नवी उमेद

Submitted by निलेश उजाल on 11 May, 2010 - 06:53

गहिवरल्या नयनात ओल्या पावसाचा ॠतु येता,
मन पागोळ्या होऊनीया,नवक्षितिज मिळे दु:ख पाठ फिरवता.......
आशेची ती किरणे सारी
ओजळित हरवलली टिपे टपोरी
सुर्य झोपला भर दुपारी
म्हणूनीच चाले लाचखोरी
पद थकले धाउनीया,नवक्षितिज मिळे दु:ख पाठ फिरवता.......
वाटले होते कवेत नभ येतील
चार गोष्टी मजेच्या सागुनी जातील
उजाड माझ्या जिवनामध्ये हिरवल दाटेल
भोळे भाबडे मन माझे गित मल्हार गाईल
आकाशा गेल्या साडुनीया,नवक्षितिज मिळे दु:ख पाठ फिरवता.......
तरीहि ना हरलो मी
तिमिरात दिपक बनलो मी
कुणा ना ऐकलो मी
आदश् यशस्वी बनलो मी
एक ठोकर गेली वाट दाऊनीया,नवक्षितिज मिळे दु:ख पाठ फिरवता......
निलेश उजाळ......!

गुलमोहर: 

एक ठोकर गेली वाट दाऊनीया,नवक्षितिज मिळे दु:ख पाठ फिरवता......
छान.

छान.