जयद्रथ-वध

Submitted by निंबुडा on 12 May, 2010 - 04:15

९वीत शिकत असताना शाळेतील सौ. देशपांडे मॅडम (या आम्हांला मराठी भाषा विषय शिकवीत असत) यांच्या प्रेरणेने आमच्या वर्गाने "ओंजळ" नावाचा हस्तलिखित काव्यसंग्रह बनविला होता. वर्गातील जवळपास प्रत्येकाने लेखन, संपादन, चित्रकला (अंतर्गत चित्रे), मुखपृष्ठ रेखाटन अशा काही ना काही उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता (मोदक ला विचारायला हवंय की त्याने काही तरी केलं होतं का ते Wink )

त्याच वर्षी शाळेच्या स्नेहसंमेलनाला प्रवीण दवणे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते. त्यांना आम्ही तो काव्यसंग्रह दाखवून त्यांची शाबासकी मिळविली होती. आमच्या या प्रयत्नांना अभिप्राय म्हणून त्यांनी उत्स्फुर्तपणे एक कविता तयार करून त्या काव्यसंग्रहाच्या पाठीमागच्या पानावर स्वहस्ताक्षरात लिहून दिली होती. नंतर बरेच दिवस तो काव्यसंग्रह वर्गातल्या प्रत्येकाच्या घरी आळीपाळीने फिरत होता. आता नक्की कुणाकडे आहे देव जाणे. त्यामध्ये मी आणि माझी एक वर्गमैत्रिण दीपा पडियार अशा आम्ही दोघींनी मिळून एक कविता लिहिली होती. (joint venture u see Proud ) जुनी डायरी चाळता चाळता ती काल सापडली. एक आठवण म्हणून इथे देत आहे:

जयद्रथ-वध
करुनि अभिमन्युचा वध,
राक्षसापरी हासे तो जयद्रथ!

जेव्हा कळे वर्तमान अर्जुनास,
जयद्रथ वधाचा त्यास लागे ध्यास

उदयिक मारुनि ठार जयद्रथास,
करिन पूर्ण मी माझी आस

अथवा होऊनि समर्पित अग्नीस,
पितृछत्र देईन स्वर्गात अभिमन्युस!

ऐकुनि अर्जुनाचा हा अटळ प्रण,
भिऊनि जयद्रथ न गाठे समरांगण

शोधितसे जयद्रथास व्याकुळ होऊनि पार्थ,
करावयास अपुला प्रण सार्थ

दुसरे दिनी कृष्ण करी चमत्कार,
करी ऊभा सूर्याभोवती ढगांचा पहाड!

येई जयद्रथ बाहेर दिन ढळला वाटून,
तेथे पेटे चिता अर्जुनाची धडाडून

पहा तरी त्या ईश्वराची लीला अफाट,
येति सूर्यदेव फाडूनि मेघांचा आंतरपाट!

माधव म्हणे, तो पहा सूर्य अन तो जयद्रथ,
चितेवरचा अर्जुन घेई अचूक शब्दवेध!

घेई पार्थ सूड अपुल्या पुत्रवधाचा,
विसावे तो बाण घेऊनि छेद जयद्रथ कंठनाळाचा!

-कु. शुभा सकळकळे
कु. दीपा पडियार
९ "अ" (१९९६-९७)

गुलमोहर: 

नौवीच्या मानाने खरंच भारी आहे. Happy

मला नववीला असताना असली कविता कुणी वाचून जरी दाखवली असती तरी छताला चिकटलो असतो बहुतेक.

वाह !!! निंबुडे वाह.... !! जिंकलस...... तोडलस.......
पार चोळा मोळा करुन फेकुन दिलस जयद्रथाला...

>>वाह !!! निंबुडे वाह.... !! जिंकलस...... तोडलस....... <<
या काव्यसंग्रहात तु काय लेखनभार लावलास ते सांग ना!!

