बांधकाम पुर्ण होण्याआधी घरात करून घ्यावयाचे बदल..

Submitted by दक्षिणा on 5 May, 2010 - 06:28

माझं घर सध्या under construction आहे. पण स्लॅब्स पुर्ण होण्याआधी घरात आधीच कोणते बदल करून घ्यावेत या विषयी मदत हवी आहे. म्हणजे त्याप्रमाणे करून घेईन.
उदा. एकीने सांगितलं की बाल्कनीच्या दरवाज्याला आतून ३ पट्ट्या अगोदरंच बसवून घे, कारण नंतर डासाची जाळी लावायची असेल आणि पट्ट्या २ च असतील तर पंचाईत होते.

तुम्हाला तुमच्या घरात कोणत्या फॅसिलिटीज आधीच करून घेतल्या असत्या तर बरं
झालं असतं असं वाटतं ते सुचवा कृपया..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>. तीन इंच व्यासाची, दोन फूट उंचीची
>>>सवा तीन इंच आणि अडीच फूट का नको? <<<<<
tonagyaa, सत्यनारायणाची पुजा नाय मान्डायची, झाडू मान्डायचाय! तेव्हा सव्वा-अडीच अस्ल्या प्रमाणाची गरज नाही! Wink

तुला किचनमधे आणि बाथरूममधे हव्या तश्या टाइल्स बसवून घ्यायच्या असतील तर जरा टाइल्सचं मार्केट फिरून घे. आपल्याला हवं ते डिझाइन टाइल्सवर छापून देणारे लोक बरेच आहेत. ते पण करता येईल. मात्र हवे ते डिझाइन हव्या त्या रचनेमधे बसवताना समोर बसून काम करून घ्यावं लागेल.

शक्यतो संडास आणि बाथरूम वेगळे ठेवता येतायत का बघ. हल्ली नवीन बांधकामात सगळं एकाच ठिकाणी असतं ते काहीतरीच वाटतं.

फ्रेंच विंडोज दिसतात छान पण घेऊ नकोस. जमिनीपासून किमान अडीच फुटापर्यंत तरी भिंतच असूदेत. त्यावर सिलिंगपर्यंत असूदेत खिडकी वाटल्यास. छोट्या घरांमधे इंच इंच लढवताना फ्रेंच विंडो मुळे आख्खी भिंत व्यापली जाते, वाया जाते. आणि फ्रेंच विंडो घेऊन उजेड काही फार वेगळा पडत नाही.

खिडक्यांच्या बाहेर किंवा जिथे हवा येईल अश्या ठिकाणी सिलींगला हुक करून घे म्हणजे त्यात चाइम्स अडकवता येईल. चाइम्स मातीच्या किंवा बांबूच्या घे. त्याचा आवाज इरिटेटिंग येत नाही.

भिंतीला POP करणार असाल तर बिल्डरला आताच तसे सांगा . नाहीतर नंतर प्लास्टर ठोकुन काढावे लागते.

दक्स,

जास्त विचार करू नकोस.. आणि जास्त बदल वै. करू नकोस. स्वतः रहायला गेल्यावर बरेचदा काही गोष्टी जाणवतात. पुन्हा आता तु तुझ्या विचाराने करशील पण घरात खुद्द रहायला अजून माणसे आली की विचारधारा बदलू शकते.

माझ्या मते नविन घरात आधी १ - २ विकेंड नुसते राहून बघावे म्हणजे प्रकाश, वारा यांचा अंदाज येतो. सध्या वेगवेगळ्या वेळी साईट विझिट घे म्हणजे अंदाज पक्के करता येतात. मग त्यानुसार काय त्या सोयी कर. हल्ली इंटिरीअरवाले थिम रूम बनवतात. म्हणजे ज्या प्रकारचा लूक तुला हवाय खोलीला तसे वॉल बोर्डस, बेड, कपाटे, ई. ते करताना आहे त्या पॉइंटला एक्स्टेंड करून देतात. नाही तर प्रत्येक भिंतीला एक बटनांचा संच अशी वेळ येते आधीच पॉइंट वाढवले की.

---
बादवे, गम्मत -
मी माझ्या नव्या घरासाठी इंटीरिअरवाल्याला विचारायला गेले. असा हाय फंडू झटका दिलान त्याने. Wink "तुम्ही लोक सोफे स्वस्तातले घेता. माझ्या ओळखीने मी चांगलं सामान पुरवतो. स्वतः जातीने लक्ष घालून सोफा आणून देतो इंटरनॅशनल ब्रँडचा. सव्वा एक लाखाला चांगला सोफा येईल" Uhoh

>>>>> सव्वा एक लाखाला चांगला सोफा येईल <<<<<< Lol की Sad
सोफ्याला काय हिरेमाणके जडवणार होता का तो?
मागे सव्वा लाखाच्या गादीबद्दल पण असच ऐकल्/बघितल होत! कस्लितरि स्किम होती म्हणे ती!

दक्षे अभिनंदन! Happy
आणि हा धागा मस्त झाला आहे. बरीच चांगली माहीती एके ठीकाणी जमा होतेय.

