न्यू जर्सी (बाग राज्य)

Submitted by admin on 1 April, 2008 - 15:55

*************************************************
न्यु जर्सीतले मायबोलीकर अर्थात बाराकर
New Jersey (Garden State - बाग राज्य)
*************************************************
न्यु जर्सीतील मायबोलीकरांचे प्रोग्राम्स.

*************************************************

*************************************************

लिन्क्स
पार्ले
***********************************
टी पार्टी पार्ले
***********************************
न्यु जर्सी मायबोलीकरांचे ब्लॉग्ज.
स्वाती_आंबोळे

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Biggrin
पाऊस थांबला वाटतं मैचित्र येईतो.
बाकी फक्त तरुणीच कशी काय भिजली बुवा पावसात? Proud

बार्क्याच्या लेगो गाड्यांना बॅक रिव्हर्स आणि फ्र्ंट रिव्हर्स असे दोन ऑप्शन्स असायचे तो तीन चार वर्षांचा असताना. मै ची गाडी त्याच मॉडेलची वाटते आहे Wink

> जाताना शेकोटी ची लाकडं पण घेउन जा.
ट्रेलर वरून तरी हॉरर सिनेमा वाटतो आहे. लाकडे नेलीच तर बहुदा माझे काही बरे वाईट झाल्यावर जाळायलाच उपयोगी येतील.

बाकी फक्त तरुणीच कशी काय भिजली बुवा पावसात? >>> विकुंनी छत्री फक्त स्वतःच्या डोक्यावर धरली असावी.

स्वाती: भ.मे म्हणजे भडक मेकअप का? कला दिग्दर्शक - म्हणजे मै पर्यंत ते पोहोचलेले दिसत नाही. किंवा सर्वच रंग एकावर एक वापरल्याने शेवटी ग्रे झाले असावे.

मजेशिर चित्र व कहर प्रतिसाद. निळं पिवळं कॉम्बो म्हणजे ब्युटी व बीस्ट जोडी Wink
रखवालदाराचा निळा, चट्ट्यापट्ट्यांचा लेंगा मस्त जमलाय.

>>>ट्रेलर वरून तरी हॉरर सिनेमा वाटतो आहे. लाकडे नेलीच तर बहुदा माझे काही बरे वाईट झाल्यावर जाळायलाच उपयोगी येतील.
जान तेरे नाम Proud

मला पावसाळी रात्र म्हणून 'एक लडकी भिगीभागिसी', पट्ट्यांचा पजामामुळे 'धनंजय माने इथेच राहतात का', वर हिरो लेमन साडीवाल्या ताईंच्या खांद्यावरुन तीन बोटं दाखवत आहेत त्यामुळे 'ही माझी ती तिसरी/पती पत्नी और वो ' ही अशी खूण करत आहेत, झाडामागून बघणाऱ्या ताई भीतीदायक कमी भोचक जास्त वाटत आहेत, पण त्यांना डैरेक्ट तसं कसं म्हणणार म्हणून 'जिज्ञासू वृत्तीच्या चेटकीण ताई' म्हणू.
सर्व जॉन्रा समभाव आहे.
धमाल आहे हे Lol

मै मजेशीर चित्र आहे.

हिरो लेमन साडीवाल्या ताईंच्या खांद्यावरुन तीन बोटं दाखवत आहेत >>>> Rofl अगो बोटे नाय ती! तो मोगर्‍याचा गजरा आहे. मोगर्‍याच्या आकाराचे प्रमाण अंमळ चुकले इतकेच. Wink

गजरा का Lol गुरुत्वाकर्षणा विरुद्ध उभा आहे.
गैरसमजूतीत आचरटपणाला जास्त वाव असतो , राहू देते. Wink

जबरदस्त चित्र... Happy एकदम राखाडी मेकअप म्हणजे भ. मे. झालीच की.. Happy
'चलिये , एक शाम के लिये तो ये पुरानी हवेली जगमगा उठी, अब और पचास साल राह देखनी होगी,' खोकत खोकत जातो.. Happy

मोगर्‍या ऐवजी सस्पेण्स चित्रपाटासारखा कुणाचा तरी पंजा वाटतो आहे.. पिवळ्या साडीची गर्दन धोक्यात आहे.. Happy

खुष खबर ! खुष खबर !

न्यू जर्सी तील लोकांसाठी. खालील लिंक वर जाऊन आपली काही अनक्लेम्ड प्रॉपर्टी आहे का हे पाहून क्लेम करू शकता.

मला निदान महिनाभर मटार उसळ व शिकरण खाण्याइतके पैसे मिळाले.
( बर्‍याच वर्षांपूर्वी एका बँकेने मला व्याजाचा चेक पाठवला होता, पत्ता बदलल्यामुळे तो परत गेला होता)

https://nj.gov/treasury/unclaimed-property/

विकु, चेक केलं. आमच्या आडनावाच्या ५ अनक्लेम्ड प्रॉपर्टीज आहेत पण त्या नावाची लोकं आमची कुणीच लागत नाहीत.

अरे व्वा. विकु आले .. मला होंडाने एकदा ३३ सेण्टचा चेक पाठवला होता, आणि त्यावर ३७ सेंटचे पोस्टाचे तिकीट होते...
जमा फुकटात होतो म्हणून नाहीतर चेक जमा करायला २/३ $ पडले असते. Happy

मी लाख सांगेन पण त्यांनी द्यायला पाहिजे ना? <<< सांगून तर बघा, मिळाली तर मिळाली, नाहीतर आहेच. मी शोधू काय वैद्य लोकांच्या मिळकती ? Rofl

on a serious note, हे खरेच लेजिटिमेट आहे. ओळखीच्या एकदोघांना थोडेसे मिळाले, मलाही मिळाले. सत्यनारायण जसा प्रसादाचा शिरा
खाणार्‍यांनाच पावतो तसे असावे. तुम्ही व्हा साधुवाणी.