लोकहो, याचे शुद्धलेखनही मीच खरडून द्यायचे हो ...... Wink

मस्तच गं....
पक्स Proud

बाकी 'सकळकळे' बाई, बरच कळत होतं की तुम्हाला नववीच्या मानाने Happy

मोदका, तुला आज पंचपक्वांनाच ताट मिळणार नक्की Proud

निंबुडे, ९ वीच्या मानाने चांगली आहे. शाळेच्या वयाच लिखाण समजतय. (वाईट म्हणत नाही आहे मी ह्याला उगाच भडकु नकोस माझ्यावर :P) माझी शाळा/कॉलेजातली डायरी टाकली रद्दीत. पण नेहमी वाटत १० वर्षा पुर्वी जस लिहायचो, आता दहा वर्षांनी जस लिहीतोय नी अजुन दहा वर्षांनी जर लिहील तर किती फरक असेल नाही. खुप शिकले वगैरेचा भाग नाही पण बरचस मांडणं बदलत जातं (चांगल होत की वाईट नाही म्हणते मी, बदलत जात म्हणतेय)

पक्या नववीच्या काय ...लेका आपल्या आताच्या वयाच्या मानाने पण अंमळ भारीच जात्ये ही काव्यदुंदुभी का दुदुंभी काय ती... ! बाकी छतावरुन सुटलास की बोलु.

निंबुडा पुलेशु..

सकळकळे !!!! (हे टिपिकल विदर्भातील देशस्थ आडनाव दिसतंय

हो गं...... अशा आडनावाचे लोक अन्यत्र कुठे नाहीत........ Happy
माझं माहेरचं आडनाव बर्‍याच लोकांना एकदा सांगून समजायचंच नाही. पण २-३ वेळा सांगून एकदा लक्षात राहिलं की विसरायची सोय नाही.

आडनावावरून आठवलं..... मला एक सर कायम सर्वज्ञ म्हणून हाक मारीत. त्यांच्या मते सकळकळे म्हणजे "सगळं कळे"... म्हणून सर्वज्ञ !!! Happy

'जयंद्रथ' असं आहे ना नाव खरंतर?

मी ही पूर्वी असंच समजत होत्ये..... पण मी जिथे तिथे जयद्रथ असेच वाचले आहे. त्या काळी मृत्युंजय कादंबरीचा भलताच impact होता माझ्यावर..... त्यातही बहुदा जयद्रथ असेच आहे.......... चेकून सांगते तुला....

निंबुदक, काही शब्द माझ्या डोक्यावर टपली मारुन पास झाले....पण तु हे इ.नववित रचलेस....ग्रेट आहेस !!

प्रविण दवणेंची कौतुकाची थाप मिळाल्यावर आणखी काय हवंय !! >>मला हे तीनदा म्हणायचे आहे तुला. Happy

कविन,

>> पण बरचस मांडणं बदलत जातं (चांगल होत की वाईट नाही म्हणते मी, बदलत जात म्हणतेय)

मला पहिल्यांदा भांडण असं दिसलं! Uhoh :हा:

निंबुडा,

कविता भारी आहे. नववीत असतांना असलं काही सुचणं म्हणजे ग्रेट! Happy

आ.न.,
-गा.पै.

प्रविण दवणेंची कौतुकाची थाप >>>>>>>>>>>हे प्रकरण समजले नाही..............
>>>
Happy

वैवकु, चांगला पॉइंट लक्षात आणून दिलात Happy
प्रविण दवणेंची कौतुकाची थाप काव्यसंग्रहाच्या योजनेला मिळाली होती. वरील कवितेस स्वतंत्ररीत्या नाही. वाचकांचा तसा गैरसमज झाला असल्यास क्षमस्व. नववीतल्या मुलांनी कविता लेखना पासून ते छपाई पर्यंत च्या कामात आनंदाने घेतेलेल्या पुढाकाराला व कष्टाला मिळालेली ती थाप होती. Happy अर्थात तितक्या आनंदानेही तेव्हा फुगून गेलो होतो. तो काव्यसंग्रह मात्र काळाच्या ओघात कुठे नाहीसा झाला कळायला मार्ग नाही. Sad