मी सध्या इथे घर भाड्याने घेतले ते नविन बांधकाम आहे. पण घर मालकाने केलेला निष्क्रियतेची मी सजा भोगतोय.
माझ्याकडे इनव्हर्टर आहे पण या घरात तशी सोय नव्हती करुन घेतलेली. आता वरुन वेगळे वायरींग करायला लागेल असे बिल्डर म्हणत आहे. त्यासाठी खर्च येईल तो वेगळा आणि वरुन केलेलं वायरींग भिकार दीसणार Sad अक्वागार्डसाठी नळ बदलावा लागला...आणि पॉवरपॉईंट पण नव्हता. बाथरुममध्ये गिझरसाठी कनेक्शनच नाहीये ! Uhoh :रागः

नविन घर आहे, त्यामुळे मला वाटलं होतं की सगळं व्यवस्थीत असेल! कसचं काय ! Sad

स्वयंपाकघरातल्या ओट्याची कड असते ती जरा उंचावून घ्यावी किंवा एक पट्टी लावून घ्यावी. (पट्टी लावली तर परत त्या जॉईंटशी कचरा साचून ते साफ करण्याचं काम वाढतं त्यापेक्षा ती कड नुसती उंचावली/elevated करुन मिळत असली-एकसंध दगडातूनच-तर ते जास्त चांगलं) त्यामुळे ओट्यावर काहीही सांडलं पाणी किंवा इतर काही, तरी ते रोखलं जातं आणि पटकन खाली ओघळत नाही.
इथल्या एका अपा.मध्ये तसं होतं तेव्हा मला ते फार उपयुक्त वाटलं होतं. असं मी भारतात करुन घेणार या विचाराने फोटोही काढून ठेवला होता. सापडला तर बघते. Happy

फोटो सापडत नाहीये लगेच.
नीधप मी स्केच टाकलंय तसं दिसतं. त्या ओट्याच्या कडेला बाणाच्या दिशेने दगड एकसंध वर उचलल्यासारखा होता. कुठेही जॉईंट नव्हता. मला कदाचित नीट सांगता येत नाहीये. फोटो परत शोधेन. मी अगदी जवळून् फोटो घेतला होता त्याचा Proud

php2PEZfJAM.jpg

दक्षिणा- अभिनंदन.
मस्त विषय. सगळ्यांच्याच सुचना मौलिक आहेत.
आशुतोषला ग्रॅनाईट बद्दल अनुमोदन. लाकडीदारांची वाट लागणे चालु झाले आहे.

मला खरच एक पांचट प्रश्न आहे .. इथे ते एक्स्तेन्देड पावर स्ट्रीप येते ती वीज वाचवण्यासाठी असते.. एका स्ट्रीप मध्ये ५-६ पोइंत्स असतात.. स्पेशाली tv च्या इथे ती वापरायची असते.. कारण एकाच वेळेस ते बटन बंद केले कि सगळी उपकरणा बंद होतात आणि स्त्यांड बाय मुळे जी वीज जाते ती जात नाही .. हि भारतात नाही का मिळत ..एवढे सगळे पावर पोइंत्स घेत बसायची गरज पण नाही..
बाकी ठिकाणी घ्या पण लिव्हिंग रूम मध्ये नको असा माझा आपला मत.. .

त्याला स्पाइक गार्ड म्हणतात. कॉम्प्सच्या इथे वापरली जाते अनेकदा. पण मुळात अमेरीका आणि भारत यांच्या वीजेत फरक असल्याने (११० आणि २१० याहून तांत्रिकरित्या कुणीतरी नीट समजावून सांगा मी विसरले) ते बाकी अप्लायन्सेससाठी फार उपयोगाचे ठरत नाही. त्यात लोडशेंडींग असलेल्या जागी इन्व्हर्टर घेतला जातोच त्यामुळे मग परत त्याचा काही उपयोग होत नाही.

कोणी तरी नवीन बाफा चालू कराल का .. घर बांधून झाल्यावर .. कसे आणि काय बदल केले ते.. किती कष्ट पडले.. किती खर्च आला ते.. इथे बसून तयार होत असताना काही करता आला नाही .. घर तर तयार आहे पण गेल्यावर सगळे बदल करून घायचे आहेत.. इथे लिहिला तर चालेल का .. मला मेन किचन करायचा आहे भिंत अर्धी वागिरे करायच्या भानगडीत पडावा का .

भिंती उभ्या राहायच्या आधी घराच्या शेलचा - म्हणजे नुसत्या आकाराचा प्लॅन एखाद्या इंटिरिअर डिजायनरला किंवा आर्किटेक्टला दाखवा. त्यात सगळ्या बीम आणि कॉलम दाखवलेले असतात. (जे हलवता येत नाहीत.) बाकी भिंती कुठे कशा हलवून तुम्हाला हवे ते बसवता येईल हे ठरवता येते. बिल्डरचे जे आर्किटेक्ट असतात तेही यात मदत करतात. खूप काही हलवाहलवी नसेल तर त्याचे जास्तीचे पैसे घेत नाहीत. (कारण कदाचित एखादी भिंत कमी होऊन किंवा अर्धी होऊन त्यांचे पैसे वाचत असावेत.)

