदाबहार गीत...

दुडक्या चालीने चालणारी घोड्याची बग्गी, मागे नाक फ़ुगवून (अक्षरश: नाक फ़ुगवुन) बसलेली नादीरा ...आणि चढवलेल्या खोट्या दाढीमिशा भिरकावुन देवुन " दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले, हम आज अपनी मौत का सामान ले चले " म्हणत मिश्किलपणे नादीराला छेडणारा देखणा "जय" उर्फ़ दिलीपकुमार ! नौशादसाहेबांनी अशी कित्येक सुंदर गाणी देवून आपल्याला अक्षरश: उपकृत करुन ठेवले आहे.

दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले, हम आज अपनी मौत का सामान ले चले...!

गीतकार : शकील बदायुनी

संगीतकार : नौशाद

दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले
हम आज अपनी मौत का सामान ले चले
मौत का सामान ले चले
दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले

मिटता है कौन देखिये उलफ़त की राह में
उलफ़त की राह में
मिटता है कौन देखिये उलफ़त की राह में
वो ले चले हैं आन तो हम जान ले चले
मौत का सामान ले चले
दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले

मन्ज़िल पे होगा फ़ैसला क़िसमत के खेल का
क़िसमत के खेल का
मन्ज़िल पे होगा फ़ैसला क़िसमत के खेल का
कर दे जो दिल का ख़ून वो मेहमान ले चले
मौत का सामान ले चले
दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले

त्या सगळ्या जुन्या सुगंधी आणि मधुर आठवणी छेडणारी ती डबडा मारुती ८०० आणि ते म्हातारे काका यांचे आभार मानण्यासाठी त्यांना आता कुठे शोधू?

विशाल.

गुलमोहर: 

हे गाणं मलाही आवडतं,पण ते दिलीपकुमारवर चित्रित झाले असेल असे कधी वाटले नव्हते. लेखाची सुरुवात पण छान आहे.

Hey, मस्त गाण्यांची आठवण झाली ह्या लेखाच्या निमित्ताने! आणि अशाच एका गानरसिक ''अंकल'' ची आठवण ताजी झाली मनात पुन्हा एकदा. त्यांच्या गाडीत अशीच 'बीते हुए जमानेकी' गाणी लावलेली असायची सतत! ग्रेट Happy

पूर्वी हे गाणे लागले की मला एखादा माणूस स्वतःच स्वतःसाठी बाजारात जाउन बाम्बू, सुतळी , मडके, गवत विकत घेउन खांध्यावर घेऊन येत आहे असे चित्र डोळ्यासमोर येत असे.

नन्तर कॉलेजच्या होस्तेलवर आम्ही रमी खेळत असू. बर्‍याचदा हरतच असू. पण त्याचे अगदी व्यसनच लागले होते. त्या साहित्याला म्हणजे पत्ते, सतरंजी, मार्क्स लहिण्याचा कागद, पेन याना आम्ही 'मौतका सामान ' असे नाव ठेवले होते. मंडळी बसली की 'आणा आणा मौतका सामान आणा ' अशी फरमाईश व्हायची.... Happy

ही आपली एक आठवण हो निमित्तानिमित्तने झालेली...

वा !

लतादिदींनी या गाण्याबद्दल एका खास मुलाखतीत आवर्जून उल्लेख केला होता, मला आठवत नाही रे पण त्यांनी एक अनुभव सांगितला होता.

विशालराव बेभान होऊन पहाव असा चित्रपट, तल्लीन होऊन ऐकाव अस संगीत आजकाल दुर्मिळ होत चाललय. माझ्या एका ओळखीच्या मावशींनी त्यांच्या तरुणपणी नवरंग २८ वेळा पाहिला " आधा है चंद्रमा गाण्यासाठी ". ते दिवस पुन्हा येवोत.

खरंच मंडळी... अशी काही गाणी ऐकली की नॉस्टॅल्जिक व्हायला होतं हे खरं. असं वाटायला लागतं की आपण असे सीमारेषेवर का आहोत? ना आपण त्या सुवर्णकाळाचे साक्षीदार ना येत्या भविष्याचे. मग वाटत नाही..., आपं सीमारेषेवर आहोत तेच बरे आहे, दोन्हीचाही आस्वाद घेवू शकतो ना त्याचमुळे! बाकी प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार ! Happy

धन्स रेर फ़ारेंडा Happy
मलाही खरेतर त्यातली "मान मेरा अहसान" आणि "आग लगी तनमनमें दिल को पडा थामना" ही गाणी जास्त आवडतात.