इलेक्ट्रिकल प्लॅनिंग आत्ताच करणे आवश्यक आहे. बिल्डर कडून इलेक्ट्रिकल्स चा नकाशा घेऊन त्यात आप्ल्याला हवे ते सगळे आहे का हे बघणे आणि वाटल्यास हलवाहलवी करायला सांगणे महत्त्वाचे.

तसेच प्लंबिंगच्या नकाशाचे.

जर काही बदल करायचे ठरले तर पुन्हा नवीन नकाशा बनवून घेणे आणि तो तपासून बघणे हे करायला हवे. नंतर इलेक्ट्रिकल्स आणि प्लंबिंग बदलायचे तर खूप त्रास पडतो.

किचन - सिव्हिल किचन करायच्या ऐवजी मॉड्यूलर करावे असे माझे मत झाले आहे. नंतर काही बदल करायचे म्हटले तर सोपे पडते.
सिव्हिल किचन म्हणजे कडाप्पा / ग्रॅनाईट भिंतीत पक्का रोवणे - त्याला खालून विटांच्या कॉलमचा वगैरे आधार दिलेला असतो. तर मोड्यूलर किचन मधे किचनचे ड्रॉवर्स, ट्रॉलीज वगैरे घेऊन मग ग्रनाईट किंवा इतर काही सिंथेटिक प्रकारचा कट्टा त्यावर नुसता ठेवला जातो. कडेला वॉटरप्रूफिंग करून.

वर्षा उंचावणे म्हणजे तिरके करणे का? >> त्याला गोठ लावणे असंही म्हणतात...

खूप काही हलवाहलवी नसेल तर त्याचे जास्तीचे पैसे घेत नाहीत. (कारण कदाचित एखादी भिंत कमी होऊन किंवा अर्धी होऊन त्यांचे पैसे वाचत असावेत.) >> बिल्डर लोक जेव्हा भिंत वगैरे कमी करतात तेव्हा फक्त निम्मी किंमत कमी करतात पण वाढवताना १.५ पट पैसे घेतात.

डक्स अभिनंदन. धागा सुरु झाल्यापासून वाचत होतो. वर्षाचा पॉइंट खरचच विचार करण्याजोगा आहे. आमच्या इथे स्वयंपाक कट्ट्याला नंतर मार्बलच्या पट्ट्या लावल्या आहेत. एकसंध मार्बलही मिळेल असं वाटतं , तेंव्हा तू जमले तर तसच करुन घे.
आमच्या बिल्डरने माळे व्यवस्थित नाही बांधले , खालीवर झालय, परत एका सरळ रेषेत नाहीये. फर्निचर करताना फार त्रास झाला. व्यवस्थितही दिसत नाही केल्यावर. आम्ही एलटाईप ओटा करुन घेतलाय. डब्ब्यासाठी मांडणीही नंतर करुन घ्यावी लागली. जर आधीच लक्ष दिले तर बरे.

सगळ्यात महत्वाची सूचना-
ह्या सगळ्या सूचना व्यवस्थित वापरुन जेंव्हा घर तयार होईल तेंव्हा मला पार्टीला बोलव.:-P

ह्या सगळ्या सूचना व्यवस्थित वापरुन जेंव्हा घर तयार होईल तेंव्हा मला पार्टीला बोलव.>>>>>> अगदी दक्षे.......

>>
त्यावेळी दक्षी सिंहगड रोडच्या सिग्नलवर अ‍ॅल्युमिनियमचा वाडगा घेऊन उभी असल्याचे दिसेल Proud

त्यावेळी तिला भिकार्‍याना भीक द्यावी काय या बीबी वर तिने जे पोस्ट केले होते ते ऐकवा.
अथवा फारच झाले तर एक करुण कटाक्ष टाकून चारआठाणे टाका. तेवढाच एखादा खिळा मारील बिचारी भिन्तीला Proud

मामी, वरच्या सगळ्या सुचना पाळणं मँडेटरी आहे. प्रत्येक अनुल्लेखीत सुचेनेसाठी जबर दंड आहे. त्यामुळे ह्याच घरात कधी पार्टी मिळेल कोण जाणे.. Proud

मामी गम्मत हो, एवढ्या सूचनांचे इम्प्लीमेटेशन करता करता तिचे दिवाळे निघणार नाही का? Proud

आपल्या शुभेच्छा आहेतच तिला. म्हणून तर लोकानी एवढे लिहिले. Happy
तुमच्या सूचनेनुसार ती शेजारच्याचाही फ्लॅट घेईल आणि शेजारी सिग्नल्वर उभा राहील अशा शुभेच्छा देऊ या Proud

अरेरे माझे नळावरील भांड्ण करायचा बेत फसला. चला दोघे मिळून दक्षीच्या पार्टीला जावूत टोणगेश. पण गिफ्ट घेऊन. Happy

Pages